Skip to main content

त्रिवेणींची वेणी

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 16/10/2008 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणी हा एक अनोखा काव्यप्रकार. चारोळ्या चार ओळींच्या तसे त्रिवेणी, हायकू तीन ओळींचे. त्यातही हायकूतल्या प्रत्येक ओळीतल्या अक्षरांच्या संख्येवर बंधन. कवीश्रेष्ठ गुलजारांच्या काही त्रिवेणींचा शांताबाई शेळक्यांनी केलेला अनुवाद आंतरजालावर वाचनात आला. 'साखळी हायकू' या आंतरजालीय खेळात सहभागी झालो होतो, तेव्हा त्रिवेणी जवळून पहायला व हाताळायला मिळाल्या.

दक्षिण भारतीय वडे..(नक्की नाव नाही समजलं)

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 16/10/2008 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्रामध्ये मी इथल्या साऊथ इंडियन ग्रुप मध्ये ललितासहस्त्रनाम वाचन करायला जात होते. तिथे प्रसाद म्हणून मिळणार्‍या पोंगल, खीर इ. गोड पदार्थांसोबतच हे वडे केले होते. मला आवडले. मी रेसिपी विचारून घेतली. खवय्ये मिपाकरांसाठी रेसिपी इथे देत आहे. तांदूळ - २ कप चणा डाळ- १ कप उडिद डाळ - १ कप. कडीपत्ता कोथिंबीर आलं साधराण १ इंच. (बहुतेक प्रसाद होता म्हणून लसूण घातला नसावा. आपण घालायला हरकत नाही) मिरच्या ४-५. धणे-जिरे पावडर २ टीस्पून मेथीचे दाणे १ टीस्पून ओवा चिमूटभर मिठ चवीप्रमाणे लाल मिरची पावडर आवडीप्रमाणे १. प्रथम डाळी , तांदूळ , आणि मेथीचे दाणे स्वच्छ धुवून ४ तास भिजत घालावेत. २.

(भलताच जाच!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 15/10/2008 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
अज्जुका यांची 'बिघडलीये काच' बघून अचानक आम्हाला कवितेच्या दोन-दोन प्रतिमा दिसायला लागल्या आणि मग दुसरी प्रतिमा टंकण्याखेरीज प्रत्यवाय उरला नाही!

बिघडलीये काच!

लेखक नीधप यांनी बुधवार, 15/10/2008 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीची काच बिघडलीये. दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली. एक साधंच एक डोळे वटारणारं. चोरून आणलेल्या चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे माझेच डोळे काचेत बसून रहातात. मी आक्रसत रहाते स्वतःला. त्याचा फोन.. एखादी धुंद आठवण.. एक गम्मतनाच.. जुनेपाने कपडे घालून वावर.. देहामनाची तगमग... सगळं सगळं त्या डोळ्यात टिपलं जातं. मी आक्रसत रहाते.. चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात खरंच बिघडलीये ही काच बदलली पाहिजे! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
Taxonomy upgrade extras

लपून रहाण्याची जागा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 15/10/2008 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई विशेष खूष दिसले.त्यांना जुन्या आठवणी आल्याने मला काहीतरी सांगावंसं वाटत होतं.मला म्हणाले, " सामंत ईकडे बसा.मी तुम्हाला एक गमतीदार आठवण सांगतो." मी म्हणालो, "भाऊसाहेब,मीच आज तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगतो" तरूण वयांत सैन्यात जाण्याचे खूप मनांत येत असतं.कदाचीत देशप्रेमाच्या आसक्ती पेक्षा युनीफॉर्मचा भप्केपणा, शिस्त आणि मान मिळतो त्याचच आकर्षण जास्त असावसं असं मला वाटतं.त्याचं असं झालं आमचा मोठा भाई,प्रभाकर त्यावेळी पंचवीस एक वर्षाचा होता.

