Skip to main content

सूर्यास्त

लेखक नीधप यांनी रविवार, 21/09/2008 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
गुवाहाटी ते कलकत्ता विमानप्रवासात काढलेला फोटो. कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे. कॅमेरा सेटिंग्ज सीन वर होती. बाकी काही लक्षात नाही.

आयफोन्स वर मराठी वाचण्यासाठी २.१ अपग्रेड आवश्यक आहे

लेखक निनाद यांनी रविवार, 21/09/2008 05:54 या दिवशी प्रकाशित केले.
मोफत फर्मवेयर २.१ टाकण्यासाठी हे करू शकता. आयट्युन्स मार्फत, आयफोन/पॉड वर नवीन फर्मवेयर टाकण्यासाठी ऍपल पैसे मागते. पैसे देऊन २.१ ला अपग्रेड करून घेणे. :) अथवा परंतु तुमच्या ओळखीच्यांपैकी कुणाकडे आयट्युन्स मध्ये डाऊनलोड केलेली नवीन २.१ प्रणाली असेल तर तीच तुम्हालाही टाकता येते. टप्पे
  • नवीन २.१ प्रणाली त्या व्यक्तीच्या आयट्युन्स - संगणका मार्फत टाका. (तुमचा सर्व डाटा जाईल - आधी बॅक अप घ्या!)
  • त्या नंतर फोन तुमच्या संगणकावर जोडा - तो कदाचित ओळखणार नाही.

सरफरोशी की तमन्ना

लेखक अनिरुद्धशेटे यांनी शनिवार, 20/09/2008 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
सरफरोशी की तमन्ना, अब हमारे दिल मे है, देखना है जोर कितना, बाजुए कातिल मे है ! करता नही दुसरा, कुच बातचीत, देखता हु मै जिसे वो तेरी मेहफिल मे है ! ए शहिदे मुल्के-मिल्लत मै तेरे उपर निसार, अब तेरी हिम्मत का चर्चा, गैर की मेहफिल मे है ! वक्त आने पे बता देन्गे, तुझे ए आसमा, हम अभीसे क्या बताए, क्या हमारे दिल मे है ! खीन्चकर लाइ है सबको, कत्ल होने की उम्मीद, आशिको का दम, घुटते हुए कातिल मे है ! देखना है जोर कितना, बाजुए कातिल मे है सरफरोशी की तमन्ना, अब हमारे दिल मे है, देखना है जोर कितना, बाजुए कातिल मे है !
Taxonomy upgrade extras

टोचणी-२ (अंडरटेकर)

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 20/09/2008 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
टोचणी १ अर्धवट होता. तेव्हा पुर्ण करायला धीर झाला नाही. आज तो पुर्ण करत आहे. मला पायलट व्हायचे होते. ९वी १०वी व ११वी त सुट्टीत काम करुन ऍड्मिशनचे सुरुवातीचे पैसे जमा केले होते. त्यात ११वी च्या घशघशीत स्कॉलरशीप चा समावेश होता. आई गेली आणि स्वप्न कोमेजले. आई २ एप्रिल १९७२ ला पहाटे गेली. वडिलांच्या मांडीवर प्राण सोड्ले गीता वाचता वाचता. वडिल गेले बरोबर १२ वर्षांनी २ एप्रिलला बरोबर त्याच वेळी. आम्ही भावंडे हा योगायोग मानत नाही. जाणकारानी प्रकाश टाकावा. आई गेल्याचा निरोप आला स़काळी ७ वाजता. मी झोपेत होतो.

मैत्री व प्रेमातील फरक ओळखा

लेखक पारोळेकर यांनी शनिवार, 20/09/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
विकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी. कॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे ते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी सोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते एकमेकांना करत असत. कोणालाही अभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करत असत. प्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण यायची ती विक‍ीची आणि विकीचा इतर मित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता. विकी व प्रियाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच असायचे.