Skip to main content

बुंदी रायते

लेखक जागु यांनी मंगळवार, 24/02/2009 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ वाटि दहि १ वाटि खारि बुंदि १ छोटा कांदा चिरुन २ चमचे चिरलेली कोथिंबिर १ चमचा चिरलेले आले २ चमचे साखर पाव चमचा काळे मिठ चवि नुसार साधे मिठ पाव चमचा लाल तिखट कृती : प्रथम दह्यात थोडे पाणि टाकुन जरा घट्ट्च घुसळुन घ्यावे. मग त्यात काळे मिठ, साधे मिठ, साखर, लाल तिखट टाकुन हलवावे. नंतर राहिलेले सर्व जिन्नस टाकावे. जर बुंदि कडक आवडत असेल तर ति आयत्या वेळेवर टाकायचि. खुपच छान लागते. सजावटी साठी वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर पेरावी.

माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेले

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 24/02/2009 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
गडबड वेड्या वस्तीमध्ये शाळा पाखरांची पोपट मैना आणि कबुतर लगबग चिमण्यांची डेरदार त्या वृक्षावरती घर आणिक शाळा सकाळ सायंकाळी भरतो प्क्ष्यांचा मेळा कावळा मास्तर शाळेमध्ये पोर चिमणा-चिमणी कावळा शिकवी धडे-कविता मुले गाती गाणी किलबिल किलबिल किती तयांची आसमंत दाट्तो मैना गाइ सुरेल गाणे पोपट तो नाचतो अवतीभवती मनुष्यप्राणी लोभी हलकट मारामारी आणि भांडणे नुसता हवरट स्वार्थापायी या अधमाने कुर्हाड हो आणलि घर आणिक शाळा त्यांची झरझर हो तोडली घिरट्या घालीत होते पक्षी घर हरवले कोठे आर्त स्वराने त्या पक्ष्यांच्या आसमंत दाटे किलबिल किलबिल हरवून गेली सुने सुने झाले माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेले
Taxonomy upgrade extras

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदतगट

लेखक केदार यांनी मंगळवार, 24/02/2009 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
'भारतात हे नेहमी असेच असते'! 'भ्रष्टाचार खूपच झालाय!' 'काहीनाही रे, ह्यांना पैसे हवे वर प्रसिध्दीही!'. 'राजकारणी काSSSही करत नाहीत, ही सिस्टीमच बदलायला पाहीजे!' 'गोळ्या घाला साल्यांना!' 'शिका, शिका म्हणावं काही तरी प्रगत देशांकडून ...'अशी वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकली आहेत. बरेचदा ते बोलणारेही आपणच असतो, जोशात चार वाक्य फेकली की किती बरं वाटतं. भारत बदललेला सर्वांनाच हवाय, पण कृती करायची म्हटली की होतेच असे नाही. 'करणारे करोत रे, समाजात चार पाच अभय बंग, अवचट,पोद्दार, आमटे, सकपाळ निर्माण होतील आणि जातील आपल्याला काय त्याचे?', अशी आपल्या समाजाची मनोभूमिका झालेय.

एका उर्दू वर्तमानपत्राचे शीर्षक

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 24/02/2009 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
इन्किलाब नामक भारतीय उर्दु वृत्तपत्राची हेडलाईन काय आहे माहित आहे? "हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम. ए आर रहमान और रसूल पोकुटी को ऑस्कर अवॉर्ड." म्हणजे अवॉर्ड मुसलमानांना मिळाले. जेव्हा बिन्द्राला सुवर्णपदक मिळाले तेव्हा कुणी अशी बातमी दिली का की हिंदूंचा पराक्रम वगैरे?

उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला.

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 24/02/2009 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
ही आमची पाककॄती आम्हाला कालच्या उपवासाच्या दिवशी अनेकविध पदार्थांची नावे सांगुन आमचा जीव टांगणीवर लावणार्‍यांना , मिपावर त्याचे फोटो टांगुन आमची गोची करणार्‍यांना , फराळ करतान आमची आठवण काढणार्‍यांना आणि न काढणारे अशा सर्वांना अर्पण ...!!! तर मेहरबान, कदरदान, खानदान आणि ए.आर. रेहमान ( ऑस्कर मिळलयं म्हटलं त्याला, आहात कुठे ?

स्ट्रॉबेरीचे गोड टार्ट

लेखक चित्रा यांनी मंगळवार, 24/02/2009 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
मार्था स्टुअर्ट या बाईंचे एक पुस्तक माझ्याकडे पडले आहे. परवा छोट्या मुलांसाठी म्हणून काही करण्याचा घाट घातला आणि या पुस्तकाची आठवण झाली. खरेतर मुले कशाला, हे असे छोटे टार्ट मलाही खूपच आवडतात. आणि बाहेरून आणायचे म्हणजे प्रत्येक टिचभर टार्टला दोन-अडीच नाणी मोजा. म्हणून एकतर मी काचेच्या आडून डोकावीत असणार्‍या अशा गोड गोष्टींना टाळून पुढे जाते, किंवा अगदीच मोह टळला नाही, तर स्वतः काहीतरी करण्याचा घाट घालते. मी आधीही स्वयंपाकघरात असे बेकिंगचे प्रयोग केले आहेत, आणि अनेकदा माझ्या सुदैवाने ते यशस्वी झाले आहेत.

भावडो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 24/02/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
"काय झालां तेतेबाय?" "अगो! काय सांगतलंय कमळ्या? हेनी माकां खूपच वैताग आणलोसा.रोजचो उच्छाद.

सूर्यास्त

लेखक जयवी यांनी सोमवार, 23/02/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
का लागली दृष्ट तेजोनिधीला अवेळी कसा आज सूर्यास्त झाला अर्ध्यातूनी सोडूनी डाव ऐसा शरण भास्करा तू कसा या निशेला बांधूनी पैंजणे सावळ्या सावल्यांची कशी सांज निमिषात उतरुन आली अंधार डोही धरा दीनवाणी कशी भासते आज केविलवाणी कंटाळवाणी प्रतिक्षा रवीची आस वेड्या जीवाला नव्याने उषेची जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras