Skip to main content

माहिती

लेखक PRAPTI P यांनी बुधवार, 18/02/2009 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
मला चिकन सेजवान राईस, चिकन मंच्याव सुप, फ्राईड राईस, लॉलीपॉप या सर्वांची रेसिपी पाहिजे आहे. प्राप्ति

खान्देशी शेंगदाणे चटणी.. (ओली)

लेखक बाप्पा यांनी बुधवार, 18/02/2009 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्यः १ वाटि शेंगदाणे ३-४ हिरव्या मिरच्या ३-४ पाकळ्या लसुण कोथिंबीर मीठ क्रुती: शेंगदाणे खरपुस भाजुन घ्यावेत (जाळु नये) त्यानंतर त्यांची साले हाताने चोळुन कढुन पाखडुन घ्या. त्यानंतर हिरव्या मिरच्या भाजुन त्यात भाजलेले शेंगदाणे ३-४ पाकळ्या लसुण थोडी कोथिंबीर, मीठ आणि थोडे पाणी घालुन मिक्सर मधुन फिरवुन घ्या. पाट्यावर वाटल्यास अति उत्तम. चटणी तयार हि चटणी खान्देशात उडीद आणी ज्वारी च्या भाकरी सोबत खातात.

तालिबानीस्तान !

लेखक भोचक यांनी बुधवार, 18/02/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची राजधानी दिल्लापासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र असे होतेय. राजधानी इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या 'स्वात' प्रांतात आता पाकिस्तानी कायदे चालणार नाहीत. पाकिस्तानी सरकार आणि या भागात वर्चस्व असलेल्या तालिबान्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागात न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी 'शरीया' कायदे लागू होतील.

धाबडधिंगा थांबणार?

लेखक किरण जोशी यांनी बुधवार, 18/02/2009 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
आयपीएलच्या सामन्यांसाठी खेळाडूंची बोली झाली. आता सामन्यांच्या तयारीलाही सुरूवात झाली आहे. पण, गेल्यावर्षी खेळापेक्षा अधिक चर्चेत आलेल्या चिअर्सगल्सबाबातही तेवढीच उत्सुकता वाढली आहे. गेल्यावर्षी या 'गर्ल्स' नी जो धिंगाणा घालता होता तो 'पाहण्या' जोगाच होता. म्हणूनच चिअर्सगल्सवर बंदी घालण्याची मागणी जोर धरली होती. खेळामध्ये चिअर्सगर्ल्ससाखरे प्रकार असोत की नसोत हा वेगळा विषय.. पण, अशा सामन्यांमध्ये आपल्या प्रांताची-देशाची संस्कृतीही दाखवू शकतो हे नुकतेच श्रीलंकेने दाखवून दिले आहे. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या 20-20 सामन्यामध्ये भारताने बाजी मारली.

विक्रम - वेताळ आणि इंडिया - पाकिस्तान

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 18/02/2009 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
वेताळ: राजा, तुझ्या निर्लज्जपणाची देखिल कमाल आहे हा, कितीदा हाकलला तरी कोडग्यासारखा पुन्हा - पुन्हा येतोसच काम मागायला. विक्रम: भो वेताळा, रात्री वाईट आल्या आहेत बाबा, मोठ्या मोठ्यांची तंतरलीय. मी तर सामान्य निशाचर, पाठीवर पोट बाबा माझ्यासारख्याचं. म्हणजे तु पाठीवर आहेस तोवर तुझे प्रश्न आहेत. तुझे प्रश्न आहेत तोवर त्यावर पुस्तके लिहीली जातील...रॉयल्टी मिळते रे मला ! वेताळ: हा..हा..हा...! फ़ार जोरात नाही ना रे हसलो. कालच माझी सासु जिवंत झाली म्हणुन म्हटलं. नाहीतर वेताळीण बाई म्हणणार," बघा माझी गरीब, बिचारी (?) आई जिवंत झाली आणि हे हसताहेत. जेवायला मिळणार नाही बाबा आठवडाभर.

दुबई कट्टा.

