Skip to main content

माहिती

लेखक प्राप्ती यांनी बुधवार, 14/01/2009 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
मला tomato सुप करण्याची पद्धत हवी आहे

माहेती

लेखक प्राप्ती यांनी बुधवार, 14/01/2009 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला महिला कोणता व्यवसाय करु शकतात वि़षयी माहेती हवी आहे

च्या मारी धरून फटॅक्... :) ....(मिपावरील प्रतिक्रिया-सम्राटांना च्यायलेंज्)!

लेखक झेल्या यांनी बुधवार, 14/01/2009 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
"च्या मारी धरून फटॅक्" ही एक अलीकडील गाजलेली ऐकलेल्या गाण्यावरील उत्स्फूर्त प्रतिक्रिया... वेगवेगळ्या प्रकारची (आनंदी, उडती, बुडती, कुढ्ती, कुंथती...रडकी, पडकी...सुरेल, बेसूर्...शुद्ध, अशुद्ध, बेशुद्ध इ. इ.) गाणी ऐकून आपण कोणकोणत्या/कशाकशा/कायकाय (!?) प्रतिक्रिया द्याल.....कृपया इथे नोंदवा... "फक्कड्..तंगडीतोड्-हुक्काओढ झालं गाणं.."(कशी वाटली?) तर अशाच काही भन्नाट प्रतिक्रियांचा संग्रह करूया....! घ्या देवाचं नाव आणि करा सुरू.. हर हर महादेव...!

पायी प्रवासातली मजा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 14/01/2009 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
"मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.त्यांच्या चेहर्‍यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं " श्रीधर केळकर बरीच वर्ष इंग्लंडमधे राहत होते.आता निवृत्त झाल्यावर परत ते भारतात कायमचे राहायला आले.इंग्लंडमधे असताना त्यांना मैलो- मैल पायी प्रवास करायची संवय होती.इथे आल्यावर त्यानी तेच करायचं ठरवलं.प्रथम प्रवासाचा मोठा पल्ला घेण्याऐवजी त्यानी मुंबईहून कोकणात आणि पुढे गोव्यात पायी प्रवास करायचं ठरवलं. केळकर म्हणाले, "इंग्लंडमधे राहात असताना कामावर जायच्यावेळी कुणाची ना कुणाची लिफ्ट मिळायची.त्यामुळे

संक्रांत कशासाठी

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 14/01/2009 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, सुवासिनिंचे हळद-कुंकवाला एकमेकींकडे जाणे येणे, आवा लुटणे, नवीन सुगड्यात बोरे, चिंचा, उसाची कांडे भरुन त्यांची पुजा करणे, चिल्या-पिल्यांचे बोर न्हाण, पतंगांच्या भरार्‍या... ही सगळी लगबग डोळ्यासमोर येते. मला मात्र एक गोष्टीची गंमत वाटते. आजकालच्या संक्रांतीची भेटकार्डे व शुभेच्छापंत्रांत तिळ-गुळाचा भरपूर उधो-उधो होतो. पण त्यासारख्याच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाच्या सांस्कृतीक गोष्टींकडे मात्र आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही.

लालजी देसाईंचे (पु लंच्या रविवार सकाळ मधले गायक) निधन

लेखक मिसळपाव यांनी बुधवार, 14/01/2009 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राकडून बातमी मिळाली की लालजी देसाई गेले. पु लंच्या 'रविवार सकाळ' मधे अतिशय बहारदार गाणं असायचं त्यांचं. थोड्याशा भीमसेनांच्या ढंगात ते 'उगीच का कांता' असं काही सुरेख रंगवतात की व्वा! श्रीकांत मोघेने थोडा वात्रटपणा केल्यावर लालजी, 'कांSSS ता SSSSSS' अशी नाजुक हरकत घेतात नी श्रीकांत मोघेंची 'अग आई ग' अशी दाद जाते !! कींवा 'धरणीSSSSS' म्हणून ठासून दाखवतानाचा आवेश, कानडी ढंगात गायला सुरूवात केल्यावर त्याच 'धरणीSSSSसंग'ला 'वा..वा..वा' अशी श्रीकांत मोघेंची मॅचिंग दाद.....छे.

एक निवेदन

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 14/01/2009 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाला आत्ताच हाती आलेल्या धक्कादायक माहिती नुसार आमचे मिसळपाव वरील स्नेही श्री.अजानुकर्ण ह्यांचे खाते उडवल्याची माहिती मिळाली. श्री. अजानुकर्ण हे मिसळपाव द्वेष्टे अथवा मिसळपाव कंटक असल्याने त्यांचे खाते उडवलेले दिसते. तसे असेल तर ते अगदी योग्य आहे. परंतू ते एक ज्येष्ठ सभासद देखिल होते आणि कोणत्याही आगाऊ सुचने शिवाय त्यांचे खाते उडवले जात असेल तर 'मिसळपाव कंटक' किंवा 'मिपाद्वेष्टे' बनु नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ह्याची स्पष्ट कल्पना कृपया मिपा व्यवस्थापन/ संचालक/ संपादक ह्यांनी द्यावी अशी नम्र विनंती. श्री.

ही कुठली "गिरी" बरं?

लेखक विकास यांनी बुधवार, 14/01/2009 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच रेडीफ.कॉम वर एक बातमी वाचली. त्याप्रमाणे पांढरे कबुतर(डोव्ह) असलेले एक भेटकार्ड नविन वर्षाच्या शुभेच्छांसहीत पंतप्रधान मनमोहनसिंग आणि त्यांच्या पत्नीने सही करून पाकीस्तानी पंतप्रधानांना पाठवले. ही वरील बातमी वाचल्यावर प्रश्न पडला की हक्की नक्की कोणती गिरी आहे? - गांधीगिरी, मुन्नाभाई गिरि आहे का मनमोहन गिरी आहे ते. तुम्हाला काय वाटले बातमी वाचून?

वैद्यकात वस्तुनिष्ठता

लेखक धनंजय यांनी बुधवार, 14/01/2009 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच "अतींद्रिय शक्ती" या लेखात डॉ. दाढे यांचा प्रतिसाद वाचला. वैद्यकशास्त्रात खूप काही अगम्य असते याबाबत मी त्यांच्याशी सहमत आहे. परंतु त्या योग्य विचारांबरोबर त्यांनी वैज्ञानिकांच्या अहंमन्यतेबद्दल निष्कर्ष काढला होता. अहंमन्यता आणि वस्तुनिष्ठता यांच्यात पुष्कळदा गल्लत होते, असे मला वाटते. त्यावरून मागे रेडियोवर ऐकलेली एक मुलाखत आठवली. डॉक्टर रेचल नेओमी रेमेन या श्रद्धेबाबत, डॉक्टर-पेशंट संबंधाबाबत डॉक्टराने जागरूक असण्याबाबत मुलाखत देत होत्या. या सर्व बाबतीत मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो.