चांगला प्रश्न आहे. खरं सांगायचं तर माहित नाही आणि हा पर्यात कौलात असावा असंही वाटतं. त्यामुळे मत दिलेलं नाही. किमान शहरांमधूनतरी जातीयतावाद खूप कमी झालाय असं वाटतं, पण खैरलांजीसारखी प्रकरणं होतात आणि वाटतं आपण नक्की कुठे जात आहोत? अजूनही बराच काळ जावा लागेल जातीयतावाद संपूर्ण हद्दपार व्हायला असं वाटतं.
पण मनापासून वाटतं की जातीयतावाद हद्दपार व्हावा.
भारतीय समाजातून जातीयवाद हद्दपार होईल असे आपणास वाटते का?
जात ही हद्दपार होणार नाही असे वाटते. भविष्यात जाती-धर्म हेच प्रमुख अस्मितेचे विषय असतील. निरपेक्षतेच्या गोष्टी करणारा कितीही लिब्रल वाटत असला तरी त्याच्या मनातून जात ही जात नाही. जिथे चातुर्वण्य व्यवस्था आली तिथेच मनात आणि जनात जात जन्माला आली. आणि येत्या काळात प्रत्येकाला आरक्षण हवे आहे, त्याबरोबरच असुरक्षीत वाटत असणार्या समुहाला जातींची गरज प्रचंड असणार आहे, तेव्हा जाती-जाती अधिक प्रवाही, प्रभावी होत असतांना, जातीयवाद हद्दपार होण्याची स्वप्ने पाहणे सध्यातरी वेडेपणाचे ठरेल.
सदरहू कौलात लेखकाने आपले स्वतःचे मत मांडलेले नाही. हे मनाला पटत नाही. असा कौल घ्यावा असे का वाटले/सुचले? ह्यावर काहीतरी विवेचन असायला पाहिजे होते. त्याच बरोबर विचार करण्यासाठी काही कालावधी द्यायला हवा होता. ५००० वर्षां नंतर काय परिस्थिती असेल हे मी आज कसे सांगू. माझी तेवढी कुवत नाही. (तेवढी काय, १०० वर्षांनंतरचेही सांगू शकत नाही, असो).
आपल्या समाजात प्रत्येकाच्या जात/धर्माची एक घट्ट वीण आहे. शहरातील धावत्या जीवनशैलीत जात/धर्माला गौण स्थान प्राप्त झाले असले तरी शहरी भागातूनही जातीयवाद नष्ट झाला आहे असे म्हणणे भाबडेपणाचे ठरावे.
'जाता जात नाही ती जात' असे कोणीतरी म्हंटले आहे. शिक्षणाचा प्रसार, वाचन आणि घरातले संस्कार ह्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरावा. सरकारी धोरणे 'जात नष्ट व्हावी' ह्या दिशेने नाहीत असेच म्हणावे लागेल.
'जातीयवाद नष्ट झाला पाहिजे' असे मनापासून वाटणार्या शक्ती आणि 'जातीयवादाच्या आधारेच आपला स्वार्थ साधता येईल' अशा विचारसरणीच्या शक्ती ह्यांच्यातील द्वंद्व आजतरी तुल्यबळ वाटते आहे. 'स्वार्थी ' शक्तींची ताकद जस जशी कमी होत जाईल तस तसा जातीयवाद नष्ट होण्यास सुरुवात होईल असे वाटते. ह्या साठी किती वर्षांचा कालावधी लागेल ह्याचा अंदाज बांधणे अशक्य आहे.
कालावधी द्यायला हवा होता. ५००० वर्षां नंतर काय परिस्थिती असेल हे मी आज कसे सांगू.
सहमत आहे. पण...
पुढे दोनशे वर्षानंतर कदाचित जाती व्यवस्था नष्ट होईल असे ग्रहीत धरले तर तसे होण्यासाठी त्याची कुठे तरी पायाभरणी आज व्हायला हवी आहे. म्हणजे जातीविरहीत समतेचा विचार आज घरोघर जायला नव्हे रुजायला हवा होता, पण तशी परिस्थिती आज नसल्यामुळे दोनशे वर्ष पुढे स्वप्न पाहणे अतिशियोक्तीचे होईल. त्याचे कारण आमच्यापुर्ते आम्ही असे घेतो की, हजारोवर्षापासून असलेली जातीव्यवस्था ज्यांनी टिकवून ठेवली, ( संस्कृती,समाज,परंपरा, रुढी, इ.इ.) किंवा टिकवली गेली आहे. (क्षमा असावी ) ते पुढील काही वर्ष इतक्या सहजासहजी बदल होऊ देतील का ? असो,.....पाच हजार वर्षानंतर काय होईल हे नक्कीच आज तरी सांगता येणार नाही.
