निर्गुण निराकार.......
छ्या! आता डोकं ऊठणार!
या कमलेश आणि शिरीषचं भांडण कसं मिटवावं बुवा?
अरेरे... पलिकडच्या गायन क्लासातही आज पोरं नुसती विव्हळतायत..
एकाचा सूर धड लागेल तर शपथ.. आजचा दिवसच बेकार दिसतो...
ए, थांबारे जरा.... कमलेश आणि शिरीष.. जरा धिरानं घ्या की... तुमची दोघांची फ़्रिक्वेन्सी साली कधी जुळतच नाही कारे? कायम आपले शॊर्टवेव्हवर दोन रेडिओ स्टेशन्स एकाच वेळी लागल्यासारखे काय बडबडताय?
ए गप...गप्प बस जरा... हे काय? गायनक्लासवाल्या मॆडमनी हा कुठला सूर लावला?
हिरना....हिरना... अरे ही तर कबिराची रचना दिसते....बरेच दिवसांपूर्वी कधीतरी कुमारजींच्या आवाजात ऐकलं होतं हे निर्गुणी भजन...
मिसळपाव