राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो,
आपण सर्वच जण येथे नेहमी येत असता, लिहीत असता, वाचत असता. मिपावर येणे झाले नाही तर चुकल्याचुकल्या सारखे वाटते, मिपा आता कुटुंबाप्रमाणेच आहे, इत्यादी.. असेही आपल्यापैकी बरेच जण अनेकदा म्हणताना आढळतात..
आता कुटुंबाचाच विषय निघाला तेव्हा अर्थातच प्रत्येकाच्या जोडीदाराचा विषयही ओघानेच आला. आणि म्हणूनच हा पेश्शल धागा मिपाकर सदस्यांच्या जोडीदारांकरता आहे. त्यांची ओळख करून घेण्याकरताच आम्ही ह धागा सुरू करत आहोत..
मिपावरील पुरुष सभासदांच्या जोडीदारांना इथे मिपाच्या सुना मानले आहे आणि स्त्री सभासदांच्या जोडीदाराला येथे मिपाचे जावई मानले आहे.