Skip to main content

कोई दुष्मन ठेस लगाये....

लेखक विकास यांनी रविवार, 30/11/2008 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
किशोर कुमारने म्हणलेले खालील गाणे आज मला या अस्वस्थते आठवत आहे: चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये, सावन जो अगन लगाये, उसे कौन बुझाये? ... मजहार मे नैय्या डुबे तो माजी पार लगाये, माजी जो नाव डुबोये उसे कौन बचाये? ... कोई दुष्मन ठेस लगाये, तो मीत जिया बेहेलाये, मनमीत जो घांव लगाये उसे कौन मिटाये? वर दिलेल्या सर्वच पण विशेष करून शेवटच्या ओळी मला सारख्या डाचत आहेत.

सलाम!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 30/11/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गात अतिमहत्त्वाची सभा भरली होती. विषय होता, वाढती गुन्हेगारी आणि दहशतवाद. विष्णूचे दशावतार पूर्ण झाल्यानंतर राक्षसांचा दहशतवाद पुन्हा वाढला होता. अतिमहत्त्वाच्या ठिकाणांसाठी, सर्वसामान्य ठिकाणांसाठी, असे वेगवेगळे दहशतवादी गट राक्षसांनी स्थापन केले होते. त्यांनी सगळीकडे उच्छाद मांडला होता. स्वर्गातल्या कुणालाच पहिल्यासारखे सुरक्षित वातावरण जाणवत नव्हते. अप्सरांचे अपहरण, देव-देवतांचा छळ, शुभकार्यात बाधा, काय वाटेल तसा धुमाकूळ राक्षस घालत होते. राजाधिराज इंद्रानं आणीबाणीची स्थिती ओळखून सर्वांशी सल्लामसलत करण्यासाठी आजची बैठक बोलावली होती.

कडव्या हिंदूंनी ते "पुण्यकर्म' करावेच

लेखक अन्वय यांनी शनिवार, 29/11/2008 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी पाडल्यानंतर मुंबईत जे बॉंबस्फोट झाले, तेव्हापासून देशविघातक कारवायांत स्थानिक मुस्लिमांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली. पुढे ज्या ज्या कारवाया करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने मुस्लिम नावेच समोर येत होती. वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून त्यावर चर्चा, टीका होत होती. मुस्लिमांमधील निरक्षरता, गरिबी यामुळे ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी बहुसंख्याकांनी प्रयत्न करावेत, असे मतही अनेक विचारवंतांनी प्रकट केले होते. त्यासाठी कुणी किती प्रयत्न केले, हा चर्चेचा मुद्दा आहे.

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन करता येईल का? -१

लेखक कलंत्री यांनी शनिवार, 29/11/2008 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या काळात हिंसेचे उत्तर हिंसेने किंवा त्यापेक्षा जास्त हिंसेने देण्यात यावे असा सर्वसाधारण लोकप्रिय समज आहे. कालच्या अतिरेकी कारवाईने प्रत्येक भारतीयाच्या मनात अथवा जगातील शांतताप्रेमींच्या मनात नकळतच एक काळजीची भावना निर्माण झाली आहे. सगळ्याच्याच मनात भडक विचार येत आहेत. एकदा सोक्षमोक्षच लावू या असाही विचार नकळतच सगळ्याच्या मनात येत असेलच. आरपाराची लढाईतर करून घ्याच. अशा पार्श्वभूमींवर या समस्येच्या मुळातच जाता येईल का?

