Skip to main content

निर्गुण निराकार.......

लेखक अनंत छंदी यांनी बुधवार, 19/11/2008 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
छ्या! आता डोकं ऊठणार! या कमलेश आणि शिरीषचं भांडण कसं मिटवावं बुवा? अरेरे... पलिकडच्या गायन क्लासातही आज पोरं नुसती विव्हळतायत.. एकाचा सूर धड लागेल तर शपथ.. आजचा दिवसच बेकार दिसतो... ए, थांबारे जरा.... कमलेश आणि शिरीष.. जरा धिरानं घ्या की... तुमची दोघांची फ़्रिक्वेन्सी साली कधी जुळतच नाही कारे? कायम आपले शॊर्टवेव्हवर दोन रेडिओ स्टेशन्स एकाच वेळी लागल्यासारखे काय बडबडताय? ए गप...गप्प बस जरा... हे काय? गायनक्लासवाल्या मॆडमनी हा कुठला सूर लावला? हिरना....हिरना... अरे ही तर कबिराची रचना दिसते....बरेच दिवसांपूर्वी कधीतरी कुमारजींच्या आवाजात ऐकलं होतं हे निर्गुणी भजन...

प्रतिसाद वाद विवाद संवाद

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 19/11/2008 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
या काव्यासाठी प्रेरणा {आधीच अवांतरः}हे विडंबन नाही{अवांतर संपलं} हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर आधार एकच असतो नाम त्याचे (विसोबा) खेचर आयई असो वा फाफॉ क्लिक मिपालाच मिळत असते लेखाकडून प्रतिसादाची वाट चालत असते प्रतिसादातून माणसांची ओळख होऊन जाते त्यांची असलेली ओळख सदा मित्र नामे रहाते मैत्रीतूनच रट्टे-कट्टे स्त्रावित होत जातात मगच त्यातून संवाद आकार घेत जातात आता मिसळ हापसण्यातच वैराग्य माझे संपले पण अवांतराचे बीज डोक्यात माझ्या उरले आता व्यस्त अदिती संगणकाशी जाईल प्रतिसाद द्या वर क्लिक करुन पुन्हा शांत राहिल.

पाठीराखा (ही नवीन कविता आहे)

लेखक द्विज यांनी बुधवार, 19/11/2008 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
पाठीराखा हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर आधार एकच असतो नाम त्याचे ईश्वर कुठे ना कुठे हा आत्मा त्यालाच मिळत असतो शून्यातून शुन्याकडची वाट चालत असतो विश्वातून परमातीताची ओळ्ख होऊन जाते त्याच्या हाकेशी दिलेली साद 'जीवन' नामे स्फुरते विवेकातूनच चैतन्य स्त्रावित होत असते मगच "अह॑ ब्रम्हास्मि " बोधाने मन प्लावित होत असते पदकमला॑मधेच त्याच्या सुख माझे उरले भौतिकतेचे तामस मनातूनी सरले आता मुक्त आत्मा परब्रम्हापाशी जाईल प्रभू माझा पाठीराखा मला घ्यावयासी येईल....
Taxonomy upgrade extras

यमकाचा खेळ

लेखक सागरलहरी यांनी बुधवार, 19/11/2008 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मुमुक्षुं सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - क्डव्याचा अपेक्षीत शेवट खालील प्रमाणे यावा ..... अशी कामना माझी नव्हती | आधीच्या ओळी काय होऊ शकतील ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. (मुमुक्षु प्रेरित) आभारा सह सागरलहरी
Taxonomy upgrade extras

उद्याचे आकाश -सीईटी साठी सराव परीक्षा प्रकल्प.

लेखक रामदास यांनी बुधवार, 19/11/2008 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मी आणि विनायक प्रभू अनेक शैक्षणीक विषयांवर आणि एकूण स्पर्धात्मक परीक्षांबद्दल चर्चा करत होतो. काही दिवसानंतर चर्चेचा रोख हळूहळू शहरी आणि ग्रामीण या फरकाकडे वळला. आर्थीक परीस्थीती आणि व्यावसायीक कोर्सेसला ऍडमिशन याची पण चर्चा झाली .सीईटीच्या परीक्षेतील यश ज्या गोष्टींवर अवलंबून आहे त्याची पण चर्चा झाली. सर्वसाधारणपणे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील यशापयशाचे टप्पे ठरवतात. दहावीला चांगले गुण मिळाले तर अकरावीला चांगल्या ज्युनीअरकॉलेज ला प्रवेश . ग्रामीण भागात हा फरक नाही कारण मार्क चांगले किंवा वाईट कॉलेज जवळजवळ तेच असते. आता, शहरात हा फरक आहे.

