Skip to main content

कधीच नाही

लेखक जयवी यांनी शनिवार, 22/11/2008 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या देहात चांदणे मग फुलले कधीच नाही बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या का घाव तू दिलेले भरले कधीच नाही जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

एक कविता

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 22/11/2008 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता मी कॉलेजमध्ये असताना केलेली होती. थांबू नकोस तू, ओळख देण्यासाठी नादात हरवल्या एका वेड्यासाठी तो म्हणतो "गाणे रुसले गाता, गाता, शब्दांस टाळुनी गेली एक कविता" हे गाणे नाही, हे तर त्याचे जळणे कवळून आठवणी, झाडामागे हसणे ती सुरेल गाथा, झुरण्यासाठी आता शब्दांस टाळुनी गेली एक कविता आठवतो चांदण्या रात्रीमधले श्वास 'याचना फुलांची', होता केवळ भास त्या याचकास ना उरला कोणी दाता शब्दांस टाळुनी गेली एक कविता

सासुरवाशीण

लेखक अनंत छंदी यांनी शनिवार, 22/11/2008 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारच्या रणरणत्या उन्हात, पागोळीच्या सावलीत एक गाय येऊन बसली निवारा शोधीत ओटीवरती सासूबाई, डाळिंब्या निवडत होत्या. जपमाळ घेऊन माजघरात बसली होती नलूआत्त्या सैपाकघरात आवराआवर, सूनबाई करते खोचून पदर मन मात्र झुलत असते, माहेरच्या झोपाळ्यावर आई, भाऊच्या आठवणीने डोळ्यामध्ये अश्रुधारा आत्ताच का आठवते आहे, भातुकली अन चिमणचारा गायीला पाहून मायेची सय तिला येते आहे. गायीशी गळामिठी घालून सासुरवाशीण रडते आहे. गाय आणि माय दोन्ही आहेत एकच बाळे वात्सल्याशिवाय वेगळे काही बोलतात का दोघींचे डोळे?
Taxonomy upgrade extras

येड लागलं, येडं लागलं, या छंदाचं येड लागलं

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 22/11/2008 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, आज तुम्हाला येड लावण्याचा विडा उचलून आम्ही लेखन करीत आहोत. आम्ही ठार "येडे" झालोच आहोत, आता तुम्हालाही करतो. या वेडाचे कारण म्हणजे लवंगलता छंद. हा छंद माणसाला वेड लावणारा आहे. या छंदाचे नोटेशन असे आहे. प| प| प| -|-| =१४ अक्षरे येथे प म्हणजे पद्मावर्तनी म्हणजे ४ अक्षरे (जातींमध्ये प च्या ८ मात्रा मोजल्या जातात) तर या छंदात एका ओळीत १४ अक्षरे असतात. पण लेखनाच्या सोयीसाठी आणि कवितेच्या सौंदर्यासाठी १४ अक्षरांची ओळ दोन भागात विभागून लिहिली जाते. म्हणजे ८ अक्षरांची पहिली व उर्वरीत ६ अक्षरांची दुसरी. अशा दोन ओळी एकत्र येऊन २ आणि ४ या ओळींचा यमक.

पालपुराण!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 22/11/2008 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
ईऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ असे ओरडुन तीने मला घट्ट मिठी मारली. मला नक्कि काय झाले ते समजले नाहि, पण लग्गेच फिल्म मध्ये दाखवतात तसे बासरीचे प्रसन्न background music कानात आपसुक वाजायला सुरुवात झाली. मुळात काय झाले हेच माहित नसल्याने तीने ती मिठी आनंदाने, दु:खाने कि घाबरुन मारली होती हे मला कळेनासं झाल. पण सुरुवातीला तिने जो ईकारान्त स्वर काढला होता त्यावरुन घाबरुन तिने मला मिठी मारली असावी असा अंदाज मी बांधला(कारण मुली ८०% वेळा हाच स्वर वापरतात आणि हा आनंदाचा देखिल असु शकतो you never know).

भुक

लेखक जयेश माधव यांनी शनिवार, 22/11/2008 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
देवाकडे काही मागणे| हीच खरीतर चुक आहे| सर्व काही तोच देतो| मझी फक्त भुक आहे||
Taxonomy upgrade extras

खव्वयांसाठी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, चिपळुण, रत्नागिरी आणि हैदराबाद मधिल हॉटेलांची यादी [त्यातल्या त्यात सामिश भोजन]

लेखक संताजी धनाजी यांनी शनिवार, 22/11/2008 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही घ्या हॉटेलांची यादी. ज्या लेखावरुन यादी बनवली तो येथे आहे. तुम्ही प्रतिक्रिया देवुन यादिमध्ये वाढ करु शकता. पुणे १. सुगरण्स कोल्हापुरी - पुणे-३० झक्कास कोल्हापुरी थाळी मिळण्याचे ठिकाण. मटण्/चिकन सोबत तांबडा पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी एकदम टकाटक चव Smile पत्ता: सदाशिवपेठेत, भरत नाट्य मंदीरावरुन टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदीराकडे येताना लागणार्‍या शेडगेवाडीत हे सुगरण्स कोल्हापुरी आहे. २.

संक्रांतीच्या शुभेच्छा

लेखक नंदन यांनी शनिवार, 22/11/2008 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
१. अर्थातच ही कविता पूर्णपणे काल्पनिक आहे. २. कुणालाही आक्षेपार्ह वाटल्यास उडवून लावली तरी चालेल. अल्फा असो वा याहू!
Taxonomy upgrade extras

बिनडोकपणे रस्ता तोडला (BRT)

लेखक टवाळचिखलू यांनी शनिवार, 22/11/2008 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
बी आर टी म्हणजे बस रॅपीड ट्रान्झीट असे पुणे पालिकेला वाटते पण माझ्या मते हे बी आर टी म्हणजे बिनडोकपणे रस्ता तोडला असेच आहे. मी रोज हडपसर ते नळस्टोप असा प्रवास करतो(दुचाकीने). पण कधी कधी बस ने जाण्याचा योग येतो (म्हणजे मी आणतो ) तेव्हा लक्षात येते की या बी आर टी प्रयोगाला मान्यता देणारा खरंच अभियंता होता काय ? असेल तर कुठल्या शाखेचा ? विचार करण्यासारखे काही मुद्दे असे . १. बस स्टोप रस्त्याच्या मध्यभागी आहे म्हणजे प्रत्येक प्रवाशाला रस्ता ओलांडणे भाग पडते (प्रवास सुरु करताना आणि संपल्यावर). २.

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 22/11/2008 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळची वेळ होती.नदी खळाळत वहात होती.वीजा चमकत होत्या.राजा-राणी पल्याड जायला आतूर होती. पल्याडला त्या वटवृक्षाखाली त्यांच घरकूल होतं.आत्तांच परत येऊ अशा समजूतीने ती दोघं मुलाना एकटच सोडून नदीच्या अल्याड आली होती.
Taxonomy upgrade extras