Skip to main content

तो व मी - लफडा अनलिमिटेड.

लेखक दशानन यांनी मंगळवार, 17/02/2009 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे. मी- कारे असं का वाटलं तुला ? तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे. मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ? तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला. मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते. तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन. मी- काय झालं व्यवस्थीत सांग. तो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच. मी- मग, तु काय केलं. तो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत..

अनंताची पाऊलवाट...

लेखक मृण्मयी यांनी मंगळवार, 17/02/2009 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय.. , नेहमीप्रमाणे आजही, लग्नाच्या चाळीस वर्षांनंतरही मायन्याशी अडखळतेय मी. अशी कित्येक पत्र पाठवलीत. दरवेळी तुमच्याकडून तत्परतेनी उत्तर आलं. यावेळी ती अपेक्षा नाही. आज सकाळपासून आपल्या एकत्र आयुष्याचा सारिपाट डोळ्यांपुढे उलगडलाय. चुकलेल्या चाली, सावरून घेतलेले डाव सारं काही. नवं नवरीपण जाऊन, पुरती गृहिणी होऊन फुललेल्या संसारात तुमच्याबरोबर कधी रमले ते कळलं नाही. माझ्या भित्र्या, संकोची स्वभावाला तुमच्या निर्भिड, रोकठोकपणाचं balance out , हो हा देखील तुम्हीच शिकवलेला शब्द, करणारं व्यक्तिमत्व सावरून घेत गेलं.

जीवन डोर तुम्ही संग बांधी..! (अवांतर - रौशनी, पुढची पिढी!)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 16/02/2009 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसंदर्भ -१) रौशनी..१ रौशनी..२ रौशनी..३ रौशनी..४ रौशनी..५ (अपूर्ण..) २) ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!) खूप वर्ष झाली फोरास रोड सोडल्याला!

बुद्धकथा आणि एक प्रयोग.

लेखक कलंत्री यांनी सोमवार, 16/02/2009 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी अणि माझ्या एका मित्राचे २/३ दिवस कोठेतरी दुर जावे आणि मनोसोक्त आपल्या आवडत्या विषयावर गप्पा माराव्या असे ठरले होते. त्या बेतास अनुसरुन आम्ही नागपुरला आमच्या दुसर्‍या एका मित्राकडे जाण्याचा विचार निश्चित केला. माझ्या मित्राबद्दल सांगणे राहिलेच, माझ्या या मित्राचा भारतातील अथवा जगातील सर्वच प्रख्यात अशा धर्माचा गाढा अभ्यास आहे.

पुस्तक पाहीजे

लेखक chipatakhdumdum यांनी सोमवार, 16/02/2009 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
मला ' प्राचीन पुरूषोत्तम ' हे पुस्तक त्याच्या सर्व भागासहीत कुठे मिळेल. मी सुमारे ४० वर्षापूर्वी ते सर्व भाग वाचले होते.

एक संवाद !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 16/02/2009 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
सर, नमस्कार ! ओळखलं का ? असे म्हटल्याबरोबर..मनातल्या मनात कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. पण याचे कपडे काही कर्दमलेले वगैरे नव्हते. अगदी टापटीप होता.त्यामुळे मी जरा स्वत:शीच ओशाळलो. आम्ही नेहमीप्रमाणे एसटी स्टँडवर एस्टीची वाट पाहात होतो. गजबजलेल्या स्टँडवर लोकांची ये-जा चाललेली होती. आणि माझ्या समोर एक तरुण त्याच्या पत्नी सोबत उभा होता. मी त्याच्या चेह-याकडे पाहिले, ओळखीचे कोणतेच चिन्ह त्याच्यात दिसत नव्हते. पण नेहमीचे गुळगुळीत वाक्य फेकुन दिले. पूर्वी भेट झाल्यासारखी वाटते ! पण नेमके सांगता येईना आपण कुठे भेटलो ते! सर, तुमच्या लक्षात कसे राहील?

तिची रुणूझुणू चाल---

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 16/02/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा मोकळा वावर तिचा मोकळा वावर माझ्या अवती भवती माझ्या रोमरोमातून तिचे रोज येणे जाणे माझ्या ह्रद्यी रहाणे कशी जाइल ती दूर तिचा मोकळा वावर तिची रुणूझुणू चाल पायी कळ्या होती फुलं गंध फुलत्या फुलांचा दाटे तिच्या सभोवार तिचा मोकळा वावर तिच्या जीवघेण्या अदा सारे जग होइ फीदा परि माझीच ती सदा माझ्या डोळ्याची झालर तिचा मोकळा वावर तिचे बोलणारे डोळे जणू चांदणे कोवळे त्या डोळ्यांमध्ये खेळे माझ्या प्रेमाची पाखंर तिचा मोकळा वावर तिचे माझे एक होणे नभ धरती मिळणे माझ्या मनातिल गाणे येइ तिच्या ओठावर तिचा मोकळा वावर अशी तीची माझी साथ किती युगांच हे नात माझे ह्रद्य छेडते तिच्या ह्रद्यी सतार तिचा मोकळा वाव
Taxonomy upgrade extras

ही कविता हवी आहे. मिळेल का?

लेखक सालोमालो यांनी सोमवार, 16/02/2009 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मला ह्या चार ओळी मिळाल्या आहेत. पूर्ण कविता कोणाकडे आहे का? कवितेच्या ठेवणीवरून 'ग्रेस' यांची असावी असं वाटतयं. जरा दूर जाती चरायास गाई, पुढे रान नाही हवे तेवढे तुझ्या स्वप्नबांधावरी सांग आई, कुणी फोडले जोगिणींचे चुडे? सालो

गुडिशेव

लेखक मि माझी यांनी सोमवार, 16/02/2009 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , कोणि मला सांगु शकेल का कि 'गुडिशेव ' कशापासुन बनवतात? साखर कि गुळ??

कोलंबीचे हुमण

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 16/02/2009 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः सोललेली कोलंबी : १ वाटी खवलेला नारळ : १ वाटी काश्मीरी मिरच्या : १०-१२ नग हळद : १/२ चमचा चिंच : लिंबाएवढी तिरफळं :१०-१२ मीठ : चवीनुसार खोबरेल तेल : ३ टेबलस्पून कृती: कोलंबीला हळद आणि मीठ लावून ठेवावे. काश्मीरी मिरच्या मिक्सर मधून फिरवून एकदम वस्त्रगाळ करून घ्याव्यात. खवलेला नारळ, काश्मीरी तिखट, आणि चिंच गंधासारखे मुलायम वाटून घ्यावे. शेवटी तिरफळे घालून मिक्सर १-२ वेळा फिरवावा. पातेल्यात नारळ, तिखट आणि चिंचेचे वाटण घालून गरजेनुसार पाणी घालावे.