Skip to main content

विमानतळ

लेखक भिडू यांनी मंगळवार, 16/12/2008 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी ऑफिसच्या कामानिमित्त लंडन ला जायचा योग आला.तिथुन परत येताना हिथ्रो विमानतळावर आलेला हा अनुभव्. पु.लं.

सुयोधन आणी कर्ण

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/12/2008 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काहि दिवसात मैत्रीशी संबधीत काहि धागे मि.पा. वर वाचावयास मिळाले आणी बरेच दिवस तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असे वाटत असलेली एक गोष्ट लिहायची प्रबळ इच्छा झाली. गोष्ट तशी जुनी म्हणजे महाभारतातील आहे, आपल्या पैकी बर्‍याच लोकांना माहितीही असेल. म्रुत्युंजय कर्ण एकदा सुयोधनाला (ह्याला आपण दुर्योधन या नावाने ओळखतो) भेटण्यासाठी त्याच्या महालात गेला होता, काही महत्वाच्या कामानिमित्त तेंव्हा सुयोधन बाहेर गेला होता व त्याला येण्यास थोडा अवधी लागणार होता. मित्राची वाट बघत बसलेल्या कर्णास सुयोधन पत्नी भानुमती हिने बुद्धिबळ खेळण्याचा आग्रह केला.

ठाणे ' मिपा ' कट्टा ( २ )

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी मंगळवार, 16/12/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपण सर्वांनी जो भरघोस प्रतिसाद दिलात त्याबद्दल प्रथम मी आपला आभारी आहे . त्यामुळे आता हा येणारा ' मिपा ' कट्टा अतिशय यशस्वी होईल यात शंका नाही. स्थळ : 'लक्ष्मी केशव कार्यालय' प्रताप सिनेमा समोर ; कोलबाड रोड ; खोपट ठाणे (प.) सर्वांनी दुपारी ४.०० पासून जमावयास सुरूवात करावी पण ५.०० पे़क्षा जास्ती उशीर करू नये ही विनंती . कट्ट्याला वेळेचे बंधन नसेल. जेवणात सामिष आणी निरामिष अशा दोन्ही पदार्थांचा अंर्तभाव असावा का ?

अवांतर प्रतिसाद आणि गप्पा

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 15/12/2008 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मराठी संकेतस्थळांवर वावरायला लागल्यापासून 'अवांतर' या शब्दाची विशिष्ट छटा लक्षात यायला लागली. हा शब्द अनेकदा वापरला गेलेला पाहिला. अवांतर लेखनाबद्दल आपली मते जाणून घ्यावीत असे वाटल्याने काथ्याकूटासाठी हा प्रस्ताव मांडत आहे. एखाद्या लेखामध्ये किंवा चर्चेमध्ये प्रतिसादात सदस्य काही उपमा देतो, मजेने काही लिहितो. वाचणार्‍याला वाटते की आपण दाद द्यावी. (इथेच अवांतर प्रतिसादाला सुरुवात होत असावी.) मग तो दाद देतो किंवा अजून काही भर घालतो. आता ज्याला उपप्रतिसाद आला आहे तो सौजन्य म्हणून त्वरित उत्तर देतो. या मध्ये हे उत्तर म्हणजे अक्षरशः मूळ लेखापेक्षा पूर्ण वेगळे होते.

बो॑बील

लेखक जयेश माधव यांनी सोमवार, 15/12/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रिय सुगरीणी॑नो ,सुगरण्या॑नो, बो॑बील हा मास इतका चवदार असुन सुद्धा कोणीच त्यावर नविन पाकक्रुती तयार का करीत नाही हो? जर कोणाकडे असेल तर आम्हालाही द्या!

