Skip to main content

राधा ही बावरी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 19/02/2009 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
तु पांघरशी नभ निळे मज मोहवे वदन सावळे खुळावले नयन जुळे सख्या न माझे मला आकळे लट भाळी केश कुरळे पाहुनी ते मम चित्तही चळे तुज पाहता अहं गळे पान्हावली मुरली खुण कळे यमुनातीरी आनंदमेळे वृंदावन झाले आज बावळे शाम सावळा रास खेळे कामधेनु सोडी मुक्त आचळे जाती घटिका आणि पळे कालपाश अन कंठी आवळे नाम तुझे मनी सावळे हवा कशाला तो स्वर्ग ना कळे विशाल कुलकर्णी
Taxonomy upgrade extras

(इंग्रज महाराष्ट्रीयन्स!!!)

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 19/02/2009 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल भारतात राहुन, जळाऊगिरी करीत आणि परदेशात रहाणाऱ्या लोकांना तसेच, तिथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे. त्यातल्या त्यात, आंतरजालाची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या अनिवासी लोकांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते. ह्या भारतिय नागरिक असलेल्या, पण व्यवहारात इंग्रजी/ हिन्दी बोलणाऱ्या महाराष्टीयन्स च्या ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची अस्सल मराठी माणसाला खरंच गरज आहे कां? इथल्या ज्या अनिवासी लोकांची ते खिल्ली उडवतात, त्याच लोकांना निमंत्रित वक्ते म्हणून लेक्चरं द्यायला बोलवतात.

पराठा किंवा तिखट पुरणपोळी.. ;)

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 19/02/2009 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो.. असं म्हणतात की, तहान लागली की, विहिर खोदण्यापेक्षा आधीच पाण्याची सोय करून ठेवावी. छे! पण माझं इतकं कुठलं डोकं चालायला! आधी उल्हास त्यात फाल्गुन मास.. म्हणजे आधीच बर्न फूड स्पेश्शालिस्ट त्यात लेकाचा डबा.. काय करणार? करा इनोवेशन्स. मी आणि माझी एक मैत्रीण .. दोघी नेहमीप्रमाणे आपापले रडगाणे गात होतो.. की, मुलांना डब्यात काय काय द्यायचं. माझ्या परीने मी माझा प्रश्न सोडवला होता. म्हणजे ५ दिवसांपैकी, २ दिवस तूप सारख पोळी चा रोल, २ दिवस पालक, मेथी, अशा भाज्या घातलेल्या पुर्‍या आणि एक दिवस ब्रेडचं सँडवीच. पण हा जळ्ळा इथला ब्रेड टोस्ट केल्याशिवाय खावासा वाटतच नाही.

मिपाकरांसाठी काही उपयुक्त पुस्तकं

लेखक आम्हि यांनी गुरुवार, 19/02/2009 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यातील बरेच जण वेगवेगळी पुस्तके वाचत असाल. अनेक पुस्तंकं वाचली असता एखादे छान वाटते. आपल्या वाचनात आलेली आम्हा सर्व मीपाकरांना उपयुक्त अशी पुस्तके ह्या धाग्यात नमूद करावी व सर्वांना उत्तमोत्तम वाचनाचा आस्वाद द्यावा. खालील काही पुस्तकं सर्वांनी जरूर वाचावी. क्रुपया काहीतरी उपयुक्त संदेश देतील अशी पुस्तकेच लिहावीत ही नम्र विनंती. मी वाचलेली काही उत्तम व उपयुक्त पुस्तकं खालील प्रमाणे: १.

मी कुणाची तक्रार करू?

लेखक विकास यांनी बुधवार, 18/02/2009 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
"मराठी अमेरिकन्स" हा लेख/चर्चा वाचत असताना एक लिहायचा ठरवलेला पण बाकी व्यस्तपणामुळे लिहायचा राहीलेला चर्चा प्रस्ताव परत डोक्यात आला. दोन एक आठवड्यांपुर्वी मी ५-६ दिवसांसाठी भारतात गेलो होतो. या वेळेस काँटीनेंटल एअरलाईनचे नॉनस्टॉप न्यू अर्क (नेवार्क) न्यू जर्सी ते मुंबई असे विमान पकडायचे होते. बॉस्टन ते न्यू अर्क हे पण काँटीनेंटलने प्रवास केला त्यात काही विशेष आढळले नाही. म्हणजे "कस्टमर सर्व्हीस" वगैरे नेहमीप्रमाणे होती. वेगळे काहीच नव्हते.

