Skip to main content

जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि अरिष्ट

लेखक अभिजीत यांनी शुक्रवार, 19/09/2008 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि अरिष्ट गेले वर्षभर चालु असलेल्या जगभरातील आर्थिक घसरणमुळे अमेरिकेत आणि जगभरात दीर्घकालीन परिणाम घडतील यात आता काही शंका नाही. वाचकांसाठी हा एक धावता आढावा - २००३ पासुन विविध आर्थिक क्षेत्रात जगभरात तेजीला सुरुवात झाली. विकसित देश अधिक श्रीमंत होत होते आणि विकसनशील देशात मध्यमवर्ग वाढत होता. यामुळे आता सर्वत्र सुजलाम्-सुफलाम परिस्थिती येणार अशी खात्री अर्थतज्ञ, मोठमोठ्या बँकांमधे मोठमोठ्या पगारावर काम करणारे अधिकारी आणि सरकारी उच्चाधिकारी यांनी द्यायला सुरुवात केली होती.

फ्रेंच फ्राईज...

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 19/09/2008 03:04 या दिवशी प्रकाशित केले.
मॅक डी, बर्गर किंग अशा ठिकाणी मिळणारे फ्रेंच फ्राईज हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. मी घरी याचा प्रयोग करायला गेले तेव्हा जो काही मी तळलेला बटाटा केला त्याला फार तर फिंगर चिप्स म्हणता येईल. कारण तो कितीहि जास्ती तळून तो फ्रेच फ्राईज सारखा क्रिस्पी नाही झाला. आणि अचानक संजय टुम्माने (वाह रे वाह . कॉम)त्याचं रहस्य सांगितलं. त्या पद्धतीने मी करून पाहिलं आणि खरंच फ्रेंच फ्राईज फ्रोजण आणणं बंद केलं. घरीच सुंदर फ्रेंच फ्राईज बनतात.

डोळ्याचं पारणं फेडा! ... अजुन काय काय ...?

लेखक baba यांनी शुक्रवार, 19/09/2008 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्याचं पारणं फेडा! या नावाने आपण नेहेमिच चान्गली छायाचित्रे पाहतो.. ती कोण प्रकषित करतो(ते) ते माहित नाहि... पण छान असतात... ह्या सदरामध्ये आपल्याला अजुन कोण कोणती छायाचित्रे पहावयाची ते इथे सान्गावे..... आपली इच्छा कुणीतरी पुर्ण करेल ही आशा बाळ्गतो.. त्याच बरोबर जर एखाद्याला वाटत असेल की आपले एखादे छायाचित्र मुखप्रुष्ठावर यावे.. तर ह्याचि काय सोय आहे का? मला खालील विषयावरिल छायाचित्रे पहायला आवडतिल.... पर्वत रान्गा ग्रामिण जीवन धार्मिक स्थळे आकाश - अन्तराळ अँनिमेटेड

ऑन लाईन डे ट्रेडीग चे धडे (भारतीय स्टाक मार्केट)

लेखक पान्डू हवालदार यांनी शुक्रवार, 19/09/2008 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
ऑन लाईन डे ट्रेडीग चे धडे (भारतीय स्टाक मार्केट) मि पा चे सदस्य मदत करतील का .. १/ ऑन लाईन डे ट्रेडीग साथि कोणत्या आ. डी. हव्यात (एनाराय) २/ माझ्या महिति प्रमाणे - डी मेट अकाउन्ट हवा (एनाराय - कसा मिळेल) ३/ (एनाराय) पेन नबर कसा मिळवु शकतात मी स्वता दोन देशचा नग्रिक आहे, आयसी आयसी आय चा भारतात अकाउन्ट आहे (एनारी), पण पेन नबर नाही अपेक्शेत ...

निरो कपडे बदलतोय...

