Skip to main content

चारोळ्या

लेखक mina यांनी सोमवार, 20/10/2008 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
परक्यांनाही आपलसं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही कोड पडावं अशी काही गोड माणसं असतात किती मोठ भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात !! ............................. ............................ काळाचे बांध फुटून जातात वाहून जाते पाणी तरिही मैत्रीचा अंकूर तग धरुन राहतो कारण भिजत राहतात त्या फक्त आठवणी ! ............................... ............................
Taxonomy upgrade extras

सचिन तेँडूलकर

लेखक व्यंकु यांनी सोमवार, 20/10/2008 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी सचिन तेँडूलकरचा मोठा भक्त आहे. सचिनने गेली दोन दशके आपलं वर्चस्व सिध्द केलंय. त्यातही अनेक वेळा दुखापतींनी डोके वर काढूनही आज तो तितक्याच कणखरपणे उभा आहे. दुखापतींनंतरही दमदार पुनरागमन करण्यात त्याचा हातखंडा आहे.

नान

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 20/10/2008 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ वाट्या मैदा, १ चहाचा चमचा ड्राय यिस्ट, १ चहाचा चमचा साखर, कोमट पाणी १/२ वाटी, १/२ चहाचा चमचा बेकिंग पावडर, १/४ च.चमचा मीठ, १ टेबलस्पून तेल, २ टेबल स्पून दही, २ टेबलस्पून दूध,थोडे बटर वरून घालण्यासाठी. कृती- एका वाडग्यात यिस्ट+साखर कोमट पाण्यात घालणे व उबदार जागी ५/७ मिनिटे ठेवणे. एका तसराळ्यात मैदा+बेकिंगपावडर+मीठ एकत्र करणे.त्यात तेल,दही,दूध घालणे, नंतर यिस्ट+साखरेचे मिश्रण घालणे व एकत्र करणे.

बटरचिकन

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 20/10/2008 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - ५०० ग्राम बोनलेस चिकन, २ ते ३ चमचे चिकन मसाला, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा हळद,१ चमचा तिखट, १/२ चमचा कसूरी मेथी (ऑप्शनल), १ पेराएवढे आले, ४ ते ५ लसूण पाकळ्या, १ चहाचा चमचा साखर, २ टेबलस्पून बदाम किवा काजू पावडर, १ मोठा कांदा, ५ ते ६ मध्यम लालबुंद टोमॅटो,१ चमचा टोमॅटो केचप, २ टेबलस्पून तेल, २ ते ३ टेबलस्पून बटर, पाऊण ते १ कप फ्रेश क्रिम,मीठ, कोथिंबिर सजावटीसाठी. कृती - चिकन स्वच्छ करुन लहान तुकडे करुन घेणे.आलं लसणीची पेस्ट करणे.च

चंद्रयान - शुभेच्छा!

लेखक विकास यांनी सोमवार, 20/10/2008 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या चंद्रयानाच्या उड्डाणाला आता केवळ बावन्न तास राहीले असून सोमवारी पहाटे काउंट डाऊन सुरू होणार आहे!

अगर तूम मिल जाओ...

लेखक फटू यांनी सोमवार, 20/10/2008 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
सहज तू नळी वर भटकत असताना "जहर" चित्रपटातील "अगर तुम मिल जाओ" या गाण्याचं पाकीस्तानी रुप पाहायला आणि ऐकायला मिळालं. हे गाणं त्यांच्या १९७४ साली आलेल्या त्यांच्या "इमानदार" या चित्रपटात होतं... गाण्याची मुळ गायिका तस्सवर खानुम... आवाज एकदम भारदस्त... श्रेया घोशालच्या गोड आवाजाहून पुर्णपणे वेगळा...

"माझी आई हाच माझा विश्वास."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 20/10/2008 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांच पालन-पोषण करण्यासारखं दुसरं कठीण काम नाही.साध्या भाषेत सांगायचं तर "माझी आई हाच माझा विश्वास." ह्यावेळेला मी कोकणात गणपति उत्सवासाठी गेलो होतो.माझ्या आजोळी गणपति आणतात.बरेच वेळी पाच दिवसाचा असतो. कोकण दर्शन ट्रॅव्हल एजन्सी तर्फे मी फार अगोदर तिकीट काढून ठेवलं होतं.दादरच्या ब्रॉडवे सिनीमा समोर ह्या बसचा स्टॉप होता.सकाळीच उठून जावं लागलं.माझ्या शेजारी एक सदगृहस्थ येऊन बसले.बस चालू झाली तसं आम्ही हॅलो,हाय करून बोलायला लागलो. गणपति उत्सवात कोकणात किती गर्दी करून लोक मजा करायला जातात.सगळे नातेवाईक एकत्र येऊन तो दीड दिवस किंवा ते पाच दिवस कसं गाणं वाजवणं,घरातच छोटे छोटे कार्यक्रम करून आपली क

मनसेचं आणखी एक आंदोलन..!!

लेखक mina यांनी रविवार, 19/10/2008 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
मनसेनं पुन्हा परप्रांतीयांवर आपली चढाई केली. मुंबई-कल्याण येथे आज रेल्वेची परिक्षा देण्यासाठी काही परप्रांतीय तरुण आले होते.महाराष्ट्रात होऊ घातलेल्या या परिक्षेला मराठी तरुण अत्यल्प होते.पहीले महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकरी द्या.या मागणीवरुन सदर आंदोलन करण्यात आले.त्यांनी चक्क त्या परप्रांतीय तरुणांना पळवून लावले आणि परिक्षेच्या ठिकाणी सवयीप्रमाणे तोड्फोड करुन मराठीला न्याय मिळावा अशी घोषणाबाजी केली.