Skip to main content

द याकूबियन बिल्डिंगच्या निमित्ताने...

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 24/10/2008 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
सदर चर्चा येथे टाकण्यापूर्वी मिपा व्यवस्थापनाची रीतसर परवानगी घेतली आहे.. परवाच एन्डीटीव्ही ल्युमिएर चॅनेलवर "द याकूबियन बिल्डिंग" (Arabic: عمارة يعقوبيان) हा चित्रपट दाखवला. इजिप्तमधली ढासळती नैतिक परिस्थिती दाखवणारी ही 'अला एल्-अस्वानी' यांची कथा कैरोतील एका बिल्डिंगमध्ये घडते.

नावात काय नाही?

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 24/10/2008 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच मला काही कामानिमित्त वासिलिकी नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधायचा होता (ह्या व्यक्तीचे आडनाव देवनागरीत टंकणे हे माझ्या आवाक्यापलीकडचे आहे!). ही व्यक्ती अमुक एका कंपनीत, अमुक एका विभागात, अमुक एका हुद्द्यावर काम करते आणि त्यामुळे मला हवी असलेली माहिती ही व्यक्ती देऊ शकते, इतकीच माहिती मला देण्यात आली होती. आता वसिलिकी ही बाई आहे की बुवा याचा कुणालाच काही अंदाज नव्हता. अर्थात त्यामुळे कामात काही फरक पडत होता असे नाही, पण उगाच एक उत्सुकता होती. माझ्या पुढे होता त्या वसिलिकीचा फोन नंबर आणि इमेल. मी फोन लावला. फोन काही वेळ वाजला आणि वॉइस मेसेजवर गेला.

दिवाळी

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 24/10/2008 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
घनदाट तमाच्या तीरी दीपांच्या लक्ष ओळी नाजूक, मोहक ज्योती तेजाने उजळती | सुख, प्रकाश देती आकाशदीप घरोघरी रंग रांगोळीचे खुलती येई आनंदा भरती | फुलांची होई पखरण रंग-गंधां चे मीलन हास्याचा नाद भरे घराघरातून --मनामनातून | येईल प्रकाश पहाट आपल्या या जीवनी दु:ख, दैन्य हरेल सारे ही दिवाळी ... ही दिवाळी | शुभ दीपावली !!!!

"अरे, आतातरी 'खो' दे ।"

लेखक हर्षदा विनया यांनी शुक्रवार, 24/10/2008 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणूनच म्हटलं "अरे, आतातरी 'खो' दे ।" भरधाव गाडीने उडवून दिल्यावर विव्हळत होता तिथेच -तसाच ओलांडला देह त्याचा, गाडीइतक्याच वेगाने पळणा-या देहांनी, माणसांनी नव्हेच.... म्हणूनंच म्हटलं 'खो' दे आता, डोळे असून आंधळे असलेल्यांना! बघ,हात बटबटलेत तिचे मातीने त्याच हाताने वेचतेय शिते कोँबड्यांना घातलेली तिच्या पोटात जात नाही काही पण तीच्यामूळे पोट भरतंय डासांचं उघड्या देहावर बसलेली कीटकांची पालं अरे, दिसतात ना तुला ते जास्त खाऊन ओकणारे मग दे 'खो' त्यांनाही बघ,बघ चुरगळली की तिला जग हसलं तीलाच विचारत फ़िरले 'रेट' झालं मेल्याहून मेल्यागत चुरगळणारे पाय मात्र हींडले अजून एखादं फूल धुंडाळत ती मात्र अशु

जागतिक मंदीवर अमेरिकेत २० देशांच्या नेत्यांची बैठक

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 24/10/2008 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
जगातील आर्थिक मंदीवर चर्चा करण्यासाठी २० देशांच्या नेत्यांची बैठक अमेरिकेत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आमंत्रित केली आहे. आमंत्रित 20 देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. १५ नोव्हेंबरला वॉशिंग्टनमध्ये ही बैठक आहे. व्हॉईट हाऊसमध्ये ही बैठक होणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ४ नोव्हेंबरला आहे. निवडणुकीनंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

क्रिकेट शौकिनांच्या देवावर घाणेरडे आरोप?

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 24/10/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेली १९ वर्षे सातत्याने क्रिकेटचे नवनवे विक्रम करणारा , क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातला ताईत असलेला सचिन तेंडुलकर घमेंडी आणि खोटारडा आहे , असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का ? मुळात कोणी असं बोलेल तरी का त्याच्याबद्दल ? तर हो , सचिन घमेंडी आणि खोटारडा असल्याचे त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत आणि हा आरोप करणाराही कोणी भलता सलता नाहीये. हा महानुभव आहे सचिन विरुद्ध अनेक सामने खेळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी विकेट किपर अॅडम ग्रिलक्रिस्ट. गिलख्रिस्टच्या आत्मचरित्रात त्याने सचिनविषय़ी लिहिताना तो खोटारडा असल्याचे म्हटले आहे.

शांती अन् मुक्ता

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 24/10/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
ग्वेंडोलिन ब्रूक्स (१९१७-२०००) ही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांमधील एक महत्त्वाची कवयित्री होऊन गेली. तिची कर्मभूमी शिकागो शहराचा दरिद्री आणि ओबडधोबड दक्षिण भाग. त्या परिस्थितीत पिचणारी, त्या परिस्थितीतही भोग भोगणारी, अशी माणसे तिच्या कवितांमध्ये उतरली आहेत.
Taxonomy upgrade extras

आता काँग्रेसवरच बंदी घाला !

लेखक सनातन यांनी शुक्रवार, 24/10/2008 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य परिस्थिती दाखवणार्‍या वृत्तवाहिन्यांची मुस्कटदाबी करणारी लोकशाहीद्रोही काँग्रेस ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र पेटला. त्यांच्या अटकेचे पडसाद राज्यसभेतही उमटले. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्रातील अराजकाला मनसेलाच कारणीभूत धरले. असे करून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने स्वत:ची कातडी बचावण्याचा निष्फळ प्रयत्‍न केला. कोणतेही प्रकरण अंगाशी आले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे नेते त्यांच्या सोयीप्रमाणे त्या घटनेतून अर्थ काढतात.

लिव इन रिलेशनशिप चा कायदा

लेखक तारका यांनी शुक्रवार, 24/10/2008 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
हा लिव इन रिलेशनशिप विषयी चा कायदा आहे तरी काय? दुसर्‍या स्री ला पत्नी चा दर्जा दिल्याने मूळ पत्नी चा दर्जा कमी होतो दुसर्‍या स्त्री ला पोटगी हा पत्नी चा आर्थिक तोटा नाही का? हा कायदा 'हिन्दु विवाह कायदा' ला छेद देत नाहि का?