व्यसनमुक्ती
अमेरिकेतील ऍक्रॉन शहरातील १९३५ मधील एक संध्याकाळ. त्या संध्याकाळी दोन अट्टल बेवडे एकमेकांना भेटले. गप्पा मारत बसले आणि चमत्कार म्हणजे गप्पा मारता मारता प्यायचं विसरले. त्यांच्या गप्पांतून दुनियेत एक नवीनच शोध लागला. दारूपासून दूर राहण्याच्या तंत्राचा. पण त्या दोघांपैकी कोणीही मानसशास्त्रज्ञ नव्हता. एक होता शेअर दलाल बिल विल्सन तर दुसरा होता डॉक्टर बॉब स्मिथ.
खरे तर यापूर्वी मद्यपाशग्रस्ताकडे तुच्छतेने पाहिले जाई (आज ही बरेचजण मद्यपाशग्रस्ताकडे तुच्छतेने पाहतात) त्यांना उपदेशाचे डोस पाजले जात. पण समानतेच्या पातळीवरून त्यांना कोणी समजून घेत नव्हते.
मिसळपाव