Skip to main content

अमेरिकेत मराठी बाणा

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 03/11/2008 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता मला अमेरिकेत येऊन एक महिना उलटूनसुध्दा गेला. एवढ्या काळात मी कितीसा अमेरिकाळलो आहे याचा विचार करीत बसलो होतो. इथे आल्यानंतर रोजच्या बोलण्यात आणि लिहिण्यावाचण्यात मी सत्तर पंच्याहत्तर टक्के मराठी भाषेचा उपयोग करतो आहे. मुंबईत हा आकडा कधी पन्नासावर गेला नव्हता. जेवणाखाण्यात आमटी, भात, पोळी, भाजी, शेव, चिवडा, पोहे, शिरा इत्यादी ऐंशी पंच्याऐंशी टक्के मराठी पदार्थच असतात. ते सुध्दा मुंबईपेक्षा जास्त झाले. अंगावरचे शंभर टक्के कपडे मुंबईहूनच आणलेले आहेत. घरातले सामान सुमान, अडगळ आणि पसारा इथे कांकणभर जास्तच आहे. कारण आम्हाला इकडच्या वस्तूही हव्यात आणि तिकडच्याही लागतात.

ज्याचं त्याचं स्वातंत्र्य

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 03/11/2008 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
"तुझा देवावर विश्वास नाही हे बरोबर नाही!", "तू मंगळसूत्रसुद्धा का घालत नाहीस?", "तू तरी त्याला सांग जरा मोठ्या माणसांचं ऐकायला!" अशी वाक्य अगदी रोज कानावर आली नाहीत तरी क्वचितच कानावर येतात असंही नाही. दोन्ही बाजूंच्या व्यक्ती बदलतात पण प्रवृत्ती एकच असते; 'जे वर्षानुवर्ष चालत आलं आहे तेच बरोबर आहे', या तत्त्वावर गाढ आणि आंधळा विश्वास असणे! आणि या प्रवृत्तीची रुपं अनेक असतात, काही लोक दुसर्‍यावर आपली मतं लादणार काही स्वतःलाच बंदी बनवणार. देव असो वा कैदी, दु:ख एकच असतं; दोघंही बंदीवान असतात, देवळात असोत वा पिंजर्‍यात!

सेनापती कापशी

लेखक रम्या यांनी सोमवार, 03/11/2008 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
यावर्षीच्या दिवाळीत काही कामानिमित्त कोल्हापूरला जाणं झालं. कोल्हापूर स्थानकावर पुढारी वर्तमानपत्र घेतलं. पहिल्याच पानावर बातमी होती "सेनापती कापशीत अमूक अमूक घडले". बातमीत "सेनापती" या शब्दाचा काही अर्थ लागेना. थोडा विचार केला नि सोडून दिलं. सी.बी.एस. ला गारगोटी बस पकडून गावी आलो.
दिवसभराची कामं उरकून रात्री आनंदा वारके यांच्याकडे गप्पा हाणायला आलो. नात्यानुसार हे माझे मामा. पण मी त्यांना दादा म्हणतो. व्यवसायाने मराठीचे प्रोफेसर. फार गप्पिष्ट माणूस. बंगल्याच्या दारातली लाईट मुद्दाम घालावली. गावरस्त्यावरील विजेच्या दिव्याच्या अंधूक प्रकाशात संगीत, लेझीम याच्या गप्पा रंगल्या.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर बिहारींचा भ्याड हल्ला

लेखक अनामिका यांनी सोमवार, 03/11/2008 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच समजलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील "महाराष्ट्र सदनावर" राष्ट्रवादी सेनेच्या बिहारी कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला आहे. "अति झाले आणि हसु आले "म्हणायची वेळ आली आहे. आता गप्प बसलो तर कायम गप्पच बसावे लागेल. पिसाट सुटलेल्या बिहारींना आणि त्यांच्या लालुसारख्या पुचाट नेत्यांना एकदाच महाराष्ट्राचे पाणी दाखवायलाच हवे.जेणे करुन कायमचे फिरलेले डोके ताळयावर येईल. ही विषवल्ली वेळिच ठेचायला हवी नाही तर उभ्या महाराष्ट्रावर आणि मराठी जनतेवर पश्चाताप करण्याची वेळ येइल हे निश्चित. आता तरी दिल्लीत बसुन खुर्च्या उबवणारे महाराष्ट्राचे प्रतिनिधी काही करणार आहेत?

... आणि खादाडीचं मनोगत - बिस्कीट आंबाडे

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 03/11/2008 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
मेघनाचं "... उर्फ सुगरणीचा सल्ला" वाचनात आलं आणि वाटलं "... आणि खादाडीचं मनोगत"पण लिहिलंच पाहीजे. पण खादाडी करायची तर तब्येतीत हे मात्र पक्कं ठरवलं होतं. कुठे हा प्रश्न होताच, माझी स्वयंपाककौशल्य आणि कष्ट करण्याची आवड बघता "स्वतः करून खाल्लं, आता पाकृ आणि फोटो चढवायचा" हे जरा कठीणच होता, पण इच्छा तिथे मार्ग आणि तो पण अनपेक्षितच! "ठाण्याला येईनच दिवाळीला, तेव्हा तुम्हाला वेळ असेल तर भेटायचं आहे," असं विप्रकाकांना लिहिलं आणि त्यांचं लगेचच उत्तर आलं, "नक्की ये. काकूही तुझी वाट बघत आहे." मला हे वाचून फारच आनंद झाला. कारण काकूचा उल्लेख!

रसमलाई

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 03/11/2008 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- १० ते १२ तयार रसगुल्ले, १लिटर जास्त फॅट असलेले दूध.(जर्मनीत कोन्डेन्स्ड मिल्श म्हणून ४%, ७.५% व १०% फॅट असलेले दूध मिळते त्यातील ७.५% वाले दूध मी घेते.),साखर १/२ ते ३/४ वाटी, बदाम पिस्ते काप, वेलचीपूड. कृती- दूध साधारण पाउण लिटर होईल असे आटवावे. कोन्डेन्स्ड मिल्श घेतले असेल तर साय जमू लागली की ती लगेच मोडावी व गॅस बंद करावा. त्यात साखर घालून ढवळावे. बदाम पिस्ते काप,वेलचीपूड घालावी व ढवळावे.गार होऊ द्यावे.

मिपा ओळख २

लेखक चेतन यांनी सोमवार, 03/11/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

( कणा )

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 03/11/2008 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
( कणा ) कवी - कुसुमाग्रज ------------------------------------------ ओळखलस का देवा मला?'- स्वर्गात आला कोणी शरीर होते सोडलेले, आत्म्याचीच वाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून : पृथ्वीवरुन आत्ताच आलो.

राज ठाकरेंवर देशद्रोहाचा खटला

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी सोमवार, 03/11/2008 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या म.टा मधिल बातमी झारखंडमधील धनबाद कोर्टातील मुख्य न्यायाधीश दीपक कुमार यांच्या कोर्टात मनसे नेते राज ठाकरे यांच्या विरोधात हत्या आणि देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. राजू मलिक नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२,१४७,१४८,१४९ आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी २९ तारखेला करण्यात येणार असून , राजू मलिकने आपला भाऊ सकल याच्या हत्येचा आरोप राज ठाकरे यांच्यावर लावला आहे.