कधीच नाही ला मत दिले आहे.
२५ वर्षांपुर्वीपेक्षा आज जातीचा जास्त महत्व आहे.
* सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो *
(सध्या मी कन्नु मलिक ची गाणी ऐकतोय.)
असे का वाटले म्हणजे. भारतात जातीयता नाही आहे का? सर्वांना माहीत आहे की हा देश जातीजातीने पोखरलेला आहे . आणि समाजशास्रज्ञ ही सांगू शकत नाहीत की भारतातून जातीयता कधी नष्ट होणार ते.
स्वातंत्र्यपुर्व काळात जेवढी सामाजिक क्रांती अथवा समाजसुधारक भारतात झाले तेवढे स्वातंत्रोत्तर काळात झाले नाही हे आपले दुर्भाग्य. आताचे राजकीय वातावरण बघता प्रत्येक जातीच्या राजकीय महत्वकांक्षा वाढू लागल्या आहेत.
आपला
कॉ.विकि
असे का वाटले म्हणजे.
हा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन कळले नाही. असा कौल घ्यावा असा विचार अचानक मनात का आला? ह्या वर काहीतरी विवेचन अपेक्षित होते. हे मी माझ्या प्रतिसादात स्पष्ट केले आहे.
भारतात जातीयता नाही आहे का? सर्वांना माहीत आहे की हा देश जातीजातीने पोखरलेला आहे
माझा छोटासाच प्रतिसादही आपण पूर्ण वाचलेला दिसत नाहिए.
आणि समाजशास्रज्ञ ही सांगू शकत नाहीत की भारतातून जातीयता कधी नष्ट होणार ते.
मग मी काय सांगणार? माझ्या सारख्या सामान्य माणसाकडून काही उत्तर अपेक्षिणेही चूकीचे आहे.
स्वातंत्र्यपुर्व काळात जेवढी सामाजिक क्रांती अथवा समाजसुधारक भारतात झाले तेवढे स्वातंत्रोत्तर काळात झाले नाही हे आपले दुर्भाग्य.
खरे आहे. पण समाजाचा दर्जा स्वातंत्र्योत्तर काळात सुधारला आहे. शिक्षणाचा प्रसार शहरांमधून चांगलाच आणि खेडोपाडीही बराच झाला आहे. विचार करायची ताकद वाढली असताना वेगळ्या समाजसुधारकांची गरज का भासावी? जाती-पातींचा प्रश्न बाजूला ठेवूया. ह्या विचार करण्याची ताकद वाढलेल्या शहरात सामाजिक जबाबदारी किती जणांना समजते. वाहतुकीचे प्रश्न एवढे भयंकर का होतात? पोलीस नसतानाही रहदारीचे नियम लोकं का पाळत नाहीत? जिथे एवढुसे सामाजिक भान आम्हला नाही तिथे जात-पाती सारख्या अतिगहन विषयावर कृतीची अपेक्षा ठेवणं वेडेपणाचे आहे, असे मला वाटते.
आताचे राजकीय वातावरण बघता प्रत्येक जातीच्या राजकीय महत्वकांक्षा वाढू लागल्या आहेत.
हा मुद्दा माझ्या आधीच्या प्रतिसादात स्पर्शीला आहे.
धन्यवाद.
व्हावा असे वाटते. पण होईल असे वाटत नाही. पण होणारच नाही असेही नाही. विषयांतर नको म्हणुन अधिक लिहीत नाही. आरक्षण यावर चर्चा मिपावर झाली आहेच. आजचा सुधारक या वैचारिक मासिकालाही मिपाची दखल प्रतिक्रिया म्हणुन घ्यावीशी वाटली.
प्रकाश घाटपांडे
माझ्या मते या देशात कधीही जातीयवाद हद्दपार होणार नाही.
त्यासाठी आंतर जातीय विवाहाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे (तरीही जातीयवाद कमी होईल असे वाटत नाही ). शहरात जातीयवाद कमी झाला असे आपण म्हणतो पण तो वरचेवर मनातून जात जाता जात नाही. कितीही उच्चशि़क्षीत असो लग्न करताना तो आपल्याच जातीचा मुलीचा/मुलाचा विचार करतो (त्यासाठी वाचा लोकसत्ता रविवार वृत्तांत यात लग्नाची स्थळे असतात तथाकथीत उच्चजातीय म्हणतात (एस.सी,एस्,टी,ओबीसी क्षमस्व) ओबीसी म्हणतात एससी,एसटी क्षमस्व) अश्याने जातीय वाद अथवा जाती कश्या नष्ट होणार. प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान . जाती नष्ट करण्यासाठी ग्रामीण भागातील ह्या जातीचा वाडा त्या जातीचा वाडा ही पध्दत सरकारने पुढाकार घेऊन बंद केला पाहीजे.
