Skip to main content

अंडा बुर्जी - एक पाकृ / एक कला (वाचोगे तो जानोगे)

लेखक पांथस्थ यांनी बुधवार, 17/12/2008 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः * ३ अंडी * २ मध्यम कांदे बारिक चिरुन * १ मध्यम टोमॅटो चिरुन * २-३ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन * आवडी प्रमाणे कोथिंबीर बारिक चिरुन * २ चमचे गरम मसाला * १ चमचा तिखट झटपट कृती: १. कढई अथवा न-चिकट भांडयात तेल गरम करुन कांदा परता २. कांद थोडा परतला गेला कि हिरवी मिरची घालुन किंचित परतुन घ्या ३.

आजि मी विठ्ठ्ल पाहीले

लेखक मंदार धारप यांनी मंगळवार, 16/12/2008 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिसळपावचे मालक तात्या अभ्यंकर ह्यांचे सद्गुरु जसे स्वरभास्कर भिमसेन जोशी, तसेच माझे सद्गुरु म्हणजे आपला सचिन रमेश तेंडुलकर. काल सचिनने शतक ठोकून भारताला सामना जिंकून दिला आणि डोळ्यात टचकन पाणि आले. एकोणिस वर्षे सतत देशाची सेवा निरपे़क्श भावनेने करणार्या सचिन, आजही लहान मुलासारखा नाचला. गेलि दोन-तीन वर्षे मे सचिन वरून लोकांचि आतोनात बोलणी खाल्ली आहेत. त्याचे काही तथाकथित दोष : १. त्याने शतक ठोकले की भारत हारतो. २. तो फायनल मधेकधीच खेळत नाही ३. तो म्हातारा झाला आहे ४. तो सेल्फिश आहे ५.

माझा गाव

लेखक लवंगी यांनी मंगळवार, 16/12/2008 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मनकोन्यात दडलय गाव सागरलाटांवर डुलतेय नाव|| माडांच्या पानात सुरुच्या रानात वार्‍याची गाणी घुमती कानात देवळाच्या घंटेत श्रद्धाभाव सागरलाटांवर डुलतेय नाव|| पाउलवाटेवर धुळीशी कुस्ती बैलगाडीतील मित्रांशी मस्ती पावसाच्या सरीत भिजलाय गाव सागरलाटांवर डुलतेय नाव|| चमचमत्या वाळूत ओलीशी पावल आबांच्या राईत आभाळ मावल आजीची हाक घेते काळजाचा ठाव सागरलाटांवर डुलतेय नाव||

माज्या आज्याचा दारूचा धंदा

लेखक ब्रिटिश यांनी मंगळवार, 16/12/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
माजा आजा दारु कती पेत आसल ते तुमाला येगल सांगाची गरज नाय. यका गुत्तेवाल्याला फुल गब्बर करून मगच दुसर्‍या गुत्याव जाईल आसा परोपकारी मानूस. यकदा आसच झिपर्‍या न आजा पेत बसलवत. (झिपर्‍या आमचा गडी हाय) 'शेट तुमी रोच्ची कती दारू पीताव ?' 'मना क म्हाईत र ? आनी कनाला मोजाची ? गल्यापातुर आली क बास कराची.' आजा 'तस नाय वो शेट, मना म्हनाच हाय क कती रुपयाची पीताव ?' 'आसा बग सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान' आज्यासचा तोंडी हिशेब. 'आर बाबा तिनशे रूपए !' 'मग ? म्हागाय कती वारलीय र . नव्वद ची यक बाटली येती. सकाल दूपार न राच्च. तीन टाईम' आजा 'आवशिद झेताव जनू' 'तर तर !

बोंबीलाच्या निमीत्तानं

लेखक रामदास यांनी मंगळवार, 16/12/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
जयेश माधव यांचा बोंबीलाचा पाकचर्चा प्रस्ताव आज वाचला.माझे मित्र उदय यांनी एकूण संपूर्ण मत्स्य परीवारावर एक सुरेख लेख लिहीला होता .तो आज येथे देतो आहे.(लेखक परगावी असल्यामुळे त्यांची पूर्वपरवानगी घेऊन प्रकाशीत करत आहे.)

