लेखकसर्वसाक्षीयांनी रविवार, 07/09/2008 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
गौरी-गणपतीचे दिवस आहेत, बाप्पांच्या भक्तित महाराष्ट्र रंगलाय, सर्वत्र गणेशोस्तवाचे वातावरण आहे त्यानिमित्त गणपतीबाप्पाला प्रिय अशा जास्वंदीची ही काही प्रकाशचित्रे.
लेखकअनिरुद्ध अभ्यंकरयांनी रविवार, 07/09/2008 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
खोल खोल
आत आत
उठते जेव्हा
एक कळ
मन माझे
म्हणते तेव्हा
दूर पळ दूर पळ
ऍडम आणि ईव्हला
टाळू म्हणून टळलं नाही
तुझी माझी गत गं
त्यांच्याहून वेगळी नाही
झाडावरती आज पुन्हा
पिकलं आहे एक फळ
मन माझे म्हणते तेव्हा
दूर पळ दूर पळ
कधीसुद्धा संपू नये
अशी एक रात्र येईल
बुद्धी तेव्हा आपली सारी
गलितगात्र होईल
वासनेच भूत तेव्हा
भावनेला लावेल चळ
मन माझे म्हणते तेव्हा
दूर पळ दूर पळ
-अनिरुद्ध अभ्यंकर
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी रविवार, 07/09/2008 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
"जेव्हा मी वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची आठवण मी तुम्हाला सांगतो",
असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं.
प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते.
ते पुढे म्हणाले,
"त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली.
एका मोठ्या हॉलमधे, वयाने पंचाहत्तरीच्या आसपास असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून आमचं स्वागत करण्याच्या इराद्याने धडपडत उभे रहाण्याचे प्रयत्न करताने दिसले.
गोंधळलेल्या मनस्थीतीत असलेल्या त्या वयस्कर आजोबाना,
"बसा,बसा"
असं म्हणण्यापुर्वीच त्यांचं धडपडीचं हे चाललेलं दृश्य पाहून माझी मलाच अत्यंत लाज व
लेखकयेडा खवीसयांनी रविवार, 07/09/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
Life Should not only be lived, It should be celebrated!!!
मध्यंतरी नेटवर सर्फ़ करताना अचानकपणे "ओशो"चं हे एक छान सुभाषित दिसलं! किती सुंदर आणि स्पष्टपणे या गुंतागुंतीच्या जीवनाचे "आधारभुत" तत्व त्यांनी नीटसपणे मांडलय ना? आजवरच्या सगळ्या so called established संतांनी आपल्याला जीवनाकडे बघण्याचा "गंभीर" दृष्टीकोन दिला पण, ओशो जीवनाला एक "उत्सव" म्हणुन बघतात. या एकाच वाक्याला अनेक कंगोरे आहेत, हिर्यासारखे अनेक पैलु आहेत आणि कॅलिडोस्कोप सारख्या अनेक सापेक्ष प्रतिमा आहेत.
लेखकतिमायांनी रविवार, 07/09/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ममता, अरुंधती, जयललिता, मायावती, सोनिया, जया, शबाना, सुषमा व तत्सम् स्त्रियांना एकाच बोटीत बसवून महासागराच्या मध्यभागी नेले व बोटीचा ताबा तुम्हाला मिळाला तर तुम्ही देशप्रेमासाठी काय कराल ?
लेखकस्वाती दिनेशयांनी रविवार, 07/09/2008 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
गौरीजेवणाला कोकणास्थांकडे घावन घाटले असते.
घाटल्यासाठी:१ वाटी कणिक,१ चमचा तूप,१ वाटी ओल्या नारळाचा चव,३/४वाटी गूळ
२ कप दूध+ साधारण १ कप दूध, वेलची+जायफळ स्वादासाठी, बदामतुकडे +बेदाणे सजावटीसाठी
घावनासाठी: २ वाट्या तांदूळाचे पीठ+ चवीपुरते मीठ
घाटले: कणिक तूपावर गुलाबी रंगावर भाजून घ्या,त्यावर खोबरे घालून थोडे अजून भाजा,गूळ घाला आणि थोडे भाजा,दूध घालून चांगले शिजवा.शिजल्यावर त्यात बदाम,वेलची,जायफळ घाला व ढवळा.
हे घाटले तयार झाले.यातील दू
लेखकविसोबा खेचरयांनी रविवार, 07/09/2008 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
कालच कुठल्याश्या एका (माझ्या माहितीप्रमाणे 'द्रोण') चित्रपटाच्या कुठल्याश्या एका समारंभात प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन हिने
'हंम यूपीके है, हम हिंदीमेही बात करेंगे. महाराष्ट्रके लोग हमे माफ कर दे!"
असे मराठीजन, मराठीभाषा आणि महाराष्ट्र यांचा जाणूनबुजून अपमान करणारे, खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. अनेक वाहिन्यांनी काल रात्री उशिराने हे दृष्य दाखवले. सदर वक्तव्य करतांना जयाच्या चेहेर्यावर खिल्ली उडवण्याचे, छद्मीपणाचे भाव स्पष्ट दिसत होते!
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी रविवार, 07/09/2008 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--राजेंद्र्कृष्ण )
दुःखाच्या ह्या दरी मधे
रथ खुषीचा लोपला
प्रेमाच्या ह्या खेळा मधे
डाव वेळेने साधला
कुणी समजावे प्रेमातल्या
ह्या नीष्ठूर संकटाना
दोन जीवाने इच्छीले ते
इतराना काही केल्या पटेना
हंसण्या आधीच प्रीतिला
का आवडे रडायला
प्रेमाच्या ह्या खेळा मधे
डाव वेळेने साधला
नेत्रा समोर प्रीतिचा
पुरावा कोणत्या कारणा
म्हणावे जर ह्या जीवन
मग काय म्हणावे ह्या मरणा
प्रीतिचे दैव जाता निद्रे मधे
दाह दुःखाचा भोगला
प्रेमाच्या ह्या खेळा मधे
डाव वेळेने साधला
श्रीकृष्ण सामंत