सखी मदिरा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 19/11/2008 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
फॉर्म्युला वन आणी किंगफिशर ची चढाओढ ह्यातुन कहिसे बाहेर पडल्या नंतर प्रसिद्ध उद्योजक, फॉर्म्युला वन सारख्या ठिकाणी संघ उभे करणारे एकमेव भारतीय विजय मल्ल्या हे थोडेसे रिलॅक्स होण्यासाठी 'सखी मदिरा' पार्टि चे आयोजन करत आहेत, हे ऐकल्या बरोब्बर आमची कळी खुलली. विजय मल्ल्यांची पार्टि म्हणजे झाडुन सगळे पेज ३ वाले मान्यवर, क्रिकेटर्स, मायानगरी मधिल तारे, राजकारणी हजेरी लावणार, आणी आम्हाला मि.प. च्या सभासदांना खमंग काहितरी वाचायल देता येणार ह्याचा आनंद आम्हाला सर्वाधिक झाला.

बंदपीठाचा धसका.

लेखक कपिल काळे यांनी बुधवार, 19/11/2008 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यनगरीतील शनिवारवाड्याच्या आसपासचं एक मराठी वृत्तपत्र बरयापैकी उपक्रमशील आहे. अनेक उपक्रम चालवतात, रोज वेगळी पुरवणी काढतात. अशीच त्यांची एक साप्ताहिक पुरवणी “बंदपीठ”. ह्यात आपले अनुभव लिहून पाठवतात वाचक. गेले पाच सहा महिने बंदपीठात तर थैमान चालू आहे. समाजातील चांगले दाखवून देणारा एखादा तुरळक लेख सोडला तर बाकीचे तर वाचवत नाहीत. एकेका लेखांचे विषय तर पहा. कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी घेताना, प्रत्येक केमोनंतर किती केस गळून पडले? दिवाळीला फिरायला बाहेर गेलो तेव्हा दोन ट्रकांच्या मध्ये सापडून आपल्या मोटारीचा चेंदामेंदा कसा झाला?

पाककृती : कट्टावृत्तांत

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 19/11/2008 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी ही पाककृती अतीशय सोपी आणि हमखास प्रतिसाद देणारी आहे. साहित्य : साहित्य हे तुम्ही भारतात आहात की परदेशात ह्यावर अवलंबुन आहे. भारताता असाल तर एक मोबाईलफोन आणि (किमान) तीन-चार मित्र/मैत्रिण. परदेशात असाल तर एखादा ओळखीचा/जवळापासचा कुणीही आणि एक कॅमेरा. कृती: इथेही तुम्ही देशातच असाल तर अतीशय सोपी कृती आहे. पूर्व तयारी :मोबाईलचा वापरकरुन ३-४ मित्रांना शनिवारी रात्री कुठेतरी जेवायला जायचा प्लॅन करायचा. जेवणाआधी मद्यपान/धुम्रपान केल्यास असात्विक कट्टा होतो मद्यपान आणि धुम्रपान टाळल्यास सात्विक कट्टा होतो. प्रत्यक्ष कृती: झालं!!

दर्शन भारत मातेचे (भाग २)

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 19/11/2008 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई-पुणे दृतगती मार्गावरुन पुण्याला वळसा घालून शिक्रापूर मार्गे अहमदनगर-बीड असा आमचा प्रवास सुरु झाला. अद्यापपर्यंत दृतगतीमार्गावर दोनवेळेला टोल भरला होता. पण वाचलेल्या वेळामुळे अन हा महामर्ग नसताना पूर्वीच्या मार्गावर अनेकदा तासन तास घालवल्याच्या आठवणी विसरलेल्या नसल्याने हा टोल भरताना काही वाटले नाही. पुढे पुण्याच्या वळणरस्त्यावर असताना बंधू म्हणाला, "अण्णा, पुढच्या वळणावर काही तरी गडबड असणार आहे". मी चमकलोच. "तुझा अध्यात्मातला अभ्यास चांगला आहे. पण तुला भविष्य कधिपासून कळायला लागले?" मी प्रश्न टाकला. तसे आम्ही त्या वळणापर्यंत पोचलो होतो. आणि काय आश्चर्य तेथे एक अपघात झालेला होता.

दिलखुलास

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 19/11/2008 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज झी मराठी च्या लिट्ल चॅम्प्स चा कार्यक्रम पाहिला आणि शंकर महादेवनला मानला! शंकर महादेवन आजचा पाहुणा परिक्षक होता आणि शंकर महादेवनने आपल्या दिलखुलासपणाने सर्वांना जिंकुन घेतले. एका प्रथितयश कलाकाराने उमलत्या कलाकारांना ज्या उस्फुर्तपणे, ज्या उत्साहाने आणि ज्या पद्धतिने दाद दिली त्याला तोड नाही. परिक्षक हे बहुधा स्पर्धकांचे कौतुकच करतात, काही सल्ल्ला वा सुचना देतात आणि प्रोत्साहनही देतात, कधी सौम्यपणे त्रुटी नजरेस आणुन देतात. मात्र 'मी' पण विसरुन सर्व बालस्पर्धकांचे कौतुक शंकर महादेवनने केले त्याला दाद दिलीच पाहिजे. अगदी पहिली फेरी हिंदी गाण्यांची होती.