स्नेहसंमेलने.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 16/12/2008 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपण दे रे देवा असे काहीसे आपण नेहमीच म्हणतो. अशा लहानपणाच्या आनंदाचा उत्कर्ष आपापल्या स्नेहसंमेलनात होत असतो. लहानपणी याला विविधगुणदर्शन असेही म्हणत असत. आज माझ्या मुलीच्या स्नेहसंमेलनात जाण्याचा योग आला. पूर्वी कार्यक्रमाला सूत्र असे नसायचे. आजचा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्र या कल्पनेभोवती विणला होता. गणेशवंदना, कोळी नृत्य, ज्ञानेश्वर-चांगदेव संवादाचे नाट्यकरण, गणपती मिरवणूक, वासुदेव, जात्यावरच्या ओव्या आणि शिवराज्याभिषेक असा सर्वांग सुंदर कार्यक्रम होता. सर्वसाधारण नाताळाच्या १ ते १ १/२ महिने अगोदर स्नेहसंमेलनाची तयारी सुरु होते.

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा... भाग २

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 16/12/2008 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/1844 भाग १... काही सिनेमे असतात त्यांवर अवांतर गप्पा ठोकता येतात.. त्यासाठी हा धागा काढला होता, आधीच्या धाग्याचे पान भरल्याने नवीन भाग २ काढला आहे.... ______________________________ रब ने बना दी जोडी हा आदि चोप्राचा सिनेमा मी पाहिला ... नवरा मिशी काढून केस फेंदारून टाईट टी शर्टमध्ये आला म्हणून बायको त्याला ओळखत नाही असे एक गृहितक मान्य केले तर सिनेमा पाहता ये ईल.... त्या नव्या माणसाच्या भूमिकेची शाहरूखने अत्यंत ओव्हरऍक्टिंग करून वाट लावली आहे... पण आधीचा सुरिंदर साहनी त्याने अप्रतिम उभा केलाय....

अभिनंदन करुया! धोंडोपंत इंटरनॅशनल झाले!

लेखक अनंत छंदी यांनी मंगळवार, 16/12/2008 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपा परिवाराचे ज्येष्ठ सदस्य, सुविख्यात ज्योतिषी धोंडोपंत आपटे यांनी आपला इंग्रजी ब्लॉग सुरू केला असून त्यामुळे ते आता इंटरनॅशनल ज्योतिषी झाले आहेत. :)) आपल्या मराठी ब्लॉगसारखाच ते हा ब्लॉगही झकासपणे चालवितील यात शंका नाही. त्यांना आपण शुभेच्छा देऊया! अलिकडे पंत जरा जास्त चिडचिड करतात असे कोणाला वाटले तरी (हा हर्षल शनि प्रतियोगाचा परिणाम असावा का? :) )ते आपले आहेत हे लक्षात घ्यावे.

या सुंदर ग्रहावर आपला हक्क काय ?

लेखक बामनाचं पोर यांनी मंगळवार, 16/12/2008 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
काल नविन सिनेमा पाहिला.. 'The Day the Earth Stood Still' . बेकार होता तसा पण त्यातले एक वाक्य होत , परग्रहावरुन आलेला एलियन माणसाला ( अर्थातच हिरॉईनला ) म्हणतो , ' its not your planet, i didnt came to destroy this planet , i came to save it ..from you.. because you human never change '. थोडा विचार केला तर पटतं हे. या सुदंर पृथ्वी वर आपला काय हक्क ? अफाट पसरलेल्या विश्वाकडे नजर टाकली की जाणवत आपण किती शुल्लक आहोत ते. अगदी निसर्ग साध्या पाउसाच्या रुपाने रागवला तर हतबल होउन जातो. पण तरी बदलत नाही , अंगातला ज्ञानाचा माज कायम आहे.