लेखक विकी शिरपूरकर यांनी गुरुवार, 18/09/2008 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
रोमच्‍या इतिहासात निरो या राजाबद्दल अनेक घटना प्रसिध्‍द आहेत. हा राजा प्रचंड बेफिकीरी आणि प्रजेविषयी कोणतीही आस्‍था नसलेला होता. आणि त्‍यामुळे संपूर्ण रोम जळत असताना निरो बासरी वाजविण्‍यात मग्‍न होता. आता हा विषय इतिहास जमा झाला तरीही वैभवशाली इतिहास असलेल्‍या भारतातही असा इतिहास घडविणारे महामानव अजूनही शाबूत आहेत. याचा प्रत्‍यय संपूर्ण देशाला शनिवारच्‍या रात्री आला. राजधानी दिल्‍लीच्‍या गजबजलेल्‍या भागांमध्‍ये एकामागोमाग एक सलग 5 बॉम्‍बस्‍फोट झाले. आणि त्‍यामुळे संपूर्ण देश हादरला.

सुंदर चित्रं पहायला मला बरं वाटतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 18/09/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं असं झालं,मी निलकंठ केळकरांकडे माझ्या इनकमटॅक्सच्या काही कामा करता गेलो होतो.त्यांच्या ऑफिसात तशी बरीच गर्दी होती.मला जवळ बोलावून ते मला म्हणाले, "तुम्ही घरात जाऊन बसा.ह्या सर्व कस्टमरांची सोय लावून मग मी आत येतो.आमाची संध्या नागपूरहून थोडे दिवस माहेरपणासाठी आली आहे.तिच्याशी थोड्या गप्पा मारा.

आत्मक्लेश२

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी गुरुवार, 18/09/2008 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
चारोळी म्हणजे काय? कविला पडले कोडे दुकानात जाउन त्यानं मागितले थोडे. दुकानदार शहाणा ,दिले शब्दांचे बुडबुडे म्हणाला ,चारच ओळीत बांधावे पुडे सांत्वनाची असेल भाषा तरच आपली व्यथा सांगावी, नुस्तीच ढोंगांची असेल वर्षा तर आपण मिठाची गुळ्णी धरावी. ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात मी वेलींसाठी बांधिन ग, ते मोत्यांसाठी शिंपले आणतात मी अश्रुंसाठी आणिन ग.

आत्मक्लेश

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी गुरुवार, 18/09/2008 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळात काय प्यावे चुलीतल्या धुरावर डोळे धरावे मग नसेल पाण्याची उणीव फक्त आपले आश्रु दुसर्‍यास पाजावे.

साताजन्माचा वनवास..!

लेखक पारोळेकर यांनी गुरुवार, 18/09/2008 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
साताजन्माचा वनवास..! मला वाटत होतं... ती माझीच होईल, या जन्मात ती डोळ्यासमोरून निघून गेली... मी राहिलो तिला पाहत! थांबविण्याचा प्रयत्न करू किती ते होण्यासारखं नव्हतं कारण, तिच्या गळ्यात दुसऱ्या कुणाचं 'मंगळसूत्र' होतं! मी मनात म्हटलं, 'तू ह्या नाही तर... पुढच्या जन्मात माझीच होशील..! ' पण, मन माझं खट्याळ! मला म्हणालं, 'तू नुसता बघतच राहशील..!

कॉकटेल..

लेखक अभिज्ञ यांनी गुरुवार, 18/09/2008 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो. मिसळपाव संकेतस्थळावर विविध विषयावरील चर्चा, पाहता मला इथे "कॉकटेल" हा विषय चर्चेला घ्यावा असे वाटते. आतापर्यंत ह्या विषयावर मिपावर कुठलाच धागा सापडला नाहि परंतु सिंगल माल्ट ते द्राक्षासवा पर्यंत बर्‍याच पेयांचा उल्लेख इथे आढळतो. प्रत्यक्षात आम्हि हि कॉकटेल्स रेस्तॉरंट मध्ये बसून फक्त चाखलेली आहेत. परंतु हिच जर का घरी बनवायची असली तर काय काय तयारी करावी लागते.साहित्य काय हवे? कुठली कॉकटेल्स सहजपणे घरी बनवता येतील? विविध पेयांचे प्रमाण किती असावे,ग्लासांचे विविध प्रकार,देशागणिक मिळणारी वेगवेगळि कॉकटेल्स.... वगैरे वगैरे.......