आपला
कॉ.विकि
आंतर्जातिय विवाहासंबंधात (बेटबंदी, रोटीबंदी) आणि एकंदरीतच सात बंद्यांसंबंधात सावरकरांचे लिखाण वाचण्यासारखे आहे. आंतर्जातिय विवाह होणे गरजेचे आहे पण ते मारून मुकटून होऊ शकणार नाहीत.
जातीचा उपयोग करणे हे सर्वांनीच बंद करण्याची गरज आहे. (हे मी राखीव जागा संदर्भात म्हणत नाही, ती वेगळी चर्चा आहे). सरकारी फॉर्मवर जशी जात/धर्म लिहीण्याची अनाठायी गरज नको तसेच वृत्तपत्रांनी जातीच्या अटी असलेल्या लग्नाच्या जाहीराचा छापायला बंदी केली पाहीजे असे वाटते.
बाकी जातीयवाद जाण्यासाठी आधी प्रत्येक जातीच्या सुशिक्षितांनी आधी जातीचा चष्मा आणि उल्लेख जनातून आणि मनातून वापरणे थांबवणे गरजेचे आहे.
बाकी अजून नंतर...
जातीयवाद हद्दपार होईल म्हणजे जातीविरहीत एक समाज निर्माण होईल असे म्हणायचे आहे की जाती-जातीतील कटुता हद्द्पार होईल असे म्हणायचे आहे?
जातीविरहीत एक भारतीय (किंवा हिंदू म्हणा हवा तर) समाज निर्माण कधीच होणार नाही. जाती ह्या राहतीलच.
पण जाती-जातीतील उच्च्नीचता आता लगेचच नाही पण येत्या काही शतकात (दशकात नव्हे) कमी कमी होत जाईल, असे वाटते (विशफूल थिंकिंग?)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुनीलरावांशी सहमत आहे. जातीजातीतील कटुता हद्दपार होणार आहे. वेगाने होणारे शहरीकरण जातीपातीतील कटुता हद्दपार करण्यास कारणीभूत होईल.
मात्र त्यासाठी सुधारणांचा भडिमार करणे आवश्यक आहे. वरवर कटु वाटणारे निर्णय मोठ्या प्रकारे समाजाला ढवळून काढणारे असतात.
आपला,
(आशावादी) आजानुकर्ण
जातीविरहीत एक भारतीय (किंवा हिंदू म्हणा हवा तर) समाज निर्माण कधीच होणार नाही. जाती ह्या राहतीलच.
खरे आहे. बर्याचदा धर्मांतराला प्रोत्साहन देणारे, विशेष करून ख्रिश्चन मिशनरीज आणि मुस्लीम संघटना ह्या हिंदू धर्मातील तथाकथीत कनिष्ठ जातींच्या लोकांना आमच्यात जात कशी नाही ते सांगतात. पण एकदा का धर्मांतर केले की त्यांचा आकडा फुगतो पण जे धर्मांतर करतात त्यांच्यावरील जातीचा शिक्का आणि त्याबरोबर मुळातून असलेले भेद हे तसेच नवीन धर्मातपण रहातात. - थोडक्यात "जात" हा प्रकार भारतीयांच्या नसानसात आहे. तो जातीभेद आणि त्याहूनही अधिक अस्पृश्यतेमुळे अधिकच अक्षम्य झाला होता/अजूनही आहे.
पण भारतीयांच्या बाहेर जाऊन बघूया- पाकीस्तान अगदी "शुद्ध" (पाक) इस्लामी राज्य, पण तेथील मुस्लीमांना अरब मुसलमान कमीच लेखतात. तीच व्यथा इस्लामीक रीपब्लीक ऑफ बांग्लादेश च्या मुसलमानांची.
वर्णभेद, वंशभेद, लिंगभेद आणि राष्ट्राधारीत (म्हणजे कुठल्या देशातील मूळचा) यावर आधारीत भेद असे ज्याला जन्मावर आधारीत भेद आहेत (त्यात धर्म येत नाही, पण तो पण भेद आहेच) त्यांच्या गोष्टी अमेरिकेपासून सुदान पर्यंत पहायला मिळतात.