लेखक सायली पानसे यांनी बुधवार, 18/02/2009 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी दुबई कट्ट्या ची माहिती... शेवटी हो नाहि करता करता आमचा मुहुर्त लागला आहे कट्टा करायचा. येत्या शुक्रवारी २० तारखेला आम्हि जमायचे ठरवले आहे. बिपिन दा, मी , वल्लरी , गौरी, अभिषेक आहोतच.... कुंदन भाउ अ़जुन विचारात आहेत... बघु अजुन कोण कोण येतय ते... नंतर सविस्तर कट्टा रीपोर्ट देण्याचि जवाबदारी बिपिन दा ची आहे.... अजुन कोण असेल ह्या भागातले तर जरुर संपर्क करा आणि सहभागी व्हा. मला किंवा वल्लरीला खरड टाका.

असाही एक व्हॅलेंटाइन ...

लेखक विंजिनेर यांनी बुधवार, 18/02/2009 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
"येत्या शनीवारी मोकळा आहेस ना?" श्री. पार्क श्रीकांतला विचारत होते. "हो, आहे की. का बुवा काही जास्तीचे काम आहे ऑफिसमधे?" श्रीकांतची शंका. "अरे, आपल्या पूर्ण गटाला अर्धा दिवस प्योंगतेकला जायचे आहे विसरलास की काय?" पूर्व आशियातल्या इलेट्रॉनिक्स आणि भ्रमणध्वनि बनविणार्‍या प्रसिद्ध संस्थेच्या एका संशोधन-आणि-नवनिर्मिती विभागात चाललेला हा संवाद. ह्या विभागाने आमच्या संस्थेची आज्ञाप्रणाली वापरायला नुकतीच सुरवात केली आहे. त्यामुळे आज्ञाप्रणाली वापरताना तिथल्या अभियंत्यांना आलेल्या अडचणी सोडवणे, प्रणालीतल्या त्रुटींचे निवारण आदी कामानिमित्त माझे इथे गेले काही महीने दररोज जाणे येणे होते.

चिंचेची कढी

लेखक जागु यांनी बुधवार, 18/02/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बुंदिच्या लाडवा एवढी चिंच कांदा, लसुण, मिरची, कोथिंबिर बारिक चिरुन फोडणिसाठी हिंग, हळद, जिर चविपुरते मिठ आणि गुळ कृती : चिंचेमध्ये १ ते १/२ किंवा गरजे एवढे पाणी टाकुन खुळुन घ्यावी. तेल गरम करुन त्यात हिंग, हळद आणि जिर्‍याची फोडणी द्यावी. आता फोडणिवर चिंचेचे पाणी टाकावे व वरुन चिरलेले कांदा, लसुण, मिरची, कोथिंबीर टाकावी नंतर चविपुरते मिठ व गुळ घलावे. फक्त वाफ येइपर्यंत गरम करावे. उकळी यायच्या आधी गॅस बंद करावा. झाली तुमची चिंचेची कढी तयार. सुचना : ह्या कढित जर आंबटपणा कमी आला असेल तर थोडे लिंब पिळावे. ही कढी नॉनव्हेज बरोबर पण छान लागते.

पहा विचार करुन

लेखक केळ्या यांनी बुधवार, 18/02/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे,"Computer is a Female Entity"आपण 'तो' Computer असे म्हणतो,त्यापेक्षा 'ती' Co mputer असे म्हटले पाहिजे. कधी कसा (कशी) वागेल ते सांगता येणार नाही! बघा पटते का.

मिसळपाववरील पहिले वर्ष

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 18/02/2009 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक वर्षापूर्वी मी मिसळपावच्या हॉटेलात पहिले पाऊल ठेवले. ते कोण चालवत असे याची त्या वेळी मला कांही कल्पना नव्हती. पण आंत आल्या आल्या तात्यासाहेबांनी जुनी ओळख दाखवून मोठ्या अगत्याने "या, बसा." म्हणत माझ्याकडे खुर्ची सरकवली. आजूबाजूला बसलेल्या लोकांत कांही ओळखीचे चेहेरे आणि मुखवटे पाहून मला आपल्या माणसांत आल्यासारखे वाटले. काउंटरवर जाऊन मी थाळी भरून घेतली. जेवण तर मस्तच होते. तेंव्हापासून इकडे येत राहिलो. मधील काळात कधी मला तर कधी माझ्या संगणकाला विषाणूंची बाधा झाली, कधी मी परगांवी गेलो वगैरे कारणांमुळे अवकाशाशी जडलेले नाते राखता आले नाही.