बघ तुला आठवण येते का ?
(सौमित्र ह्यांच्या 'बघ तुला माझी आठवण येते का' ह्या कवितेच स्वैर विडंबन करण्याचा एक प्रयत्न)
कर्जवसूली साठी येणारे गूंड खिडकीत उभ राहून पहा
बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?
खिडकी बंद करून घे. दिवे पंखे मालव.
सर्व नळ बंद करून टाक.
बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?
थडथडणार काळीज जागेवर आणायचा प्रयत्न कर.
डोळे मीटून घे. देवाचा धावा कर. राम रक्षा म्हण.
नाहीच आठवली तर भीमरूपी महारुद्रा म्हण.
बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?
मग हळूच मागच्या दाराने बाहेर पड.
चालत रहा भिती कमी होईपर्यंत.
ती कमी होणार नाहीच. मग घरी ये.
साडी बदलू नकोस.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