थोडक्यात हा मानवी स्वभावाचा आणि कळपाचा एक विशेष आहे. त्यावर १+१=२ इतके सोपे उत्तर नाही. म्हणून सरकारी हस्तक्षेप आणि स्वतःला सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजणार्यांचा पुढाकार याने जाती जरी राहील्या तरी जातीयता आणि जातीभेद कमी कमी होऊ शकतील - इतके की आपण मान्य करू शकू आता जातीभेद नाही..
आज विचार करा, दक्षिणेतील राज्ये स्वतःला वेगळे समजायची त्याची इंटेंसिटी ही ५० च्या दशकातली आणि २१व्या शतकातली यात फरक पडला आहे. भाषाद्वेष बर्यापैकी कमी झाला आहे, "आम्ही द्रविड" असे म्हणणारे महाभाग आजही असले तरी त्यांची संख्या, क्षमता आणि त्यांना गांभिर्याने घेणारे ह्यांच्यात खूप तफावत आहे. याचे मुख्य कारण, उद्योगधंदे आणि अर्थशास्त्राने केलेली चांगल्या अर्थी उलथापालथ ज्यामुळे सर्व भारतीय वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचा प्रांत सोडून राहू लागले. ते होत असताता घर्षण नक्की झाले पण हळूहळू "गिव्ह अँड टेक" पण होऊ लागले. विचार करा ६०च्या दशकातील दाक्षिणात्यांच्या विरोधातील मुंबईची चळवळ आणि आज त्यांच्या विरोधात काय आहे ते. तसेच त्या काळातील स्वतःला वेगळे ठेवणारे दाक्षिणात्य आणि आजचे मुंबईकर दक्षिणात्य... शिवाय त्यात "मराठीने केला मद्रासी भ्रतार" आणि "उलट" होवून अनेक (विविधप्रांतीय) मिश्रणे तयार झाली... त्याचा चांगला उपयोग होत आहे. तसे होणे चांगले आणि अधिकाधिक (जबरदस्तीने नाही पण) होणे महत्वाचे आहे. तेच जातीव्यवस्थे संदर्भात म्हणता येईल. तसेच शतशः आभार बॉलीवूडचे आणि त्यातही लता-आशा-किशोर-रफी यांचे! :-) कधीकाळी लता-आशाला, "ये घाटी लडकीया हिंदी गाना क्या गा सकेंगी" असे दिलीप कुमार म्हणाला होता. आज ह्या घाटी त्याच्या इतक्याच बुढ्ढ्या होऊन देखील गात आहेत...
तरी देखील समाजातील विविध भेद (फक्त भारतातील जातीभेदच कशाला?) १००% जायला पाहीजे असे म्हणणे आदर्श असले तरी काल्पनीकच आहे. त्यावर सामाजीक आणि कायद्याने बंधने आणून आणि लोकशिक्षणाने त्यांचे महत्व अथवा वाईट परीणाम कमी करणे मात्र १००% शक्य आहे. पण ते "रेडीओऍक्टीव्ह डिके" सारखे "ऍसेम्प्टोटीक" नक्कीच करता येईल. कारण शेवटी, "ऍसेम्प्टोटीक ग्राफची" एक बोलकी व्याख्या याला चपखल लागू होते: "एव्हर ऍप्रोचेस बट, नेव्हर रीचेस!"
तुमचा प्रश्न अनेक प्रश्न उभे करणारा आहे.याचे उत्तर आपल्याकडेच आहे.जे फक्त हो किंवा नाही असे देता येत नाही . नेहमी सकारात्मक विचार करावा . म्हणुन मला वाटते़ की आंतरजातीय विवाह व्हायला हवेत.विवाहासाठी जाती न पाहता इतर आवश्यक बाबींना महत्व दिले जावे.म्हणजे जातींचा प्रश्नच उरणार नाही.
प्रत्येक अर्जावर जाती-धर्माचा तपशिल आवर्जुन विचारला जातो आहे. मग जातियवाद मिटेलच कसा? मुळात तो मिटावा अशी कोणत्याही राजकिय पक्षाची अजिबात ईच्छा नाही. अहो सगळे सारखे झाले तर कसे होणार? सवलती कोण कुणाला देणार? हातातल्या सोयी सवलती फुकाफुकी कोण सोडेल? हातातले मतदार संघ व एक गठ्ठा मते कोण सोडेल?
नाहीला मत दिले!
व्होटबॅन्केच्या राजकारणात तयार झालेली व होऊ घातलेली आरक्षणाची धोरणे बघता तर उरलीसुरली आशा देखिल नष्ट होते!
आणि मी म्हणतो, जातीभेद नष्टच का करावा? कुणाचा त्यामुळे फायदा हे? कुणाचा तोटा?
