विचीत्र प्राणी
माझ्या सहीचे इंग्रजी मध्ये संक्षिप्त रुप वि.प्रा. होते. वि.प्रा.= विचीत्र प्राणी .माझे माझ्या एकुलत्या एक बायकोने ठेवलेले पेट(परत प्राणी) नाव."तुझा नवरा जरा विचीत्र आहे तेंव्हा जरा संभाळुन" हा माझ्या सासूने साखरपुड्यानंतर सल्ला दिला आपल्या आवडत्या कन्येला. अर्थात हे नंतर कळले.
मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. पसंद पण पडली.(पहिल्या मैत्रीणी बरोबर विलक्षण साम्य). मोठ्या भावाबरोबर आधी ठरल्याप्रमाणे उगाच आढेवेढे न घेता होकार दिला.
मुलीच्या काकाने मुलीबरोबर बोलण्याचा प्रस्ताव मांडला. लगेच एका वेगळ्या रुमची व्यवस्था पण झाली.
मिसळपाव
