मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारत माझा एक रॆ

राजा · · जे न देखे रवी...
भारत माझा एक रॆ ---- ( दॆशभक्ती) जाती धर्म वेश भुषा भाषा जरी अनेक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥ ध्रु ॥ ईथली गीता कुराण बायबल ग्रंथ जरी अनेक रे , संदेश त्यांचा एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥१॥ ईथली गंगा गोदा र्नमदा तापी नदी अनेक रे , पाणी त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥२॥ ईथले गांधी नेहरु भिमराव शिवबा हे नेते अनेक रे , कार्य त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥३॥ ईथला माणुस पक्षी प्राणी सजीव जरी अनेक रे , रक्त त्यांचं एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥४॥ ईथले मंदिर मज्जिद चर्च गुरुद्वारा अनेक रे ,भक्ती त्यांची एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥५॥ ईथली माती पिकवी मोती पिकं जरी अनेक रे , दाणा त्यांचा एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥६॥ लहान मोठा गरिब श्रीमंत राजा असो की रंक रे, तिरंगा आमचा एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ ॥७॥

वाचने 1493 वाचनखूण प्रतिक्रिया 2

विसोबा खेचर 26/01/2009 - 00:57
लहान मोठा गरिब श्रीमंत राजा असो की रंक रे, तिरंगा आमचा एक रे भारत माझा एक रॆ , भारत माझा एक रॆ वा! तात्या.

विकास 26/01/2009 - 01:04
"भारत माझा एक" हे जितके सत्य आहे, तितकेच, "एक भारतच माझा आहे" हे जेंव्हा समजेल तेंव्हा काही गोष्टी (चांगल्यासाठी) बदलायला मदत होईल असे वाटते.