Skip to main content

प्रतिभेचा सन्मान..!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 26/01/2009 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
हृदयनाथ मंगेशकर! मराठी भावसंगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे, एक अत्यंत प्रतिभावान संगीतकार! त्यांना या वर्षी भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे! मिपा परिवारातर्फे या अनवट कलाकाराचे मन:पूर्वक अभिनंदन..! त्यांची उत्तमोत्तम गाणी आम्हाला यापुढेही ऐकायला मिळोत हीच सदिच्छा! (हृदयनाथप्रेमी) तात्या.

ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी सोमवार, 26/01/2009 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
चेहरा सारे खरे ते सांगतो याचसाठी आरसा मी टाळतो वेगळे घडणार अंती जाणतो मी तरी आंदाज माझे बाधतो कोंडली मी वादळे माझ्यामध्ये फुंकरीने मात्र मी घायाळतो माळरानावर मनाच्या एकटा मी कुणाची वाट आहे पाहतो यायची असतेस तेव्हा का मला काळ थोडा थांबल्यागत वाटतो एवढा साधा नसावा प्रश्न तो! उत्तराला वेळ आहे लागतो ही तुझी माझीच आहे गोष्ट पण नाव मी बदलून आता सांगतो मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा आठवांच्या या स्मशानी हिंडतो -अनिरुद्ध अभ्यंकर

प्रजासत्ताक दिन

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 25/01/2009 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या प्रजासत्ताक दिन आहे. बहुतेक सर्व सोसायट्या कॉलन्या आपापल्या आवारात ध्वजवंदन करतील. ठराविक गाणी म्हणतील. ठराविक छापाची भाषणे करतील. यातल्या बहुतेकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन दोन्हीतील फरक माहित नसेल. बहुतेकांच्या लेखी दोन्ही दिवस सारखेच. शर्टावर टाचणीने झेंडा लावून फिरण्याचा. स्वातंत्र्यदिनी आपण ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालो. तो एक टप्पा होता. प्रजासत्ताक दिनी 'आपण' आपला देश कशा पद्धतीने चालवणार आहोत हे ठरवले. यादिवशी 'आपण' लोकशाहीची स्थापना केली. ही लोकशाही अजून आपल्याला समजली आहे का? आपणच आपला देश (चांगल्या किंवा वाईट रीतीने) चालवीत आहोत अशी भावना दिसत नाही.

जय जय भारत ! जय जय भारत !

लेखक आचरट कार्टा यांनी रविवार, 25/01/2009 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
धवलगिरीच्या हिमशिखरांतुन सह्याद्रीच्या उंच कड्यांतुन गंगा-यमुना-गोदावरीच्या शुभ्र स्फटिकसम शीत जलातुन घोष एक हा घुमू लागला जय जय भारत ! जय जय भारत ! भेदातीत गर्जना होतसे जय जय भारत ! जय जय भारत ! सूप्त अग्नि तो फुलून उठला क्रांतीच्या कुंडात प्रकटला पाश तोडण्या परदास्याचा तृतिय नेत्र शंकरे उघडिला पितृभूमी ही मुक्त कराया सुपुत्र रणसागर हा आला कोटिकंठरव कानी येई जय जय भारत ! जय जय भारत ! स्वप्राणांच्या असंख्य ज्योती स्वयें अर्पिल्या या देशाप्रति निर्भय योद्धे रणात पडले देउनि निज प्राणांच्या आहुति क्रांतिवीर ते अमर जाहले विसरुनि घर अन्‌ विसरुनि नाती तख़्तावरही गर्जुन गेले जय जय भारत !
Taxonomy upgrade extras

शून्य प्रहर... भाग १

लेखक रामदास यांनी रविवार, 25/01/2009 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
चार जिने चढून येताना साळवेला दम लागला होता.साळवेच्या सोबत मेल नर्स परमार होता. अडतीस नंबरला ताप असल्याचा मेमो पाठवून दोन तासानी परमार उगवला होता.साळवेला उशीर आवडायचा नाही.परमार बरोबर शिफ्टमध्ये काम करणं साळवेला आवडायचं नाही.

मराठी गाण्यांची हातभट्टी

लेखक विंजिनेर यांनी रविवार, 25/01/2009 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच मला http://ghewoontaak.co.cc ह्या संकेतस्थळाचा शोध लागला. येथे घावूक प्रमाणात मराठी गाणी/कथाकथन इ. सर्रास उपल्ब्ध आहे (अर्थातच बेकायदेशीर) ही हातभट्टी बंद करायला काही उपाय आहे काय? - मराठी गाण्यांचा प्रेमी

भारत माझा एक रॆ

लेखक राजा यांनी रविवार, 25/01/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
भारत माझा एक रॆ ---- ( दॆशभक्ती) जाती धर्म वेश भुषा भाषा जरी अनेक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥ ध्रु ॥ ईथली गीता कुराण बायबल ग्रंथ जरी अनेक रे , संदेश त्यांचा एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥१॥ ईथली गंगा गोदा र्नमदा तापी नदी अनेक रे , पाणी त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥२॥ ईथले गांधी नेहरु भिमराव शिवबा हे नेते अनेक रे , कार्य त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥३॥ ईथला माणुस पक्षी प्राणी सजीव जरी अनेक रे , रक्त त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥४॥ ईथले मंदिर मज्जिद चर्च गुरुद्वारा अनेक रे ,भक
Taxonomy upgrade extras

लांडग्याला कसे आवरायचे?

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 25/01/2009 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
हा लांडगा नुकताच सभासद झाला आहे. तो ज्याधाग्यावर प्रतिसाद लिहितो त्या धाग्यावर गेल्यावर बाकी सभासद लॉग आउट होत आहेत याचं काय करायचे? हे मिपावरील परकीय (इतर दुष्ट संकेत्स्थळांकडून) आक्रमण समजावे का?

ये लांडग्या .. हरामखोरची अवलाद !

लेखक दशानन यांनी रविवार, 25/01/2009 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
हा http://www.misalpav.com/user/3370 लांडगा सदस्य आपल्या प्रतिसादामधून लेखना मधून ड्रुपल लॉग-ऑउट चा कोड पाठवत आहे त्याच्यामुळेच आपण सर्वजण आपोआप लॉग ऑउट होत आहोत.... हे हारामखोरा.... **त दम असेल तर सर समोरा समोरुन वार कर ना का हिजड्यासारखा पाठी मागून वार करत आहेस. तात्या, ह्याचा आयपी-शोधा व एक पोलिस कंप्लेट टाका ... आमच्या खाजगी संकेतस्थळाला इजा पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणुन. असले हरामी पैदा कसे होतात काय माहीत.

गुलबचा सण

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 25/01/2009 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष एक झाल सखे गुलाबाचा सण होता दोन मने जोड्णारा एक वेडा क्षण होता फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत मनामध्ये होती भीती काटे त्याचे बोचतिल नकाराचे शब्द तिचे कायमचे टोचतील पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे वर्ष एक गेल कस कळलच नाही काही गुलाबाच्या गंधातच गुंतुनिया मन राही
Taxonomy upgrade extras