अमेरीकेत होणार्या साहित्य संमेलनाशी निगडीत मिपावर या आधीच बराच काथ्याकूट झाल्यामुळे खालील मजकूर कदाचित कुणाला मस्करी वाटू शकेल. परंतु तसे नाही. जरी मौजमजा, विरंगुळा सदरात टाकली असली तरी ही सत्यघटना आहे. देवकुळेकाकांचा नंबर आता आमच्या भ्रमणध्वनिवर आहे खरा परंतु घाईगडबडीत त्यांना मिपावर चाललेली चर्चा वाचा आणि जमल्यास खुलासा करा असे सांगायला विसरलो..! पुन्हा फोन करून सांगू की काय?! :)
राम राम मिपाकरहो,
आत्ताच आम्हाला आमच्या भ्रमणध्वनीवर, अमेरीकेत होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या संदीप देवकुळेंचा दूरध्वनि आला होता.