Skip to main content

काही नोंदी, अशातशाच...

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 14/03/2009 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
शहाद्याहून धडगावच्या दिशेने एस.टी. निघाली. अंतर साधारण पासष्ठ किलोमीटरचे. त्यापैकी सुमारे चाळीस किलोमीटरचा रस्ता घाटाचाच. सातपुड्याचं पहिलं पूड चढून गेल्यानंतर काही काळात मोबाईलची रेंज जाते. त्यामुळं अगदी न कळतच माझी नजर मोबाईलच्या स्क्रीनवर गेली. बॅटरी पूर्ण होती. म्हणजे मोबाईल चालू-बंद असा करीत वापरला तर तीन दिवस त्याची साथ-सोबत होण्यास हरकत नव्हती. निश्चिंत होऊन मी बाहेर नजर वळवली. बसनं घाटाचा मध्य गाठला तेव्हा पुन्हा एकदा माझं लक्ष मोबाईलवर गेलं आणि चमकलो. मोबाईलची रेंज आली होती. अर्थातच, माझ्या सेवादात्याची नव्हे तर दुसऱ्याच सेवादात्याची. दोघंही खासगी क्षेत्रातीलच.

जोगवा

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 13/03/2009 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
नक्षत्रांच्या गावातून कुणी सांगावा धाडला? जीव पाखरू होऊन माझा आभाळा भिडला वैशाखातल्या दुपारी कुणी गारवा पेरला? मनी फुलोरा फुलला, रानी मयूर भारला आला मैफलीला रंग, ताल सुराला भेटला अन्तरात आनंदाचा असा उमाळा दाटला मोतिपोवळे माळून दारी प्राजक्त डोलला हळूवार गूज काही वारा कानात बोलला झाकोळल्या दृष्टीला या दिसे प्रकाश आतला माझ्या फाटक्या झोळीत असा जोगवा घातला
Taxonomy upgrade extras

माझी नावडती मैत्रिण

लेखक किट्टु यांनी शुक्रवार, 13/03/2009 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज पण मला आठवतं, तिची आणि माझी पहिली भेट... तिला पाहुन मी इतकी जोरात ओरडली होती, कि माझ्या दोन्ही रुम-पार्टनरस(रु-पा) पळत आल्या होत्या. तो दिवस तिचा आमच्या रुम मधला पहिला दिवस होता. आणि तेव्हा पासुन ती आमच्या रुम मधे तळ ठोकुन बसली. जा जा म्हंट्ल तरी बयेच जायच नाव नाही, सर्व करुन झालं होतं अगदी धक्का मारुन, हाकलुन.. पण ती नुसती निर्लज्ज.. हळुहळु तिला माहीत झालं होत की मला ती अजिबात आवडत नाही, मग काय मी जेव्हा एकटी रुम वर असणार तेव्हा त्या बाईसाहेब अगदी थांबल्याच पाहिजे.. ~X( हळुह्ळु मला तिची भिती कमी वाट्त होती पण ती मला कधी रुम मधे आवडलीच नाही.

आभार मिपा व मिपाकरांचे

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 13/03/2009 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव आणी मिपाकरांचे चे आभार कसे व्यक्त करु अस प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता आणी डोक्यात ही कल्पना आली. रुक्ष वाळवंटात जसा सापडावा अमृताचा झरा तशी मराठीची तृष्णा शमे मिसळपावच्या घरा मराठमोळ्या माणसांना फक्त मिपाचाच आधार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! काव्य, चर्चा, साहित्याचा अनमोल असा ठेवा संगे कौल,कलादालन आणी पाककृतींचा मेवा लहानथोरांसाठी हे मराठीचे अक्षय भांडार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! कोणी न वाटे इथे परके जरी आले कधी प्रतिसाद तिरके भावाबहिणीचे गोड भांडण, तसे एखाद्या काव्याचे विडंबन किती आपुलकी, जिव्हाळ्याची इथे बहार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! चुकुन कुठे कंपुबाजीची तक्रार, कधी तंट
Taxonomy upgrade extras