बुद्धी (उद्धव मात्रावृत्त प्रयत्न)

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 15/12/2008 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी गोंधळलेलो असता ती ठाम राहिली होती मी दिशाहीन असताना ती नाव वल्हवत होती ती लक्ष अंधार-किरणे अंगावर आदळत होती अंधार अभेद्यच असता ती मिणमिणतच हो होती जाणीवा मजला नसता भोवती तर्कदुष्ट ते फार ती तर्कशुद्ध नसती तर जीवास कायमचा घोर ती दुसरी नसोन कोणी जी असता असते शुद्धी प्रेयसी अन ही सखी हो माझीच शाबुत "बुद्धी" --ऋषिकेश टीपः १. माझ्या बालबुद्धीप्रमाणे मी मात्रा नीट मोजल्या आहेत. जिथे जिथे चुकले आहे ते नक्की दाखवून द्या! २. मला व्रुत्त म्हणावे तितके कळले नाहि तरी जे काहि कळते त्यानुसार प्रयत्न.

विंडोज एक्सपीची सीडी कस्टमाईझ करा!!!

लेखक तात्या विंचू यांनी सोमवार, 15/12/2008 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
आपली ऑपरेटींग सिस्टीम अपडेट आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आपण अनेकदा वेबसाईटवरुन वेगवेगळे पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस, सर्व्हिस पॅक्स डाउनलोड करत असतो. पण आपल्या दुर्दैवाने आपली ओएस क्रॅश होते. विंडोज ऑपरेटींग सिस्टीम वापरणार्‍या बर्‍याच जणांना हा अनुभव असेल. ओएस इन्स्टॉल केल्यानंतर पुन्हा आपला पीसी पुर्ववत होण्यासाठी परत सगळे पॅचेस, सिक्युरीटी अपडेटस, सर्व्हिस पॅक्स इन्स्टॉल करावे लागतात. कारण आपल्याकडे ऑपरेटींग सिस्टीमची फक्त बेसिक इन्स्टॉलेशनची सीडी असते. कधी कधी ह्या सीडी मध्ये आवश्यक असे ड्रायव्हर्स नसतात. ते आपल्याला परत टा़कावे लागतात. ह्या सगळ्या प्रकारात बराच वेळ जातो.

मिपाचे जावई व सुना, एक ओळख....! :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 15/12/2008 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो, आपण सर्वच जण येथे नेहमी येत असता, लिहीत असता, वाचत असता. मिपावर येणे झाले नाही तर चुकल्याचुकल्या सारखे वाटते, मिपा आता कुटुंबाप्रमाणेच आहे, इत्यादी.. असेही आपल्यापैकी बरेच जण अनेकदा म्हणताना आढळतात.. आता कुटुंबाचाच विषय निघाला तेव्हा अर्थातच प्रत्येकाच्या जोडीदाराचा विषयही ओघानेच आला. आणि म्हणूनच हा पेश्शल धागा मिपाकर सदस्यांच्या जोडीदारांकरता आहे. त्यांची ओळख करून घेण्याकरताच आम्ही ह धागा सुरू करत आहोत.. मिपावरील पुरुष सभासदांच्या जोडीदारांना इथे मिपाच्या सुना मानले आहे आणि स्त्री सभासदांच्या जोडीदाराला येथे मिपाचे जावई मानले आहे.

जागतिक मंदी

लेखक राजा यांनी सोमवार, 15/12/2008 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
जागतीक मंदी एके काळी होता इथे माणसांचा वांधा पोटा पुरता नाही आता त्यांना काम धंदा कधी नाही झालं , हे काय झालं यंदा अशा " मंदीवर " कुणी उपाय तरी सांगा आधी पाऊस पडेना , म्हणुन वाढ्ली महागाई तिला पचवेल , आता आली मंदी बाई व्यापायांना धंदा नाही ,झाली कामाची टंचाई रोजच्या विचीत्र बात्म्यांनी डोकं चकावुन जाई मोठमोठया देशांमध्ये कामं राहिली नाही हिंडुन फिरुन लोकं पुन्हा मायदेशी येई कमी पगाराची त्यांना सवय राहिली नाही काही तरी केल्याशिवाय पोट भरणार नाही काम नाही मिळाले तर घर कसं चालेल खोली भाडं किराणा कसा बरं चुकेल खरंच काम नाही हे मनाला फकत पटेल पण काहीतरी खाल्याशिवाय पोट कसं भरेल मालकांच
Taxonomy upgrade extras