Skip to main content

लज्जतदार मका

लेखक जागु यांनी सोमवार, 16/03/2009 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य : उकडलेल्या मक्याचे दाणे १ वाटी १ मोठा बटाटा उकडुन, कुस्करुन अमुल बटर २ चमचे पाव वाटी किसलेला ओला नारळ चवी पुरते मीठ १ चमचा साखर २ चिमुटभर काळे मिठ २ चिमुट्भर काळीमिरी पावडर अर्ध्या लिंबाचा रस पाव चमचा मिरचीपुड, कृती : मके व बटाटा गरम असतानाच वरील सर्व जिन्नस एकत्र करावे. लहान मुलांना खुपच आवडते. शिवाय पौष्टीक आहेच.

तू

लेखक जयवी यांनी सोमवार, 16/03/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते तसे सोबतीच्या करारात होते नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा तुझ्या मुक्त केसातही रात होते पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला तुझे दाद देणे अकस्मात होते नसावे नशीबात घायाळ होणे तुझे तीर सारे पहार्‍यात होते निशेला न ऐसेच वैराग्य आले तुझे चांदणे ऐन बहरात होते जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

उदास मन

लेखक जागु यांनी सोमवार, 16/03/2009 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
मन आज उदास उदास झाल आहे भावनांही काहीशा रेंगाळत आहेत. हृदयाला ठोकेही नकोसे झाले आहेत शब्दही ओठामगे हळूच दडले आहेत डोळ्यांच्या कडांना मात्र ओलावा हवा आहे चालही काहीशी संथ झाली आहे एकांतवासाकडे वळण घेत आहे प्रकाशही नकोसा वाटत आहे भर दिवसा रातकीडा किरकिरत आहे. कुणास ठाऊक आज असे का झाले आहे ? सुखाचा सगळीकडे पसाराच पसारा आहे पण मन पसार्‍यात दु:खाचा शोध घेत आहे.
Taxonomy upgrade extras

खजुराचे पौष्टीक लाडू

लेखक श्रीया यांनी सोमवार, 16/03/2009 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर खव्वयांनो, मी एक पाककृती लिहीण्याचा पहिलाच आणि लहानसा प्रयत्न करत आहे, तरी त्यात काही कमी जास्त झाल्यास समजावुन घ्याल अशी आशा करते. साहित्यः पाव किलो खजूर, अर्धी वाटी दाण्याचे कुट, ५० ग्रॅम काजु, ५० ग्रॅम बदाम, ५० ग्रॅम पिस्ते, चिमुटभर केशर, पाव वाटी गुलकंद २-३ वेलदोड्यांची पुड स्वाद आणि सुवासाकरिता. कृती: सर्वप्रथम खजुरातील बिया काढून घ्याव्या. कढईमध्ये तूप गरम करुन सोललेले खजूर परतून घ्या. आता हे खजूर वेगळे काढा.

अश्वत्थाम्याच्या डायरीतले एक पान .......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 16/03/2009 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
दोन घडीचा डाव, त्याला जीवन ऐसे नाव..... हं..जगणं मरणं, मरणं जगणं सारंच अनाकलनीय, विलक्षण.... माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर.. जीवन... निरर्थक, वेडेवाकडे, कागदावर रेखाटलेल्या अर्थहिन भौमितिक रेखाकृतींसारखे कागदावरच्या सर्वच रेषांना...नसतो अर्थ जसा....! माझं जीवनही तसंच आहे.... मदिरेच्या प्याल्यातील शिल्लक, शेवटच्या, एकुलत्या एक थेंबासारखे ... तृणपर्णावरुन ओघळलेल्या एकाकी दंवबिंदुसारखे ... कपोलावर अलगद, नकळत, रेंगाळलेल्या कढत कढत कदाचित खारट आसवांसारखे ... का जगायचे, कशासाठी जगायचे ? जगण्यातला अर्थ जाणण्यासाठी?

गाणे हवे आहे , मदत करा

लेखक बाकरवडी यांनी सोमवार, 16/03/2009 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाकडे " ....... ओ नाखवा होडीनं फिरवाल का..." या गाण्याचे एम पी ३ आहे का ? लिंक दिली तरी चालेल गाण्याचे बोल मला नक्की काय आहेत ते माहीत नाही सांभाळून घ्या ..

ए-दिले-नादान

लेखक दशानन यांनी सोमवार, 16/03/2009 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
कोई ये कसे बताएं की ओ तन्हा क्यु हैं वह जो अपना था वही ओर किसी का क्युं है यही दुनिया है तो फिर ऎसी ये दुनिया क्युं है यही होता है तो आखिंर यही होता क्युं है ! असंच कुठल्यातरी वळणावर मी उभा आहे तुझीच वाट पाहत जसं वाळत चाललेले ते आपलंच चिंचेचे झाडं, आठवतं तुला तु मला फोन केला होतास की राज ते झाड पडलं रे, खुप वाळलं होतं, तसाच कधी तरी मी पण पडेन पण ह्यावेळी तुला सांगणारं कोणीच नसणार आहे, मला ह्याचं दुख: नाही आहे की तुला सांगणार कोण, तुला कळणारं कसे पण तरी ही माझं मन उगाच उदास होतं, त्या झाडचं आपलं कोण होतं ज्यांना त्याच्या पडण्याचं दुख: झालं ?

शीघ्र कविच्या तीन कविता

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 16/03/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
एक तांत्रिक कारणामुळे कविता स्वतः कवीने वगळली आहे. दोन आवंढ्यासारखी गिळता येत नाही भळभळणारी कविता मुक्यामुक्यानं जगावं अशी नाही एकही जागा जालावर येतो जरासे सुखाचे क्षण मिळावेत म्हणून, तर इथेही दोस्ताच्या कथेत लहानग्या लेकराला त्याची माय कपाटात कोंडून ठेवते. अन बोटे कुरतडतात त्याची ,उंदीर माझ्या स्वतःच्याच वेगळ्या चिंता असतांना, उगाच चिंता करतो..याची,त्याची.. अन, संस्कृतीच्या नावाने बोंबलतही बसतो.
Taxonomy upgrade extras

"आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 16/03/2009 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं,कुठच्याही नवीन समस्येला जूनं उत्तर असतं.त्या जुन्या आणि होऊन गेलेल्या अक्कलवंत कानगोष्टी आपल्या बरोबरच असतात त्या आपल्याला आश्वासन देतात, "आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो" श्रीधर आणि मी एकाच गावात वाढलो आणि शिकलो.मी शिक्षण पुरं केल्यावर जास्तशिक्षणासाठी परदेशी गेलो.आणि या वयात परत आपल्या गावात येऊन उर्वरीत आयुष्य लेखन करण्यात वापरायचं ठरवलं आहे.पण श्रीधरने माझ्या सारखं काही केलं नाही.