Skip to main content

चिंचेची कढी

लेखक जागु यांनी बुधवार, 18/02/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बुंदिच्या लाडवा एवढी चिंच कांदा, लसुण, मिरची, कोथिंबिर बारिक चिरुन फोडणिसाठी हिंग, हळद, जिर चविपुरते मिठ आणि गुळ कृती : चिंचेमध्ये १ ते १/२ किंवा गरजे एवढे पाणी टाकुन खुळुन घ्यावी. तेल गरम करुन त्यात हिंग, हळद आणि जिर्‍याची फोडणी द्यावी. आता फोडणिवर चिंचेचे पाणी टाकावे व वरुन चिरलेले कांदा, लसुण, मिरची, कोथिंबीर टाकावी नंतर चविपुरते मिठ व गुळ घलावे. फक्त वाफ येइपर्यंत गरम करावे. उकळी यायच्या आधी गॅस बंद करावा. झाली तुमची चिंचेची कढी तयार. सुचना : ह्या कढित जर आंबटपणा कमी आला असेल तर थोडे लिंब पिळावे. ही कढी नॉनव्हेज बरोबर पण छान लागते.

वाचने 5268
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

नविन प्रकार वाटला करुन बघेन. :)

१ ते १/२ काय? कप का? आणि कांदा, लसूण, मिरची फोडणीत नाही का टाकायची? करुन बघितली पाहिजे :-) --------------------------------- जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा

In reply to by अभिष्टा

१ ते १/२ काय? चिंचेच पाणी आणि लसुण, कांदा, मिरची फोडणीत नाही टाकायची त्याचि कच्चीच चव ह्या कढीत चांगली लागते आणि वासही छान येतो.

बरं बरं :-) --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

बोलाची कढी (आणि बोलाचा भात) माहीत होते, चिंचेची कढी हे प्रकरण जरा वेगळे वाटते आहे. - नाटक्या

ती चिंचेच्या भाताबरोबर घ्यायची. यु नो ! टॅमरिंड करी विथ टॅमरिंड राईस. होक्कीनै गं जागू ;) --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

हा खूपच लवकर होणारा, सोपा प्रकार वाटत आहे... ;).आणि चमचमित सुद्धा. आजच करतो!! --------------- केदार जोशी

आम्ही बिगरफोटूच्या पाकृ वाचत नाही... तात्या.

आम्ही पण हि कढी बनवतो.. थोड्या वेगळ्या प्रकारे. मी गुळाएवजी साखर घालते छोटा चमचा.. फोडणीला काळिमिरी ठेचून घालतो.

In reply to by लवंगी

जागु, मस्त आहे गं.. ही चिन्चेची कढी! :) तुझ्याकडुन अजुन पा. कृ. साठी उत्सुक, - मृगनयनी. :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||