सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!
.
समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे.
मिसळपाव