Skip to main content

आनंद यादव यांच्या लिखाणावर आक्षेप?

लेखक चामट्या यांनी गुरुवार, 05/02/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
संतसूर्य तुकाराम' कादंबरीत महाराजांची बदनामी? साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद यादव यांच्या ‘ संतसूर्य तुकाराम ’ या नव्या कादंबरीतील मजकूरामुळे वारक-यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आयडिया सारेगम शेवटची घंटा..

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 05/02/2009 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
त्वरा करा.. वेळ संपत आली आहे आपल्या आवडत्या लिल चॅम्प ला व्होट करण्याची. मित्रहो, क्रुपया व्होटींग लाइन्स बंद होण्यापुर्वी आपले व्होट रजिस्टर करा.. इथे ब्लॉगवर.. काही खरडलंय या विषयावर.. बघा पटतंय का.. http://tinyurl.com/cyf74d

सोळावं वरीस धोक्याचं..!

लेखक पारोळेकर यांनी गुरुवार, 05/02/2009 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
तारूण्याच्या दिशेने झुकणारे वय... सोळावे वरीस ! तरूण-तरूणींसाठी मोठ्या धोक्याचंच असतं. या वयात तरूण-तरूणी प्रेम, मैत्री या गोष्टीमध्ये विनाकारण गुरफटून जातात. एका बाजुला अभ्यासाचा ताण व दुसरीकडे 'तो' तिच्या व 'ती' त्याच्या, आठवणीत रात्र जागून काढत बसावं लागते. या वयात जे काही होतं ते तरूण-तरूणींनी अनुकरणातून शिकले असतात. कारण त्यांना या गोष्टीचा फारसा अनुभव आलेला नसतो. तरूण्याची पहिली पायरी समजणार्‍या सोळाव्या वर्षात स्वत:ला जेवढे जपले तेवढे कमी असते. या वयातच तरूण-तरूणी अधिक घसरतात. ज्याला सावरता आले़ त्याचेच करियर उज्ज्वल होते. नाही तर 'घडीचे घड्याळ' व्हायला वेळ लागत नाही.

पुस्तक हवी आहेत ?

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी गुरुवार, 05/02/2009 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
मला काहि व्यक्तीच्या जिवनावरील पुस्तके हवि आहेत जरा मदत कराल का???? १ प्रताप्रराव गुजर २ नेताजी पालकर ३ बहीर्जी नाईक ४ थोरला बाजीराव पेशवा ५ मस्तानी जर कोणा मिपाकरांस या महान व्यक्तीच्या जिवनावरील पुस्तके माहित असल्यास जरा मला मदत करा अजुन काहि असल्यास ईथे महिति द्या

नीलकांतकी चल पडी! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 05/02/2009 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकेत होणार्‍या साहित्य संमेलनाशी निगडीत मिपावर या आधीच बराच काथ्याकूट झाल्यामुळे खालील मजकूर कदाचित कुणाला मस्करी वाटू शकेल. परंतु तसे नाही. जरी मौजमजा, विरंगुळा सदरात टाकली असली तरी ही सत्यघटना आहे. देवकुळेकाकांचा नंबर आता आमच्या भ्रमणध्वनिवर आहे खरा परंतु घाईगडबडीत त्यांना मिपावर चाललेली चर्चा वाचा आणि जमल्यास खुलासा करा असे सांगायला विसरलो..! पुन्हा फोन करून सांगू की काय?! :) राम राम मिपाकरहो, आत्ताच आम्हाला आमच्या भ्रमणध्वनीवर, अमेरीकेत होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या संदीप देवकुळेंचा दूरध्वनि आला होता.

शेराला सव्वाशेर

लेखक ब्रिटिश यांनी गुरुवार, 05/02/2009 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आर शित्याला पोलीसांनी धरलाय. जाम मारतान बग. बारक्या बातमी झेउन आला. शित्या. सिताराम म्हात्रे. यकदम झोलर मानुस. आखोंशे सुरमा नीकालनेवाला. तो न्हेमी म्हानायचा ' ऊधारी ने वलखी वाडतात'. गणा पाटलाची दोन येकर जमीन त्यान सात जनांना ईकलीवती. दुनीयेची ऊधारी आंगावर. यकदा माजे घरी दोगा जनांना झेउन आला. माज घर तस रोडटच हाय. वटीवर बसवल न घरात आला . आयला म्हनला 'लांबन आल्यात पावनं. गुळपानी दे. पाच मिन्ट बसतील न जातील.' गेला मागल्या दारानं. धा मीन्ट जाली पंदरा मीन्ट, पावनं ऊटाया मागनात. आय म्हनली 'बाबांनो क काम हाय क तुमच ?' तर म्हनल क 'शित्याला पाटवा.

लफडा

लेखक दशानन यांनी गुरुवार, 05/02/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्याला ? हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे, त्यांची किव करावी शी वाटते, अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना.. पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ? नाय यार हे काय चांगले नाही ! आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा :? आता बघ ना, परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता.. मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला तो म्हणाला... ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली ! मी म्हणालो... असं कसं ?

पण तू मात्र - 2

लेखक sanjubaba यांनी गुरुवार, 05/02/2009 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
1) देवाला मी सांगितले आणू नको कुणावरही ही वेळ..... मांडू नको आयुष्याचा तू पुन्हा असा खेळ...... 2) मी करतो साजरा उत्सव माझ्या हृदयातील दु:खाचा..... मी तर जगेल कसबसा प्रश्न आहे तुझ्या जीवनाचा....... 3) आज सारे विसरली तू नावही न येई ओठांवर..... कसे मानू तू कधी खरे प्रेम करशील कुणावर...... 4) तेव्हा सागर किनारी साक्षीने तू घेतल्यास किती शपथा..... किती मारल्यास मिठया तू तो चंद्र ढगात लपता........ 5) जर जायचेच होते आयुष्यातून तर जीवनात का आलिस.... राख भरली स रांगोळीत आणि रंग घेऊन गेलिस....... 6) सगळे काही संपवले मी पण त्याआधी तूच संपवले होते..... मनातले ओठांवर आलेच नाही तू सारे काही लपवले होत
Taxonomy upgrade extras

मिनीची आई

लेखक नीधप यांनी गुरुवार, 05/02/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख मी माझ्या आईच्या, प्रा. माधवी पटवर्धन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त (४ नोव्हेंबर २००८) लिहिला होता. पुणे लोकसत्ता मधे प्रसिद्ध झाला होता पण त्यांनी संपूर्ण न छापता शेवटचा काही भाग जागेअभावी गाळला होता. तस्मात पूर्ण लेख इथे लिहित आहे. ----------------------------------------------- वाड्याच्या ओट्यावर छोटीशी मिनी बसलेली असते. आईला टाटा करत असते. मिनीची आई, गोरीपान, एक वेणी आणि खांद्याला पिशवी. "रडायचं नाही हं. अण्णांना आजीला त्रास द्यायचा नाही. आई क्लासला जाउन दोन तासात येईलच हं." आई सांगते. मिनी हसत हसत टाटा करते. आठवणींचा तळ गाठायचा झाला तर मिनीला आईची पहिली आठवण आहे ती ही.