त्याऐवजी प्रत्येक जातीला "मानसन्मान" मिळेल असे बघितले तर?
आन्तरजातीय विवाह वगैरे गोष्टीन्नी फारस काही साध्य होणार नाही! जे आन्तरजातीय विवाह झालेत, त्यान्ची उदाहरणे, त्या त्या जोडप्याची परिस्थिती फारशी भुषणावह नाही, मग ओढून ताणून मोट का जुळवावी ?
विवाहान्च्या बाबतीत तर, विशिष्ट जातीन्मध्ये/समाजामध्ये दरहजारी मुलान्मागे मुलीन्चे प्रमाण लक्षणीय रित्या कमी होत जात आहे, त्याचे परिणामस्वरुप म्हणून इतर जातीन्च्या (खास करुन उच्चभ्रु वरिष्ठ जातीन्च्या) मुली लग्नासाठी हव्यात असा आग्रह तर नाही ना तयार होत?
प्रश्ण अनेक हेत! शोधा उत्तरे! अन जमल्यास आम्हाला सान्गा! :)
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
नाही ला मत दिले आहे !!
भाबडा आशावाद बाळगण्यात अर्थ नाही ......
बैलोबा चायनीजकर !!!माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
सरकार जोवर जाती निहाय निवडणुका/ नोकर्या / व इतर गोष्टींची उपलब्धता करुन देत असेल तोवर तरी जात संपणार नाही.
महाराष्ट्रात सध्या नष्ट होत चाललेली जाती प्रथा सरकारमुळे टिकुन आहे
तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
अर्थातच नाही.
जो पर्यंत आपली नेते मंडळी जातीय वादाचे भांडवल करायचे थांबवणार नाहीत आणि हि 'आरक्षण' पद्धत बंद होत नाही तोवर काही अपेक्षा ठेऊ नका.
आपला
आर्य
एक मुलगा त्याच्या आई-बाबांबरोबर समुद्रावर खेळायला जातो. खेळताना हाताची पाची बोटं वाळूत रुतवतो आणि पाच रेघा मारतो. अर्थात, काही रेघा जाड येतात काही बारीक. पण सगळ्या रेघा अगदी रेखीव असतात, एकत्र छान दिसत असतात. आणि मग हा मुलगा आणि त्याचे आई-बाबा पुढे जातात. तेवढ्यात एक दुसरा मुलगा येतो, तो या रेघा बघतो आणि म्हणतो, "ती जाड रेघा आहे ना, ती एकदम मस्त आहे, तिचं लाटांपासून रक्षण केलं पाहिजे." म्हणून जाड रेघेच्या बाजूला वाळूची तटबंदी बनवायला लागतो आणि या प्रयत्नात बारक्या रेघा पुसल्या जायला सुरूवात होते. रेघा बनवणारा विरोध करायला नसतोच तिथे, त्यामुळे हा दुसरा मुलगा जे काही करत असतो ते होऊन जातं. थोड्या वेळानी वारा आणि पाण्यामुळे सगळ्या रेघा नष्ट होतात, शेवटी उरते फक्त वाळूची तटबंदी!
विक्षीप्त देवी !!!
फूल २ डोक्यावरून गेली तुमची इष्टोरी !!
वाळू , रेघा, लाटा .....बाप रे !!
( माझ्या डोक्यात पण वाळू गेली की काय ?)
बैलोबा चायनीजकर !!!माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
खरं सांगायचं तर माहित नाही
कधीच नाहि
'होय'ला मत
'कधीच नाही' ला मत
काळाचे बंधन...
कालावधी पाहिजे होता.
In reply to काळाचे बंधन... by प्रभाकर पेठकर
कधीच नाही
In reply to कालावधी पाहिजे होता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पेठकर काका
In reply to काळाचे बंधन... by प्रभाकर पेठकर
असे का
In reply to पेठकर काका by विकि
मत
आंतर जातीय विवाह
काही अंशी उपाय
In reply to आंतर जातीय विवाह by विकि
नेमके काय म्हणायचे आहे?
सहमत आहे
In reply to नेमके काय म्हणायचे आहे? by सुनील
सहमत
In reply to नेमके काय म्हणायचे आहे? by सुनील
सुनिलसाहेब
आपणच ठरवायचं
आंतरजातीय विवाह..
In reply to आपणच ठरवायचं by उर्मिला००
शक्य नाही
नाही
नाही ला मत
जाती प्रथा सरकारमुळे टिकुन आहे
अर्थातच
आर्य
एकदा काय होतं ...
In reply to आर्य by विकि
विक्षीप्त
असे कधीच होणार नाही.
समाजात.......जात !
व्हायलाच