Skip to main content

सुगरण ??

लेखक झकासराव यांनी सोमवार, 22/09/2008 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यतंरी कोल्हापुरला गेलो होतो. त्यावेळी चिमण्यांचा आकाराचे काहि पोटावर पिवळसर झाक असलेल पक्षी अचानकच दिसले. सहजच म्हणून घराच्या मागच्या बाजुला गेलो आणि बघतोय तर काय मला दिसली ही एक सुखी समृद्ध कॉलनी. तिच नाव बहुद्धा "आदर्श कॉलनी"च असेल बॉ. :) बघा बघा तुम्हीदेखील बघा. मग जरा ह्या कॉलनीतील रहिवाशी कसे आहेत आणि काय करत आहेत हे बघुया म्हणल तर हे महाशय दिसले. बहुद्धा मनातच म्हणत असतील, "छे एक घर असताना देखील ह्या आमच्या बयेन दुसर घर बांधायला सांगितलय. तिला काय जातय नुसतच सांगायला.

भास्करभाऊ

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 22/09/2008 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
शिवराम सखाराम प्रभू ऊर्फ भाऊ आजगांवकर हे माझ्या आईचे लांबचे भाऊ.आईच्या माहेरी त्यांच्या राहात्या घराच्या आजूबाजूला पण बरीच घरं होती त्यातपण अनेक आजगांवकर राहात.त्यापैकी हे एक आणि त्यांचेच नातेवाईक समजले जातं एव्हडंच.

आणि थोडी ओली फुले

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 22/09/2008 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्या लोकांनी त्यांचे फोटो इथे टाकले, मग माझ्या कॅमेय्राला फार वाईट वाटायला लागलं. मला तो "आत्मवृत्तात" (तेच ते, आपण शाळेत लिहायचो ते) सांगत होता की त्यालापण तो किती चांगला आहे ते दाखवायचं आहे. आणि खरडवहीतल्या फोटोची बरीच चौकशी झाली त्यामुळे फारच उल्हसित झाला तो! मग काय मी गेले हापिसाच्या मुख्य इमारतीच्या समोर आणि वेडीवाकडी वाकून त्याला बिचाय्राला कामाला लावलं (इतरांकडून काम करवून घेण्याची माझी जुनीच खोड हो!).

श्रावणझड

लेखक आनंदयात्री यांनी सोमवार, 22/09/2008 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजूबाजूला ... इकडेतिकडे .... सगळीकडे तुझ्याच आठवणी पसरलेल्या तुझी डायरी, तुझे पेन तुझा डेस्क अन बरेचसे असे तुझे काही प्रत्येक गोष्टीकडे पाहताना ... येणारा प्रत्येक संदर्भ तुझाच अन त्या संदर्भाबरोबर येणारी आठवणीची श्रावणझड माझीच ......... फक्त माझीच !! (लेखन इतरत्र पुर्वप्रकाशित. मिपाकर दोस्तांसाठी पुन्हा प्रसिद्ध करायचा मोह !)

ये कौन चित्रकार है ? ... अर्थातच किमयागार निसर्ग

लेखक दिपोटी यांनी सोमवार, 22/09/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
विविध रंगात उमललेल्या या फुलांकडे पाहून कॅमेरा हातात नाही घेतला तरच नवल ! Dutch Iris च्या निरनिराळ्या उपजातींची ही फुले वर्षातून जेमतेम २ आठवड्यांसाठी हा असा आपला पिसारा फुलवतात. या फुलाच्या पाकळ्या अतिशय तरल व मुलायम अशा असतात.

राज ठाकरे आणि प्रसारमाध्यमे

लेखक भोचक यांनी सोमवार, 22/09/2008 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषा, मराठी माणूस, राज ठाकरे आणि त्याला अनुषांगिक उपप्रकरणे जया, अमिताभ, युपी, बिहारी वगैरे वगैरे. या सगळ्या विषयांनी गेले काही महिने नुसते गाजवून सोडले आहेत. राज ठाकरे यांची बर्‍यापैकी पाठराखण मराठी प्रसारमाध्यमांनी (छापील आणि दृकश्राव्य दोन्ही) केली आहे. हिंदी व इंग्रजी मीडीयाने मात्र राज ठाकरे हा कुणीतरी गुंड असल्याचे चित्र उभे केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय पण हिंदी प्रांतातही राज नावाचा कुणीतरी एक राक्षस महाराष्ट्र नामे प्रांतात असून तेथे जाणार्‍या प्रत्येकाला तो मराठी बोलायला भाग पाडतो. 'जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी' त्याला फक्त मराठीच दिसते अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे.

कॉर्न कटलेट

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 22/09/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- ५ मध्यम आकाराचे बटाटे, १ वाटी मक्याचे दाणे-अमेरिकन पिवळे मके असतील तर उत्तमच, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, साधारण २ पेराएवढा आल्याचा तुकडा,४ ते ५ लसूण पाकळ्या,४ ते ५ ब्रेड स्लाईस,मीठ, तेल, ४ते ५ चमचे रवा कृती- बटाटे उकडून घ्या.

प्रेमालाप

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 22/09/2008 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियकर : प्रीये, तुझा चेहरा तर एखाद्या आरक्त कमळावर पडलेल्या दवबिंदू सारखा टवटवित दिसतो आहे. आणि मावळत्या सूर्याची कोवळी किरणे हलकेच त्याच्याशी लडिवाळपणा करीत आहे. आहाहा हा.. तुझ्याकडे पाहताना माझे भान कसे हरपून जाते आहे ! प्रेयसी : राजा, तुझे हे साहित्यिक बोलणे मला भारी आवडते. तुला या असल्या उपमा सुचतातच कश्या ते मला कळत नाही. प्रियकर : ते पहा प्रीये, तळ्यातल्या कमळफुलांनी कसा सुगंध या वातावरणात कोंदून भरला आहे. कमळाभोवती गुंजारव करणारे ते भ्रमर पहा कसे या कोमल समयाला उचित असा नाद करत आहेत. प्रेयसी : होय ना !

मैत्री...

लेखक कावळा यांनी सोमवार, 22/09/2008 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे अभिमान मैत्री म्हणजे जीवनातील जगण्याचा स्वाभीमान मैत्री म्हणजे प्रेम मैत्री म्हणजे जाणीव मैत्री शिवाय जीवनात आधाराची उणीव मैत्री म्हणजे विश्व मैत्री म्हणजे आकाश मैत्री म्हणजे तिमिरात वाट दावणारा प्रकाश मैत्री म्हणजे सुख दु:ख मैत्री म्हणजे हर्श मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा हळुवार स्पर्श मैत्री म्हणजे रान मैत्री म्हणजे कोवळे उन मैत्री म्हणजे जीव जडणारी सुमधुर वार्याची धुन मैत्री म्हणजे खेड मैत्री म्हणजे पायवाट मैत्री म्हणजे पिकाला पाणी पाजणारा मळ्यातील पाट मैत्री म्हणजे तेज मैत्री म्हणजे तारा मैत्री म्हणजे प्रत्येकाला हवा असणारा मोहक वारा मैत्री म्हणजे दि
Taxonomy upgrade extras