घोरपड

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 13/03/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
अज्ञाताच्या अंधारात प्रतिभेची घोरपड घेऊन सर करतेस प्रसिद्धीचा कोंढाणा गड आला पण घोरपडीचे काय? काही म्हणतात, घोरपड ही तर दंतकथा कोणी म्हणतं , ते तर प्रतीक, चिवट जीवननिष्ठेचे म्हणून सांभाळ गं आपापली असलेली आणि नसलेली घोरपड कारण किल्ले येतील आणि जातील पण तेवत राहील , फुलत राहील मनामनात ... एक घोरपड
Taxonomy upgrade extras

रेसिपि पाहिजे

लेखक वेडू यांनी शुक्रवार, 13/03/2009 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
ओव्हन मध्ये पाव कसा बनवतात त्याची पाककृती पाहिजे

दुष्काळात तेरावा महिना

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 13/03/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच बातमी आली - म्हणे चलनवाढ, महागाई गेल्या अनेक वर्षांतील निचांकावर! सगळे काही स्वस्तच स्वस्त आणि पुढच्या वर्षी ही वाढ १% वर येणार. आधीच मालकवर्ग आम्हाला 'मंदी', घटता नफा, घटती उलाढाल, नोकरकपात वगैरेचा बागुलबुवा दाखवुन घाबरवत आहे आणि आता ही बातमी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. हातात कोलीत मिळालेल्या माकडागत आता मालक लोक सांगणार, अरे लेको दरवाढ खल्लास, स्वस्ताई येत्त्ये; मग तुम्हाला पगारवाढ सोडाच, पगारकपात करायला हवी! महागाई घटली म्हणजे नक्की काय झाले? काय स्वस्त झाले? कटिंग, वडापाव, भाज्या, धान्य सगळे आहे तसे आहे.

वाळवंट

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 13/03/2009 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
"सात वर्ष झाली काका, आयुष्याचे जवळ जवळ वाळवंट झाले आहे". श्रीयुत करमरकर रंगपंचमीची सुट्टी होती. अख्खा दिवस लोळुन काढला. संध्याकाळची वाट बघत होतो. सामुदायिक तिर्थप्राशनाचे आमंत्रण होते संध्याकाळी. बायकोला साधारण सालाबादचे कार्यक्रम माहीत असतात. सुमारे ५ वाजता तीचा फोन वाजला. साधारण बोलणे कानावर आले. मला न विचारता कुणाला तरी संध्याकाळी घरी यायचे आमंत्रण दीले होते. आज्ञा पण झाली, संध्याकाळी ६ ते ७ पर्यंत कुठेही जायचे नाही. चुलत बहीणीच्या ओळखीचे दांपत्य येणार होते मला भेटायला.

सप्तरंगी दुनिया

लेखक माकड्तोन्ड्या यांनी शुक्रवार, 13/03/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तरंगी दुनिया विविध रंग मिळुन जग बनले आहे रंगी बेरंगी दुनियेत खुप रंग आहे. प्राण्यांच्या शरिरात सुध्दा खुप रंग असतात म्हणुनच त्यांची पिल्लं सुध्दा रंगी बेरंगी जन्मतात. प्राणी हिरवं खातात तरी रक्त लाल असते कातडं काळं तांबड दुध मात्र सफेद असते आकाश सकळी सोनेरी दुपारी उन्हाने पांढरे होते संध्याकाळी मावळतांना तांबडे रात्री मात्र निळे निळे असते झाडाची मुळं पांढरिइ साल काळसर असते पानाचा रंग हिरवा फळं फुलं मात्र रंगी बेरंगी माती सुद्धा असते काळी भोर हिरवं उगवतं पेरल्यावर हिरवं पिवळं होतं बाळ्ल्यावर पिठ पांढर निघतं दळल्यावर सोने चांदी तांबे पितळ ह्यांचे रंग निराळे म्हणुनच त्यांचे आहे मोल वेगव