Skip to main content

ओंडका

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 03/09/2008 05:07 या दिवशी प्रकाशित केले.
ओंडका =================== बुडवू पाहती कितीक लाटा.. "मी" तरी हा, बुडतं नाही!.. नाका-तोंडात पाणीच पाणी.. "मी" तरी हा, मरत नाही!.. पोहता पोहता थकली गात्रे.. "मी" तरी हा, गळत नाही!.. बनून हेंदकळे नाव सागरी.. बोट कुणाची बनत नाही!.. धरून राहतो हाती ओंडका.. "मी" तरी हा, तारत नाही..!!! =================== स्वाती फडणीस....... ०३-०९-२००८
Taxonomy upgrade extras

(इंडियन) अमेरिकन आई बाप

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 03/09/2008 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती. दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा.

मिपाचा प्रथम वर्धापन दिन आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...!

लेखक सरपंच यांनी बुधवार, 03/09/2008 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! केवळ अन् केवळ मायबाप मिपाकरांच्या सहकार्यामुळेच मिपाला गेल्या वर्षभराची वाटचाल करता आली. गेल्या वर्षभरात जे काही चांगलं झालं असेल, उत्तम झालं असेल ते सर्व मिपाकरांमुळेच झालेलं आहे आणि जे काही चुकलं असेल त्याकरता मी स्वत: जबाबदार आहे... या पुढेही मिपाकर सभासदांचा स्नेहाशीर्वाद मिपाच्या डोक्यावर अखंड राहो एवढीच श्री गजाननाचरणी प्रार्थना..! गणपतीबाप्पाची तुम्हाआम्हा सर्वांवर नेहमीच कृपादृष्टी राहो, हीच शुभकामना...! आपला, (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर. मिपाचे श्रद्धास्थान - लालबागचा राजा.

आपण यांना पाहिलंत का?

लेखक विकेड बनी यांनी मंगळवार, 02/09/2008 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
नसेल पाहिलं तर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पाहून टाका. :D
आज चंद्राला पाहून पाप लागले तर मी जबाबदार नाही बरं का!

रावसाहेब ते राजसाहेब - एक वर्तूळ

लेखक सुनील यांनी मंगळवार, 02/09/2008 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
"दुकानाचं बोर्डं ज्या भाषेत, ती त्या गावची भाषा", इती रावसाहेब. आता पुलंच्या रावसाहेबांच्या ह्या उक्तीची पार्श्वभूमी थोडी वेगळी असली, तरी दुकानदारांची मानसिकता त्यातून व्यवस्थित प्रकट होते. कोणीही दुकानदार आपले दुकान-धंदा सुरू करतो तो पैसे मिळवण्यासाठी. त्यासाठी गरज असते ती गिर्‍हाईकांची. गिर्‍हाईकेच दुकानदाराला पैसा आणि नाव मिळवून देत असतात. अर्थात गिर्‍हाईकांची कदर राखणे हे त्या दुकानदाराचे प्रथम कर्तव्य (याला काही सन्माननीय अपवाद आहेत, असे ऐकिवात आहे.

आपण मिसळपाव वर कसे आलो ?

लेखक टारझन यांनी मंगळवार, 02/09/2008 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्स मिपाकर्स !!!! आम्ही इथे आलो तेंव्हा मिपाचे जवळजवळ ११०० सभासद होते. पण गेल्या अडिच महिन्यात ही संख्या १९०० वर पोहोचली. (ड्युप्किकेट आय डींचा हातभार फार फार तर ५० चा असेन) . असो ... इथले काही सभासद हे अंतरजालिय ब्लॉगर्स आहेत आणि त्यांचा वावर फार पुर्वीपासून तत्सम साइट्स वर आहे. त्यामुळे ते तात्यांच्या ओळखीमुळे मिपाकर्स झाले असतील ही शक्यता आहे. पण मिसळ पाव गुगल किंवा याहू सारखे नाही. किंवा त्याची जाहिरात आपण कुठल्या चॅनल वर पहात नाही (कमीत कमी मी तरी नव्हती पाहिली). म्हणून दिवसेंदिवस मिपाचा वाढता अवाका पाहून प्रश्न पडले. मी इथे येण्या आधी ब्लॉग्ज बद्दल फक्त ऐकून होतो.

रॉक ऑन च्या निमित्ताने..

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 02/09/2008 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
हे खरंतर केवळ सिनेमाचं परीक्षण नव्हे..... मला आवडला , तुम्ही बघा असं आणि इतकंच ही नव्हे... सिनेमा पाहताना त्यापेक्षा काही जास्त जाणवत होतं ते सांगावंसं वाटतंय म्हणून हे थोडंसं लेखन. आधी गोष्ट सांगतो.... अगदीच थोडक्यात सांगायचं तर दिल चाहता है सिनेमामध्ये झंकार बीट्स सिनेमा मिक्स केला तर रॉकऑन तयार होतो. मॅजिक नावाचा रॉक बँड चालवणार्‍या चार मित्रांची ही गोष्ट .... आदित्य ( फ़रहान ) ,के.डी( पूरब) , रॉब ( ल्यूक केनी) आणि जो ( अर्जुन रामपाल) असे चौघे मित्र दहा वर्षांनंतर पुन्हा भेटतात.