...हमने इश्क किया है.(१)

लेखक रामदास यांनी बुधवार, 15/10/2008 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
झेंडूच्या उफाड्यावर दिवसभर, निलाजरी पुंडाई करणारा उनाड चतुर. नाईलाजाच्या वाटेने घरी येतो. तसा मी येतो तिनसांजेला. तेव्हा... तुझ्या ओंजळीतली गुलबाक्षी चिंबून गेली असते. बावळट... ***** अशीतशी इथे तिथे वाट बघू नको माझी. का? का? का?.. तुझ्या सात्वीक ओठाची गुलबाक्षी थरथर. (मी वसूल करतो माझी भ्रष्ट निराशा) का? काय बावळट.. का?..का? का? का?.. कारण.. का? का?.. कावळ्याची असते नजर -गस्त पिकत्या पपईवर.
Taxonomy upgrade extras

चिंतन

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 15/10/2008 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
अखंड चिंतन चालू असे चित्ति त्याला नाही मरण मेल्याविना नैसर्गिक आहे विचारांचे येणे त्याला थांबवया बहाणे शोधू नका येउदेत बापुडे कितीते विचार त्याचे प्रकार पाहू चित्ति बुद्ध म्हणे जना रहा अखंड सवधान कराहो अवलोकन स्वचित्ताचे....!
Taxonomy upgrade extras

पास ऑन

लेखक ब्रिटिश यांनी बुधवार, 15/10/2008 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
ल्हानपनी ईतीहासाच पुस्तक उगडाचू न सपनाचे गावान शिराचू तवा वाटाच क जाम म्होट व्हाचा न आभालान फीराचा अमिताभ बच्चनसारका सांगाचा 'मेरे पास बंगला हय, गाडी हय और मां बी' माजी आय कामाला जायची ते शेट ला सांगाचा 'तूम ईस फ्याक्ट्री के पचास लाख मांगते तो दे देता वो बी ' बालासायबांसारकी भाशनं ठोकाची शिवाजी पार्कान लोकांसाटी आक्का आयुश्य कराचा कुरबान वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न

कॅनव्हास

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 15/10/2008 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो,चित्र काढतो.
हृदयनाथांच्या आवाजात अशी सुंदर पदं ऐकतांना हलकेच डोळा लागावा अन कानावर पडणारे अमुर्त शब्द मुर्त व्हायला लागावेत. मानसीचा चित्रकार खरोखरीच अवतरावा अन त्याने स्वच्छ निरभ्र आकाशालाच त्याचा कॅनव्हास बनवावा. कल्पनेच्या कुंचल्याने सरासर त्याने हात चालवायला सुरुवात करावी अन कल्पनाचित्रांची जादुगरी त्या कॅनव्हासवर उतरु लागावी. साधी साधीशी रानफुले कुंचल्याच्या फराट्यातुन साकारु लागावीत, कधी नितळ वहाणारे पाणी दिसावे तर कधी उमटावे जाळीदार झालेले एखादे पिंपळाचे पान.

म्हणे कोण मागे आले...

लेखक आगाऊ कार्टा यांनी बुधवार, 15/10/2008 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
जोशी मास्तर हे गावातले एक बुजुर्ग आणि सदा हसतमुख व्यक्तीमत्व. आता मास्तर म्हणायाला ते काही शाळेवर शिक्षक नव्हते काही. ते होते गावातल्या पोस्टात पोस्टमास्तर. हजार बाराशे वस्तीचं ते छोटसं गाव त्यामुळे जवळजवळ प्रत्येकाशी मास्तरांचा नित्यनेमाने संबंध येत असे. कोणालाही चटकन मदत करण्याचा त्यांचा स्वभाव, त्यामुळे गावात त्यांना खूप मान होता. मास्तर नोकरीला लागले ते याच गावात. पत्नी आणि दोन मुले हा त्यांचा संसार. मुले गावातच लहानाची मोठी झाली आणि उत्तम पदवीधर होऊन बाहेर मोठ्या शहरात नोकरीला गेली. दोन चांगल्या सुस्वरुप आणि मुख्य म्हणजे सुस्वभावी मुली बघून मास्तरांनी दोघाही मुलांची लग्ने लावून दिली.