Skip to main content

प्लम सुफले

प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य- २५० ग्राम डब्यातील प्लम,१ चहाचा चमचा बटर,२ अंडी,२ टे‌बल स्पून मैदा १.५ चहाचा चमचा लिंबाची साल किसून,३ चहाचे चमचे वॅनिला अर्क किवा २ पाकिटे वॅनिला साखर १५० ग्राम स्पाइझक्वार्क/चक्का/केफिर चीज/क्रीम चीज यापैकी जे उपलब्ध असेल ते. १ टेबल स्पून साखर,१ चिमूट मीठ कृती- बेकिंगट्रे/डिशला बटर लावून घेणे.प्लम्सचे अर्धे तुकडे करणे आणि त्यांना काट्याने टोचे मारणे व ते बेकिंग ट्रे मध्ये लावून घेणे. अंडी फोडून पांढरे व पिवळे वेगळे करणे.एका वाडग्यात अंड्यातील पांढरे,१ चिमूट मीठ,वॅनिला अर्क/साखर एकत्र करणे व हँडमिक्सीने इतके फेटणे की त्याचा पांढरा फोम बनला पाहिजे.(याला आयश्ने *म्हणतात.)भरपूर फेटावे लागते. दुसर्‍या वाडग्यात क्वार्क,अंड्यातील पिवळा बलक,मैदा,लिंबाची किसलेली साल,साखर एकत्र करणे व हँडमिक्सीने चांगले फेटणे. या मिश्रणात वरील आयश्ने घालणे , न फेटता फक्त एकत्र करणे व हे मिश्रण बेकिंग डिशमधील प्लम्स वर घालणे. प्रिहिटेड अवन मध्ये २५-२७ मिनिटे १८०अंश से.वर बेक करणे. गरम/गार/कोमट जसे हवे तसे खाणे. *आयश्ने: आय=अंडे, श्ने= हिम

याद्या 3132
प्रतिक्रिया 5

आवडेल नक्की असे वाटतेय :-) फोटो मात्र पाहीजे होता.

याचा फोटो का नाही दिलास ग स्वाती ताई??????? आणखी मज्जा आली आसती........... :) पण मिंटी ला सांगतो वाचायला....:)

स्वाती, सह्हीच पाकृ. एकूणच प्लम हा माझा अत्यंत आवडता प्रकार... :) तात्या.

फोटो का नाही दिलास... पण कृती भारी आहे... डब्यातल्या प्लम ऐवजी फ्रेश प्लम्स वापरले तर?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

फ्रेश प्लम्स चालतील ना..फक्त साखर जरा जास्त लागेल.आणि प्लम्सच्या आंबटगोडपणानुसार साखर वाढवावी लागेल. बेक करतानाही पाचेक मिनिटे जास्त लागतीलसे वाटते. फोटो.. ह्म्म.. आता आधी करेन,फोटो काढेन आणि टाकेन,:) स्वाती