Skip to main content

संवेदना

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 22/09/2008 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
'बॉम्बब्लास्ट' सिनेमा पाहताना त्यातील एक दृष्य. बॉम्बस्फोटानंतर जखमी/मृत व्यक्तीच्या देहांकडे पाहताना रोनित रॉयला उलटी होते. माझा एक मित्र म्हणाला,"खरं तर पोलिसांना हे नको व्हायला." त्यावर दुसरा मित्र म्हणाला,"का? तो ही माणूसच आहे." आधीचे आठवत नाही पण तेव्हापासून असले काही प्रसंग पाहिले/ऐकले की पोलिसांबद्दल,डॉक्टरांबद्दल विचार मनात येतात, 'असं सारखं सारखं बघून त्यांच्या संवेदनावर फरक तर नसेल ना पडत?' 'अब तक छप्पन' किंवा तत्सम सिनेमे पाहताना माझ्या बहिणीचे वाक्य आठवते. ती ही म्हणाली की नेहमी आपण असे पाहले तर नंतर आपल्याला त्याची सवय होऊन जाईल. आज काल तेच अनुभवायला मिळतंय.

थॅन्क्स बट नो थॅन्क्स

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 21/09/2008 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर फिरताना दिसले.मला बघून खूष झाले. मला म्हणाले, " खूप दिवसानी दिसला तुम्हाला बघून बरं वाटलं." मी पण त्याना म्हणालो, "भाऊसाहेब,मला पण तुम्हाला बघून खूप आनंद झाला" मी पुढे त्यांना म्हणालो, "तुमचा चेहरा जरा उतरलेला दिसतो,बरं आहे ना तुम्हाला?" त्यावर भाऊसाहेब म्हणाले, "आता बरं काय आणि वाईट काय जो जातो तो दिवस आपला.सकाळी उठल्यावर जर का प्रकृतीने काही कुरकुर केली नाही की समजावं खाही खरं नाही.पण ते जाऊ दे तुमची कविता काय म्हणते?

हृदयांत सागराच्या..

लेखक प्राजु यांनी रविवार, 21/09/2008 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
हृदयांत सागराच्या फेसाळतात लाटा खडकांत फेनफुलेही शोधित जात वाटा खेळांत गलबताच्या लाटांचाही झिम्मा अस्तास भास्कराच्या क्षितिजावरी रक्तिमा ओठांत शिंपलीच्या मोत्याचेच गाणे किनार्‍यावरी सांडले सोनियाचे दाणे जातात पाऊले गं तिरपी कोण कशी?? खेकड्याची चाल रेतीवरी नक्षी घेताच खोल श्वास वारा ओशाळला धुंदीत यौवनाच्या क्षारात गंधाळला रात्रीस साथ देई खर्जातली गाज चंदेरी पाण्यावरी चढला रूपेरी साज.. का संथ चालला गं हा चंद्र अस्ताकडे प्रेमात तो ही घाली लहरींना साकडे उदयांस भास्कराच्या सागर मंत्रावला ओल्या वाळूवरी शिंपला दवांत भिजला - प्राजु

कलेचा बाजार....

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 21/09/2008 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मी एकंदरीतच दूरदर्शन आणि त्यावरचे रिऍलिटी शोज फारच कमी पाहातो, किंबहुना पाहातच नाही. आज साला सन्डे होता. दुपारी जेवल्यावर सहज म्हणून दूरदर्शन संच सुरू केला. ष्टार प्लस वाहिनीवर कुठलीशी एक जोडी एका ध्वनिमुद्रणावर नाचत होती. प्रेक्षक मंडळी बसली होती. तीन परिक्षक तो नाच बघत होते. (नंतर मला कळले की त्या कार्यक्रमाचे नाव 'आजा माहिवे..' असे होते.) "अच्छा! म्हणजे नृत्याच्या कुठल्याश्या स्पर्धा सुरू दिसताहेत. बघुया तरी..!" असा मनाशी विचार करून मी तो कार्यक्रम पाहाणे सुरू ठेवले.

स्वरगंधर्व बाबूजींवर वेबसाईट

लेखक मंदार धारप यांनी रविवार, 21/09/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
'बाबूजी' म्हणजे सुधीर फडके हा साक्षात्कार मला साधारण वयाच्या सातव्या - आठव्या वर्षी झाला. शब्दकोडे सोडवताना प्रश्न होता,''गीत-रामायणाचे संगीतकार''. दादा काकांना विचारलं तर ते म्हणाले, '' सुधीर फडके''. मी म्हणालो, '' तीन अक्षरी शब्द आहे आणि तिसरं अक्षर जी आहे''. काका म्हणाले, '' बाबूजी''. प्रत्येक सर्वसामान्य मराठी कुटुंबाप्रमाणे आमच्याकडेहि सगळे बाबूजीभक्त होते. मी त्यांचं ऐकलेलं पहिलं गाणं म्हणजे ''विठू माउली तू माउली जगाची.....''. नंतर नंतर रविवारचे चित्रगीत आणी मराठी चित्रपट पहायला लागल्यावर मला जवळ जवळ ८० टक्के गाणी बाबूजींचीच दिसली.

छोटुश्शी खारूताई (प्रकाशचित्र)

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 21/09/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
उदयपूरच्या 'सहेलीयोंकी बाडी' या उद्यानातुन बाहेर पडत असता अचानक भिंतीच्या वरुन तुरुतुरु पळणारी ही छोटी खारूताई दिसली. सुदैवाने तिकडे कुणाचे लक्ष न गेल्याने तिकडे गजबज नव्हती, खारूताई मस्त बागडत होती. मी दबक्या पावलांनी भिंतीच्या जवळ गेलो आणि पुढे पळणारी खारूताई अचानक मागे वळली. क्षणभर ते गोल डोळे लुकलुकले आणि कान उभे राहीले. तिला काय वाटले कुणास ठाऊक पण ती न पळता अगदी स्तब्ध झाली. मी कॅमेरा सरसावुन चौकट साधली, खार पळत नाही म्हणताना अलगद झाडाच्या पारावर चढलो.

पुनेरि पाथ्या

लेखक सुधिर यांनी रविवार, 21/09/2008 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपन सर्व पुनेकराचा आवदिच विशय इथे घेत आहोत तो मन्जे पुनेरि पत्या "हि इमारत रन्ग्वन्याचे काम कुनालाही दिलेले नहि तरिहि पिच्कारि मारुन आपन इमारत रन्गवलि तर त्याचे गाल आम्हि रन्गउ शकतो"