Skip to main content

अदा बेगम - भाग एक

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 29/03/2021 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
अदाबेगम ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सैंया तू झूठीयां मोह माया ये दुनिया दौलत नाही तो कुछ भी नाही उसके बिन तो साथ भी छुटियां अदाबेगम मखमली आवाजात गात होती. तिच्या दालनात बसलेले शौकीन त्या संगीतस्वर्गात भान हरपून गेले होते. तिच्या तानेसरशी, माना डोलत होत्या. तिच्या पदन्यासासरशी नजरा हालत होत्या. तिच्या फिक्या गुलाबी रंगाच्या लेहेंग्याच्या फिरकीसरशी नजर गिरकी घेत होती . साजिन्द्यांनी मध्येच वाजवलेल्या द्रुत लयीवर होणाऱ्या तिच्या वेगवान , मोहक अदांनी तिच्यावर नजर ठरत नव्हती .

अंतर्नाद

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 27/03/2021 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
अमूर्ताचा अंतर्नाद अक्षरांच्या कपारीत शब्दाशब्दाच्या घळीत ओळीओळीत गुंजला अमूर्ताचा पायरव हलकेच जाणवता अनाहत तरंगांनी डोहडोह डहुळला अमूर्ताचा पोत कसा अमूर्ताचा पैस किती अमूर्ताचा डंख कुठे विचारत विचारत अणुरेणू झंकारला
काव्यरस

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 6

लेखक राजा वळसंगकर यांनी शनिवार, 27/03/2021 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
To every problem, there is a most simple solution. हे चिंट्या जितके सहज म्हणाला, तितके सहज उत्तर मिळेल याची कुणालाच खात्री नव्हती. पण शोधले तर पाहिजेच! त्याशिवाय गत्यंतर नव्हते... ************************** गोष्टीचा आधीचा भाग.... इथे टिचकी मारा ************************** तिकीटघरात टेबलावर बसून सगळे आयडिया लढवू लागले. बोटीला स्टीयरिंग आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे? प्रवाहामुळे बोट ओढली गेली तर स्टीयरिंगने ने जागेवर आणता येणार नाही का?

सध्या मी काय पाहतोय ? भाग ३

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 26/03/2021 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्ष मी हिंदूस्थानात चांगले रस्ते असावेत यावर बोललो असेन पण आता देशात चांगले रस्ते, हायवे निर्माण होत आहेत याचा विशेष आनंद आहे. :) आज मा.नितीन गडकरी यांची याच विषयावर असलेली मुलाखत पाहिली आणि देशात रस्त्यांचे काम ते अतिशय भव्यतेने, वेगाने आणि पैशांची बचत देखील करुन करत आहेत हे समजले.

कहीं ये वो तो नही

लेखक प्रज्ञादीप यांनी शुक्रवार, 26/03/2021 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ गीत - जरासी आहट होती है तो दिल सोचता है ,कही ये वो तो नही जब whatsapp पे unknown no से Hii का massage आता है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नही .... जब भी instagram पे profile photo change करती हुं follower न होने के बावजुद भी massage request आती है nice DP है ये उसीकी अदा ...है ये उसीकी सदा कहीं ये वो तो नही ..... दिल में उठती है धडधडीसी नस-नस में मचलने लगी चिंगारीसी जब किसी नं से blanck call आता है और सुनने में आता है बस अखियोंका पानी ...कहीं ये वो तो नहीं ..कहीं ये वो तो नहीं

हाक......

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 26/03/2021 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
हाक........ देवा, मारु कशी रे तुजला हाक... किती संबोधने कामी आली.. मम प्रतिभाही इथे निमाली.. तरी म्हणसी मजला तू रे.. अजुनी करुणा भाक... ईश्वरा, मारु कशी रे तुजला हाक.. संग तुझा नित मजला असुनी.. कधी वाटते एकाकी मी.. पसरुनी बाहु पुन्हा मागते.. तुझीच केवळ साथ.. प्रभो, मारु कशी रे तुजला हाक.. आयुष्याच्या अवघड वळणी.. देवदूताची साथ घेऊनी.. पुढती आले कशीबशी मी.. संमुख आहे ही वैतरणी.. गाठू कसा रे काठ.. कृष्णा, मारु कशी रे तुजला हाक.. गुरुरायांनी धरुनी मम कर.. अश्रू पुसुनी दिधला मज धीर.. प्रेमभरे दाखविली त्यांनी.. नामाची ही वाट.. अनंता, मारु कशी रे तुजला हाक...
काव्यरस

शर्यतीचे अडथळे: ससा आणि कासव दोघंही वेगळे!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 25/03/2021 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. सध्याचा काळ हा असा आहे की कोणाशीही बोलताना आधी एक वाक्य बोलावं लागतं. आपण सर्व ठीक आहात ना? सर्व जण ठीक असतील आणि राहतील अशी आशा करतो आणि काही गोष्टी बोलतो. नुकताच दोन जवळच्या लहान मुलांच्या मस्ती मजा आणि भांडणाचा प्रसंग घडला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मुलं कशी प्रतिसाद देतात आणि कसे वागतात हे बघायला मिळालं. आणि त्या प्रसंगामुळे काही गोष्टींची जाणीवही झाली. त्यासंदर्भात काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करतो. माझी मुलगी अदू आणि तिच्या स्मिता आत्याचा मुलगा प्रसन्न. दोघंही खूप गोड बाळं. अदूला तर मी लहानपणापासून शुद्ध प्रसन्नता म्हणतो. अशी ही प्रसन्नता आणि तो प्रसन्न!

नकार

लेखक सरिता बांदेकर यांनी गुरुवार, 25/03/2021 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
नकार लेखिका सौ सरिता बांदेकर “ए,शुक शुक,कुठे येतोयस?? चल जा इथून.” “अगं,संडासाच्या दरवाज्यात ऊभं राहून कुणाला हाकलते आहेस????” मला माझा नवरा विचारत होता.त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझं आपलं घरात घूसू पाहणऱ्याला हूसकावून लावायचं काम चालू होतं.कितीही वेळा हाकललं,घरात घेण्यास नकार दिला तरी काही चेंगट घरात शिरण्याचा प्रयत्न करायचेच.माझा नकार ऐकला की त्यांना जोरात हसू यायचं. “ काय यडपट आहे ही.