गोंधळ

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 29/11/2008 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
होतोय गोंधळ.. नक्की होतोय गोंधळ! कुणाचा? कुणा कुणाचा? माझा! नक्कीच होतोय गोंधळ!! समोरून अनोळखी येताच मी आतून भेदरतो, तोंडदेखलं हसतो अंदाज घेतो लपवलेल्या बंदुकीने हा घालणार तर नाहि ना गोंधळ!! समोरून ओळखीचा येताच मी वरून सावरतो, आतून बावरतो अंदाज घेतो याच्याकडच्या एखाद्या बातमीने उडणार नाहि ना गोंधळ!! समोरच ते बाळ आतून बाहेरून कीती निश्चिंत आहे घरातून आक्रोश याच्या बालपणातच उडाला नसु दे रे देवा एक भयंकर गोंधळ!! कालच बघितलं होतं तिला झाडाच्या पाठी त्याच्याबरोबर त्याला डोळ्यांतून वेधणारी ती आज शोधतेय जमवतेय आपल्याच हृदयाचे तुकडे, ज्यात मावत नाहिये गोंधळ! तो बघा .... "तरी सांगत होते..

याचा अर्थ काय ?

लेखक हेरंब यांनी शनिवार, 29/11/2008 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळी (२९-११-०८)सर्व वाहिन्या आलटून पालटून पहाताना जाणवले की प्रत्येक ठिकाणी अतिरेक्यांचा आकडा वेगवेगळा होता. गृहमंत्रालय १५ अतिरेकी ठार व एक जिवंत पकडलेला असे दाखवत होते तर महाराष्ट्राचे गृहमंत्री ९ ठार व एक जिवंत असे सांगत होते. केंद्र व राज्य सरकारच्या माहितीत असा फरक कसा असू शकतो ? तसेच आजच सकाळी ताजचे ऑपरेशन संपल्यावर एक अतिरेकी तिथे जिवंत पकडल्याचे सांगत होते. त्याशिवाय करकर्‍यांना मारणारा जिवंत अतिरेकी मोजला तर ते दोन व्हायला हवेत. ही गफलत जाणुनबुजून तर नव्हे ??? ज्यांना अतिरेकी मोजता येत नाहीत ते त्यांच्यापासून आमचे संरक्षण कसे करणार ? १६ - १० = ???

हाफ शर्ट

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 29/11/2008 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
मला काही प्रष्न पडतात. गेले कित्येक वर्षे अनुत्तरित आहेत. ९२ च्या दंगलीत मी जसलोक मधे ४ दिवस भावाच्याबरोबर होतो. हार्ट ऍटॅक नंतर एडमिट केले होते. बाहेर पडणे शक्यच नव्हते. सर्वच पेटले होते. चारही दिवस माणसे बकर्-या सारखी कापलेली अर्धमेली माणसे स्ट्रेचर घालुन आणलेली बघितली. रक्ताचा तुटवडा. शेवटी वेटींग लाउंज मधील बाहेर न जाउ शकणा-या रुग्णांच्या परिचीतांनी पुढाकार घेतला. काल रक्तदान करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली. कठीण प्रंसंगात आजही तीच उदासिनता समाजात दिसते. दोन्ही (जे.जे.

मी १ शहिद बोलतोय.........

लेखक उम्मि यांनी शनिवार, 29/11/2008 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं जरा ऐकाल का?" "दह्शतवादाचा बिमोड करण्यासाठि माझ्यामते पुढिल उपाय आवश्यक आहेत.........." १. मुंबईसारख्या महत्वाच्या शहरातिल पोलिसांना एके-४७, एके-५६ वा तशाच सक्षम रायफली, व बुलेटप्रुफ जैकेटं पुरवावीत. २. मुंबईसारख्या महत्वाच्या शहरातिल सर्व शासकीय व खाजगी महत्वांच्या जागांना कडेकोट सुरक्षाव्यवस्था. (कारण हे दह्शतवादी नेहमी महत्वाची ठीकाणच नेमकी हेरतात.) ३. मुंबईत येणारया या नराधमांचा (all time) पिच्छा...(जर आपण त्यांचा पिच्छा केला नाही तर पुन्हा भविष्यात 'ते' नक्कीच येतील) ४. मुंबईची कसुन तपासणी (दहशतवादि मुंबईत लपुन बसु शकतात.) ५.