Skip to main content

जगी सर्व सुखी असा कोण आहे .....

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी रविवार, 23/11/2008 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
खरेच आज कोण सुखी आहे ह्या जगात ? कितीही मोठी, उच्च पदावरील व्यक्ती असो, दुख: , चिंता काय पाठ सोडायला तयार नसतात. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. त्यामुळेच आज श्री. सत्य आईबाबा ह्यांचे शहरात आगमन होणार आहे हे कळताच, मोठ मोठ्या लोकांची दर्शनाला नुसती झुंबड उडाली होती. आम्ही सुद्धा मोठ्या हिकमतीने खास दरबारात प्रवेश मिळवला. (पेशव्यांचे रक्त खेळतय नसा नसात) हे वाक्य एकदा आम्ही एकाला ऐकवले होते, त्याने आम्हाला "मग तुम्हाला 'पेशवाई' मध्ये सगळे फ्री असेल ना?" असे विचारुन तप्त डांबरी रस्त्यावर चितपट केले होते. असो, खास दरबारामध्ये फक्त खास खास लोकांच्या स्वार्‍या विराजमान झाल्या होत्या.

शरमिंदा व्हायला इतर हजार गोष्टी आहेत!-कवी-लेखक सलील वाघ /मटा मधिल आजचा लेख.

लेखक अनामिका यांनी रविवार, 23/11/2008 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी 'संवाद' पुरवणीत 'थोडासा नाराज आणि बराच शरमिंदा!' असा लेख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चालवलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने लिहिला होता. या लेखावर कवी-लेखक सलील वाघ यांची ही सविस्तर प्रतिक्रिया .................... कोणी काहीच बोलत नव्हते. किरकोळ किरकोळ साहित्यिक लुटीपुटीची सेमी-लाडिक, तक्रारीसदृश्य विधाने करत होते पण कोणीच मोठा अणि महत्त्वाचा साहित्यिक याबद्दल बोलत नव्हता. आता चित्रे बोलले आणि त्यांनी कोंडी फोडली.

रात्ररंग..

लेखक प्राजु यांनी रविवार, 23/11/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
रात्ररंग.. चांदण्यांचे तेज सारे श्यामरंगी रंगले मोगरीचे चांदणेही भूवरी या गंधले शीळ घाली दाट रानी चांदवेडे पाखरू क्षेम* द्यावी चांदण्याला स्वप्न त्याचे भंगले सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले पिंपळाचा पार भासे होत बैरागी कुणी सावळासा भार त्याचा ध्यान त्याचे सावळे रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले (क्षेम : मिठी, अंकी : मांडीवर) - प्राजु
Taxonomy upgrade extras

सांगा कसं शिकायचं ?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 23/11/2008 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं असं झालं,मी माझ्या नातीला निरोपाचे एक छोटेसे पत्र लिहीत होतो.ती आज युसी(अर्वाइन)एलेला पुढील शिक्षणासाठी रवाना झाली.तिला निरोप द्यायला मी विमानतळावर पण गेलो नाही. माझा नातू सुद्धा गेल्या आठवड्यात असाच तिच्या सारखाच युसी(एस सी) स्यॅनाकृझला पुढील शिक्षणासाठी रवाना झाला. त्यालाही मी निरोपाचं असंच एक छोटसं पत्रं लिहीलं.

नार्को चाचणी:एक नैतिक प्रश्न.

लेखक रामशास्त्री यांनी रविवार, 23/11/2008 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, अलीकडेच मालेगाव प्रकरणात नार्को चाचणीचा वापर करण्यात आला. तेलगी प्रकरण, किंवा निठारी प्रकरण ही ह्या चाचणीच्या वापराची काही ठळक उदाहरणे आहेत. ह्या चाचणीच्या वैधतेबद्दल अनेक कायदेतज्ञांनी, तसेच न्यायालयांनी विविध मते प्रदर्शित केली आहेत. मात्र त्याचे इथे प्रयोजन नाही. हा मुद्दा इथे मांडून आपली मते जाणून घ्यायची आहेत. आपण सर्वांनीच नागरिकशास्त्रात भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा अभ्यास केला असेल. अत्यंत पवित्र अशा ह्या संविधानाच्या कलमांमध्ये एक मूलभूत अधिकार नमूद केला आहे - एखाद्या गुन्ह्याचा आरोप झालेल्या व्यक्तीस स्वत:विरूद्ध साक्ष देण्यास भाग पाडता येणार नाही.

समस्यापूर्ती

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 22/11/2008 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मागील यमकाच्या खेळास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही आता नवीन समस्या मांडत आहे - आज नाही पौर्णिमा ,अन ग्रहण नाही आजला, सांग सखये कोणता तो, चंद्र कैसा ग्रासला ? या वरील काव्यमय समस्येला काव्यमय उत्तर अपेक्षित आहे.
Taxonomy upgrade extras

मिपाजाल -सी.ए. एंटरटेनमेंट ओपन अनलिमिटेड

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 22/11/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
विप्र मास्तरांना मिपाजालवर येउन साधारण चार महिने झाले होते. तेवढ्यात त्याना ठाणे मिपा कट्ट्याचे आमंत्रण मिळाले. मिपाच्या मालकांना व इतर विभुतींना भेटायला मिळणार हे बघून त्यांचा आनंद त्यांच्या ब्लॉकमध्ये मावेना. मास्तर मिपाजालावर क्रिप्टीझम चे बादशाह म्हणुन प्रसिद्ध झाले होते. त्यांनी शिक्षण ह्या रुक्ष विषयाला सोडून वेगळेच विशय हाताळायला सुरु केल्याने मिपा सद्स्य रामदास त्यांच्यावर नाराज झाले. मास्तर पण आपला हट्ट सोडेना. म्हणून रामदासानी स्वःत ती जबाबदारी उचलली. "पीक लुटून नेले, केव्हा नेले, किती वेळा नेले" अशा कविता करणारे रामदास सध्या "मराठी मुले सी.ई.टी.

""कालचक्र""

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 22/11/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य एक संध्या कोमल गंधार, कुसुंबी किनार क्षितिजाला... तेजस्वी रवीची किरणे सोनेरी, लाली गालावरी संध्येच्या का !?! मुग्ध प्रियतमा संध्या ती आरक्त, का 'रवी' आसक्त 'निशे'वरी ! दुखावली 'संध्या' हळवा गंधार, का क्षितिजापार गेला सखा..... हवेत गारवा नभी चंद्र तारे, मादक इशारे निशेचेही... आसुसला 'रवी' निशेच्या छायेला, कौमुदी कायेला चंद्र साक्ष... मिठीत 'रवी'च्या 'निशा'ही उन्मुक्त, प्रकाश अव्यक्त अंधारला... मेघाचा मल्हार, कित्येक प्रहर, प्रणय कहर, आसमंत..... पहाट भैरवी तिमिर छेदून, गगन भेदून, झंकारली.