मॅक डी, बर्गर किंग अशा ठिकाणी मिळणारे फ्रेंच फ्राईज हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. मी घरी याचा प्रयोग करायला गेले तेव्हा जो काही मी तळलेला बटाटा केला त्याला फार तर फिंगर चिप्स म्हणता येईल. कारण तो कितीहि जास्ती तळून तो फ्रेच फ्राईज सारखा क्रिस्पी नाही झाला. आणि अचानक संजय टुम्माने (वाह रे वाह . कॉम)त्याचं रहस्य सांगितलं. त्या पद्धतीने मी करून पाहिलं आणि खरंच फ्रेंच फ्राईज फ्रोजण आणणं बंद केलं. घरीच सुंदर फ्रेंच फ्राईज बनतात. तर माझ्या फ्रेंच फ्राईज आवडणार्या मिपा मित्रमैत्रिणींसाठी ही पाककृती..
साहित्य :
लांबट आकाराचे २ बटाटे (बटाटे घेताना त्याच्या बॅग वर बेकिंग युज असे लिहिलेले असले तर ते उत्तम)
मीठ.
कृती :
१. बटाटे सालं काढून लांब उभ्या आकारात कापून घ्यावेत. शक्यतो आकार उभा चौकोनी द्यावा.
२. मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी घेऊन ते कापलेले बटाट्याचे तुकडे घालवेत.
३. पाणी उकळू लागले आणि बटाट्याचे तुकडे कडेने थोडे रंग बदलल्या सारखे दिसू लागतात.
४. बाटाट्याचे तुकडे अंदाजे ४०% शिजू द्यावेत. आणि मग पाण्यातून काढून पेपर टॉवेल वर टाकावेत.
५. १० मिनिटांनी ते पूर्ण कोरडे झाले की, तेल कडकडीत गरम करून त्यात तळून घ्यावेत. ते तळले गेले की, आपण नेहमी खातो तशा फ्रेंज फ्राईज सारखा रंग येतो. साधारण गुलाबी किंवा लाईट ब्राऊन ..म्हणू शकतो.
६. फ्राईज तेलातून बाहेर काढून पेपर टोवेल वर टाकावेत आणि लगेचच त्यावर मिठ भुरभुरावे आणि बाऊल किंवा जे काही भांड असेल त्यात वर उडवून म्हणजे टॉस करून ते मीठ सगळीकडे नीट लागेल याची काळजी घ्यावी. केचप सोबत खावे..
लेकासाठी मी हे फ्राइजचे प्रकार करून पाहिले..आणि एकदाचे जमले. :)
- प्राजु
वाचने
11305
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तं!
स्पर्धा
मस्त!
धन्यवाद..
हळद.
मस्त.
यस्स..
अगदी असेच
In reply to यस्स.. by स्वाती दिनेश
वा..
सुंदर
मस्तच.
पिझ्झा बेस
In reply to मस्तच. by शितल
पिझ्झा बेस आणि पिझ्झा
In reply to पिझ्झा बेस by ३_१४ विक्षिप्त अदिती
मध का बरं??
In reply to पिझ्झा बेस आणि पिझ्झा by प्रियाली
मध नेमकं का ते माहित नाही ;-)
In reply to मध का बरं?? by प्राजु
अगं हो..
In reply to मध नेमकं का ते माहित नाही ;-) by प्रियाली
पिझ्झा बेस
In reply to अगं हो.. by प्राजु
यीस्ट..
In reply to मध नेमकं का ते माहित नाही ;-) by प्रियाली
पिठात डायरेक्ट
In reply to यीस्ट.. by प्रभाकर पेठकर
>> यीस्टची
In reply to पिठात डायरेक्ट by प्रियाली
अगं ..
In reply to पिठात डायरेक्ट by प्रियाली
मस्त फोटो.
In reply to अगं .. by प्राजु
फक्त फोटो दाखवू नका ........
In reply to अगं .. by प्राजु
ही ही ही
In reply to फक्त फोटो दाखवू नका ........ by अद्वैत जोशी
तु कुठे आहेस?
In reply to पिझ्झा बेस आणि पिझ्झा by प्रियाली
एक टीप
In reply to पिझ्झा बेस आणि पिझ्झा by प्रियाली
तू देत रहा प्राजू
कसला क्लास फोटो दिला आहेस प्राजु.
बाटाट्याच
अप्र् तीम
फ्रेंच फ्राईज भाजी
फ्रेंच फ्राइज