Skip to main content

ते ९६ भाग

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 04/12/2008 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा, गांधीवाद म्हणजे काय? रात्री ९.३० वाजता चिरंजिवांनी घरात गेल्या गेल्या प्रश्न विचारला. अरे, आपण उपवनात गेलो होतो तेंव्हा तळ्यात दोन बदके क्वॅक्,क्वॅक असा आवाज करत विहार करत होती, त्यांतले अत्यंत पांढरे शूभ्र बदक म्हणजे गांधीवाद.

तुमाला पटते का

लेखक दवबिन्दु यांनी गुरुवार, 04/12/2008 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबयीतील घटनेचा निशेध म्हनुन मेनबत्या लावु नका रक्तदान करा. आज मटामधं आलेलं एकाचं पत्र. त्याच म्हनन कायतरी असं काम करा ज्याचा उपयोग होयील.

49-O "एक शस्त्र" .. या बद्दल जाणून घ्या ..... माहिती असल्यास सर्वदूर पोहोचवा

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 04/12/2008 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
ही माहिती आंग्ल भाषेत मिळाली, चुकीचे भाषांतर-गैरसमज टाळण्यासाठी जशीच्या तशी देत आहे.. there is a system in our constitution, as per the 1969 act, in section " 49-O" that a person can go to the polling booth, confirm his identity, get his finger marked and convey the presiding election officer that he/she doesn't want to vote anyone! Yes such a feature is available, but obviously past + present leaders have never disclosed it. This is called "49-O". Why should You go and say " I VOTE NOBODY".

मुसलमान अतिरेक्यांचा भारतावर झालेला हल्ला (शीर्षक संपादित)

लेखक भाष यांनी गुरुवार, 04/12/2008 05:28 या दिवशी प्रकाशित केले.
X( गेले वर्षभर मला या किंवा इतर मराठी स्थळांवर यावेसे वाटत नव्हते. मुंबईवर झालेल्या मुसलमानी आक्रमणामुळे या २-३ स्थळांवर काय चालले आहे हे सहज बघावे म्हनुण आलो तेव्हा असे आढळले कि उपक्रम वर या बाबत काहीच नाही, मनोगतावर थोडेफार लिहिले आहे. मिसळपाववर त्यामानाने जास्त लिखाण दिसले, म्हणून इथे ४ शब्द लिहीत आहे. २६ नोव्हेंबरला इथल्या सकाळी ११ वाजता ( भारतातल्या रात्री ९:३० ) रेडियोवर बातमी ऐकली. लगेच भावाला मुंबईला फोन लावला तो लागला नाही. शेवटी दुपारी २ वाजता लागला. वहिनी म्हणाली कि भाऊ नेमका कामाच्या बैठकीसाठी तेव्हाच ताजमध्ये गेला होता तो नुकताच आला आहे.

पुस्तके पाहिजे आहेत बी.कॉम भाग -२ शिवाजी विध्यापीठ कोल्हापुर...

लेखक विवेचन यांनी गुरुवार, 04/12/2008 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो...मला शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर ची पुस्तके हवी आहेत्...बी.कॉम भाग-२ ..मी मुंबईत राहत आहे . अभ्यासासाठी मला लवकरात लवकर पुस्तकाची गरज आहे..तुम्हाला माहित असेल तर कृपया मला सांगा...कि मी मुंबईमधुन कशा प्रकारे पुस्तके मिळवु शकतो....एखादे पुस्तकाचे दुकान माहित असेल तर पत्ता पण द्या. आपला नविन मि.पा. सदस्य. विवेचन

दहशतवादाविरुद्ध एकत्र - Together Against Terrorism (पडसाद वृत्ते)

लेखक विकास यांनी गुरुवार, 04/12/2008 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक संस्था एकत्र येऊन कार्यक्रम करत आहेत तर काही ठिकाणी उस्फुर्त कार्यक्रम होत आहेत.

कलंत्रीसाहेबांना जाहीर प्रश्न..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 04/12/2008 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
कलंत्रीसाहेब, कृपया खालील प्रश्नांची उत्तरे द्या, ही विनंती.. घटना - मी अन् माझी बहिण रस्त्याने चाललो आहोत. कुणा गुंड-मवाल्याने माझ्या बहिणीकडे पाहात अत्यंत अश्लील उद्गार काढून तिचा अपमान केला, तिच्या स्त्रीत्वाला शिवी दिली.

माझे सारे जीवन देई मम बाळाला!

लेखक कलंत्री यांनी गुरुवार, 04/12/2008 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ वर्तमानपत्रातील २ तारखेची बातमी. आपणासर्वांना अशा घटनेबाबत आनंद आणि अभिमानच वाटेल. मॉ तुझे सलाम. सध्या भयंकर अशा अस्थिर वातावरणात आपल्या जीवाची पर्वा न करणारे भारतीय आहेत. बातमी खाली देत आहे. जेरुसलेम, ता. २ - मुंबईतील "नरिमन हाउस'मध्ये अतिरेकी घुसल्यानंतर भीतीने सॅंड्रा सॅम्युएल या "आजी' एका खोलीत घुसल्या. बाहेर मात्र बेछूट गोळीबार सुरू होता. "नरिमन हाउस' हे ज्यू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या "छाबड'चे (धार्मिक आणि शैक्षणिक केंद्र) मुख्यालय.

मला काय करता येईल?

लेखक शब्देय यांनी गुरुवार, 04/12/2008 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक साधा सवाल आहे. मी एक सामान्य माणूस आहे. मला आपल्या देशासाठी काही चांगले करायचे आहे. आज काल असे वाटू लगले आहे आहे मी नुसते बोलण्या पलिकडे काहीच करत नाहीये. नुसत्याच चर्चा ... मग तो विषय शेतकरी आत्महत्या करो वा २६/११ होवो. मी नुसते बोलण्या पलिकडे काहीच करत नाहीये. मला काही करयचे आहे. काय करता येईल? मी एक सामान्य माणूस आहे त्यामुळे ना मी गांधी बनेन ना बाबा आमटे. पण मला आपल्या देशासाठी काही चांगले करायचे आहे. कृपया मला सुचवा.

विलासराव देशमुख यांचा राजीनामा मंजूर

लेखक कशिद यांनी बुधवार, 03/12/2008 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
विलासराव देशमुख यांचा राजीनामा मंजूर विलासराव देशमुख यांचा राजीनामा मंजूर नवी दिल्ली - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा राजीनामा कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी मंजूर केला. जर उद्या कोणी विचारला कोण आहे मुख्यमंत्री तर जपून उत्तर दया [:)][8)] (राजकरानत लक्ष असनारा घालणारा) अक्षय