Skip to main content

प्रारब्ध आणी कर्म

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 11/03/2021 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही विचार स्वताःचे आणी काही दुसर्‍यांचे, आयुष्यातील यशापयशाचा आढावा घेताना डोक्यात उडालेला गोंधळ. ज्ञात अज्ञात लेखकांचे आभार. " कात्रजच्या घाटात वरती डोंगरावर काही माकडे खेळत होती, दोन तरुण मुलं मोटर सायकल वर सातारकडे जात होती मोटरसायकल बोगद्यात प्रवेश करत असताना अचानक मोठा दगड वरून गडगडत आला आणी पाठीमागे बसलेल्या तरूणाच्या डोक्यात पडला आणि मृत्यूला कारणीभूत झाला". रेडिओवर ही बातमी कदाचित तुम्ही सुद्धा ऐकली आसेल. मनात विचार आला आसे का? विचार म्हणजे काय असते? मनातल्या मनात नं कळत चाललेली प्रश्नोत्तरे…… काय चुकलं त्याचं? माकडांचं आणी त्या तरूणाच मागच्या जन्मीचं काही वैर होतं का?

ऊन्हाचा तुकडा

लेखक प्रसाद साळवी यांनी गुरुवार, 11/03/2021 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
चकचकता कशाच्याही खाली न दडणारा उन्हाचा तुकडा बिन-तक्रार हातात येईल असं वाटलं होतं पण ते काही खरं नव्हतं या उन्हाच्या तुकड्यावर फक्त माझा असेल हक्क.

मनातला ऐवज..

लेखक सरीवर सरी यांनी गुरुवार, 11/03/2021 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
मनातला ऐवज.. दिलाय उधार ठेव जपून... वाटलं तर परत कर.. कातर सांजवेळ डोळ्यातलं काजळ स्मिताच मोहळ .. अन् नाहीच जमलं तर उधळूही नको फक्त कुरवाळत राहा एक एक भाव जपत राहा..
काव्यरस

दिवाळी अंक 2020

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 11/03/2021 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो. सुरूवातीला काही वर्षे, म्हणजे साधारण 2006 पर्यंत, हवे असलेले सगळे अंक लगेच विकत घेत होतो, पण 2006-07 च्या सुमारास समजले की, डोंबिवली येथे मार्च-एप्रिल मध्ये, हेच दिवाळी अंक, कमी पैशांत मिळतात. त्यामुळे, 2-3 वाचनालयातून हे अंक गोळा करतो. नमनाला, इतके तेल भरपूर झाले. आता मुळ मुद्द्याकडे येतो.... ह्यावर्षी खालील अंक घेतले 1. उत्तमकथा 2. आवाज, पाटकर 3. साप्ताहिक सकाळ 4. लोकमत, दीपोत्सव 5. दीपावली 6. लोकसत्ता 7. जत्रा, मेनका प्रकाशन 8. जत्रा, महाराष्ट्राची 9. किस्त्रीम 10. धनंजय 11. मौज 12. माहेर 13. ऋतुरंग 14. मोहिनी 15. पद्मगंधा 16.

नाईंटीन नाईन्टी - सचिन कुंडलकर

लेखक मालविका यांनी बुधवार, 10/03/2021 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सचिन कुंडलकर यांचं नाईंटीन नाईन्टी हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. पुस्तक खूपच छान आहे. मीही त्याच काळातील असल्याने या पुस्तकाशी पटकन नातं जोडलं गेलं. यातल्या बऱ्याच गोष्टी एकदम माझ्या मनातल्या आहेत असच वाटलं. काही गोष्टी निःश्चित खटकल्या. पण सगळ्याच बाबतीतआपलं कुणाशी जमू शकत नाही, तसंच काहीस आहे हे. लेखकाने मांडलेल्या सगळ्याच मतांशी आपण पूर्णपणे सहमत होऊ शकत नाही. काही गोष्टी फार टोकाच्या वाटल्या तर काही एकदम मनमोकळ्या आणि जुळणाऱ्या वाटल्या. चित्रपट दिग्दर्शक असल्याने बरेचसे संदर्भ चित्रपटाच्या अनुषंगाने येतात.

१. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ अस्मितेचे उद्गाते ?

लेखक चौथा कोनाडा यांनी बुधवार, 10/03/2021 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
चेन्नईच्या मरीना बीचला भटकणं एक विलक्षण अनुभव असतो. चेन्नईला कामानिमित्त राहायला असताना बऱ्याचदा या बीचवर जाणं झालं. चेन्नईकर व पर्यटक यांच्या गर्दीने बीच कायमचा गजबजलेला असतो. १०-१२ किमीची लांबलचक पुळण प्रचंड गर्दीला सामावून घेत असते. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स, छोट्या मोठ्या जत्रा, पर्यटकांचे जत्थे, खेळणारी मुले यामुळे इथलं दृश्य रमणीय असतं. इथं येऊन नुसतं इकडं-तिकडं बघत बसण्यातही भन्नाट टाईमपास होतो.