कोलंबीची आमटी
ही सारस्वत पध्दतीची आमटी शेवग्याच्या शेंगा घालून करतात... एक वेगळी चव!
४०० ग्रॅम सोललेली कोलंबी (धुऊन घ्यावी)
अर्ध्या नारळाचे खोबरे
१ वाटी नारळाचे घट्ट दूध
१ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला
१ शेवग्याची शेंग (४'' चे तुकडे करावे)
कैरीचा तुकडा - नाहीतर बोराएवढी चिंच
पाव चहाचा चमचा धने
४ मिर्याचे दाणे
४ सुक्या मिरच्या
हळद
मीठ चवीप्रमाणे
किंचित तेलात धने + मिरे + सुक्या मिरच्या परतून खोबर्याबरोबर वाटाव्या.
कोलंबी, कांदा, कैरी किंवा चिंच, शेवग्याच्या शेंगेचे तुकडे व हळद थोडे पाणी घालून शिजवा. कांदा पारदर्शक झाला की घने-खोबर्याचं वाटण व मीठ घालून मंद आचेवर पाच मिनिटे उकळवा.
मिसळपाव