आवरा रे ह्या नातेवाइकांना

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 18/02/2009 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
"आता जबाबदारी मी घेतली आहे , तुम्ही निवांत रहा. मी सगळे बघुन घेतो." काकुंना मी सांगितले. हॉस्पिटल ऍड्मिनिनस्ट्रेशन मधे असताना पेशंटचे नातेवाईक कसे पिडतात ह्याचा मला पुर्ण अनुभव होता. त्यातल्या त्यात एखादा मेडिकल रेप. निघाला तर मग काही विचारुच नका. असो. काकुंच्या यजमानांचे जबड्याचे ऑपरेशन होते. 'गुटका कींग' होते काका. त्यामुळे ताबडतोब सर्जरी अनिवार्य झाली होती. दोन्ही मुले व सुना अमेरिकेत. आय्.टी त असल्यामुळे लगेच रजा घेणे शक्य नव्हते. आणि घेण्याची हिंमत नव्हती. कायमची रजा मिळायची शक्यता नाकारता येत नव्हती. मुलाचा मला फोन आला.

पुडाच्या वड्या

लेखक मृण्मयी यांनी बुधवार, 18/02/2009 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
पुडाच्या वड्या: (साधारण ३ लोट होतील) सारण: ४ वाट्या धूऊन, कोरडी करून बारिक चिरलेली कोथिंबीर १ tbsp ( प्रत्येकी ) भाजून कुटलेली खसखस, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे ( ऐच्छिक ) १ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ १ लहान चमचा बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (आई ह्यात थोडंसं आल लसुण पेस्ट आणि लवंग दालचीनी पूड देखिल घालते). १ tsp तीखट पारी: दीड वाटी बेसन (डाळीचं पीठ) अर्धी वाटी कणिक किंवा मैदा १ tsp मीठ १ tsp तीखट चिमुटभर हळद चिंचेचा घट्ट कोळ त्यात जरासा गूळ आणि १ लहान चमचा तेल वेगळे ठेवा तळायला तेल.

मनाच्या कुपीतले -आयुष्यावर बोलु काही

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 18/02/2009 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा आठवा लेख
आयुष्यावर बोलु काही
लेख वाचण्यापुर्वी - हा लेख स्कॅन स्वरुपात आहे खरेतर हा लेख मी पुर्वीच लिहिलेला आहे तेव्हा तो परत टाइप करणे वेळेअभावी शक्य नव्हते म्हणून स्कॅन कॉपी देत आहे.

मराठी अमेरिकन्स ..

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 18/02/2009 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल भारताबाहेर राहुन , इतर देशाचे नागरिकत्व घेउन त्यांची भाट गिरी करित आणि भारतात रहाणाऱ्या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे. त्यातल्या त्यात, अमेरिकेची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या भारतियांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते. ह्या भारतिय नागरिक नसलेल्या , पण मराठी बोलणाऱ्या अमेरिकन्स च्या ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची भारताला गरज आहे कां? इथल्या ज्या राजनैतिक नेत्यांची जे खिल्ली उडवतात, त्याच नेत्यांना हार्वर्ड ला लेक्चर द्यायला बोलवतात.

उर्जेचा वापर...

लेखक बाप्पा यांनी बुधवार, 18/02/2009 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
उर्जेचा वापर... सकाळी उदर भर न्याहारी केली, कार्यालयासाठी निघायला दुचाकीवर तंगडं झटकलं आणी प्रस्थान केले. वाटेत बचकभर वाहतुकदिवे आहेत तेथे थांबत थांबत एकदाचा कसाबसा कार्यालयाच्या इमारतीत पोहोचलो. कार्यालयाच्या वाहनतळामध्ये कसे बसे आमचे वाहन उभे केले आणि कामाच्या ठिकाणि जाण्याकरीता कुच केले. तेवढ्यात आमच्या इमारती मधील त्या भागातील उदवाहन (म्हणजे लिफ्ट हो!!) काम करीत नसल्याचे आमच्या लक्षात आले. कंपनीच्या प्रशासनाला शिव्या घालत आम्ही जिन्याने जाणेच योग्य समजले. धापा टाकत जागेवर बसलो तेव्हा आमचा संगणक चालुच होता. तेव्हा मनात विचार आला कि हा संगणक काल पासुन विनाकारण चालु आहे.