Skip to main content

एकेकाची संक्रांत

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 15/01/2009 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग : १ (राज ठाकरेंचा बंगला) (वहिनी व राजसाहेब एक मोठ्या पातेल्या समोर बसले आहेत आणी लहान लहान पिशवीत हलवा आणी रेल्वेची तिकिटे भरत आहेत.) आम्ही :- हॅ हॅ हॅ संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा .. राजसाहेब :- तिळगुळ घ्या तिकिट घ्या आणी आपल्या राज्यात सुखी रहा. आम्ही :- तुमच्याच राज्यातले रहिवासी आहोत आम्ही साहेब, आत कुठे पाठवताय आम्हाल अजुन ? राजसाहेब :- अरे हो खरेच की लक्षातच आले नाही. बर मिळाला ना तिळगुळ ? फुटा आता. उगाच कामत असताना त्रास देउ नका. आम्ही :- (चिवटपणाने) साहेब मातोश्रीवर देउन आलात का नाही तिळगुळ ? राजसाहेब :- तुम्हाला काय कारयच्या आहेत हो चांभार चौकशा ?

माहिती

लेखक श्रेया यांनी गुरुवार, 15/01/2009 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला पुस्तक वाचन्यासाठी त्यांची नावे व लेखकाचे नाव द्या

लठठ मनोगत

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 15/01/2009 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी' बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती घाल पुन्हा धुडगूस जाली लोकांना हसू दे थोडे आम्हा सांगती 'अतींद्रिये', सोडशील तू निवृत्ती आधी शोध ही गम्भीर कविता लिहीली होती पण वरील काव्य वाचुन नवीन कल्पना सुचली ती अशी लठठ मनोगत मांस माझे घेतोस का ?
Taxonomy upgrade extras

शोध

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 15/01/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
शोध बांधलेला आहे गुलाम अवघा समाज त्यांच्या कासरा नसलेल्या दावणीला, रक्ताचे पाट वाहत आहेत डोळ्यातुन पण त्याचा पत्ता लागत नाही पापणीला ! छप्पर उडुन गेल्यावर आधार देणारे स्तंभ कोसळुन पड्तील जमीन मात्र तीच राहील फक्त नात्याचे संदर्भ बदलुन जातील ! प्रुथ्वी पुन्हा फिरत राहील घड्याळाच्या काट्यासारखी अनन्त कालापर्यंत आणी माणुस हातात अण्वस्त्र घेउन फिरत राहील हरवून गेलेल्या माणुसकीचा ! अनिरुद्ध>
Taxonomy upgrade extras

संवाद कौशल्ये - माहिती आणि प्रश्न

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 15/01/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, उत्तन (भाईंदर) येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये येत्या २४ व २५ जानेवारीला वकृत्वकला आणि संभाषण कौशल्ये या विषयावर कार्यशाळा आयोजीत केलेली आहे. हे दोन दिवसांचे निवासी शिबीर आहे. अधीक माहितीसाठी येथे बघा. मला या संदर्भात काही प्रश्न पडले आहेत. कृपया जाणकारांनी माहिती द्यावी. १) ही कार्यशाळा कुणी केली आहे का? अनुभव काय आहे? २) दोन दिवसांच्या या कार्यशाळेने माझ्या संवाद कौशल्यांत भर पडेल का?

`स्ममडॉग'...कुणी सांगेल का?

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 15/01/2009 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
`स्लमडॉग मिलेनिअर' ला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. रेहमानलाही. हा भारतीय संगीतकाराचा पहिला बहुमान. पण गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी आधी कुणी भारतीय चित्रपट पाठविल्याचं किंवा स्पर्धेत असल्याचं ऐकिवात नाही. `स्लमडॉग' भारतीय चित्रपट नाही. त्याला म्हणूनच तिथे प्रवेश मिळाला का? कारण आत्तापर्यंत कुठलाही भारतीय चित्रपट गोल्डन ग्लोब साठी स्पर्धेत असल्याचं ऐकलेलं नाही. या पुरस्कारासाठीचे निकष कोणते, भारतीय चित्रपट त्या स्पर्धेत आधी होते का, नसले तर का नाही, याबाबत कुणी अधिक माहिती देऊ शकेल काय?

मनाच्या कुपितले-तुकयाची आवली

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 15/01/2009 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मनाच्या कुपितले या सदरातला हा तिसरा लेख
'' तुकयाची आवली एक अनोखी जीवनयात्रा''
'' तुकयाची आवली'' ही सौ. मंजुश्री गोखले यांची कांदबरी. तुकारामांची दुसरी पत्नी आवली हीच भावविश्व सांगणारी एका वाक्यात सांगायचे तर ''कल्पनेतला चंद्र हातात घरण्याची मनिषा बाळगून तो चंद्र प्रत्यक्षात प्राप्त करणं'' असंच या कादंबरी बाबतीत म्हणावं लागेल.

(वगैरे...)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 15/01/2009 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा वैभव जोशी यांची अप्रतिम गझल वगैरे... पुरे जाहले ते फरारी वगैरे पुन्हा सज्ज झालो शिकारी वगैरे खरे सांगतो टाकलेलीच नाही तुझी मात्र चर्या.. दुपारी!?.. वगैरे विचारा खरोखर निघालास कोठे? तुम्हा वाटले ना शिवारी वगैरे कशाचीच आता नशा येत नाही जरी घेतली प्रथम धारी..

बाला,

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 15/01/2009 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
तू मुसमुसलेली, षोड्शा,सुंदर बाला, घातला नजरेन,तू,ह्रुदयावर की घाला. नजर धारधार, यौवनाचा कहर, तू तिलोत्तमा नि रतीहुन भासे सुंदर. साडीत लपेट्ले,गोरे कोवळे तन, काचोळीत बांधले, खट्याळ ते यौवन यौवन गंध दरवळे अवती भवती, उन्मादक नजर आग भडकवे वरती. तो मुखडा सुंदर,गोजिरा अन लाजरा ते नयन चेट्की, त्यावर पापण्यांचा पहारा. ओठांची महीरप,करे मम मनांस दंग आत असे दंतपंक्ती कि शुभ्र मोत्याची रांग. तू मधु शर्वरी, चांदणी तु शुक्राची सुंदर चाफेकळी तू, कळी लावण्याची, उतरली भू तळी रंभा की अप्सरा वळती तुझकडे वारंवार की नजरा. काय करावी शायरी तव रुपावर शब्दांचा खजीना,अपुरा वाटे खरोखर कीती करु गोळा मी शब्दांचे हे क

खाज!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 15/01/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
'माज!' वाचल्यावर 'खाज' सुटली नाही तर रंग्या कसला? तेव्हा सादर आहे .. कालचा 'गजकर्ण' थोडा आज आहे , आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कोणत्या वैद्याकडे मी जात नाही, आपल्या वैदूगिरीचा माज आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कालच्या 'पेल्यातले' तात्पर्य थोडे, अन उद्याचा 'बेवडा' अंदाज आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ घोरण्याचा ध्यासही आहे कधीचा, अंगणातच घोंगडी अन 'बाज' आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ तोंड मी कोठे कधी लपवू पाहातो ना जनाची वा मनाची 'लाज' आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे चतुरंग
Taxonomy upgrade extras