Skip to main content

अर्थ

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 24/03/2009 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
मला साधे मराठी येते. मी लेखक आहे असा गैरसमज कधीच करुन घेतला नाही. माझी मिपाकरांना नम्र विनंती आहे की मला खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. दोन दिवसापासुन डोक्याचा फार आणि पार खुळखुळा झालेला आहे. बर्‍याच जणाना विचारला पण नीटसे काय कळाले नाही. लिखाळ, व मुक्तसुनित ह्यानी अर्थ सांगितला. पण माझ्या डोक्यावरुन गेला. बहुधा तो अर्थ समजण्या इतके पुण्य कर्म मी आदल्या दिवशी केलेले नव्हते. दोष माझा. "आम्ही लेखन शुचीता संभाळतो." ह्या वाक्याचा अर्थ काय? म्हणजे नेमके काय करतात. हे वाक्य एका मराठी संस्थळाच्या संपादकाने उच्चारलेले आहे. वैधानिक इशारा: मला सर्व मराठीसाठी झट्णार्‍या संस्थळाबद्दल आदर आहे.

सकाळ - फार्म हाऊस, गुडगांव

लेखक दशानन यांनी मंगळवार, 24/03/2009 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे जरा लवकरच उठलो व जवळच असलेल्या मित्राच्या मामांच्या फार्म हाऊस वर आलो, व थोडे जॉगिंग होईल व ताजे हवा पाणी मिळेल हा उद्देश, तर तेथे रुम वर कॅमेरा ठेवलेला दिसला व सुर्य देव उगवायच्या तयारीत होते तेव्हा आकाशामध्ये मेघांनी वेग वेगळे डिझाइन्स तयार केले होते त्यांचे खेचलेले फोटो ! कॅमेरामधील ओ कि ठो कळत नाही फक्त बटन दाबले की फोटो निघतो येवढंच माहीत आहे.. जे आहे ते गोड मानून घ्या...

द हॅपनिंग...

लेखक भाग्यश्री यांनी मंगळवार, 24/03/2009 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी जास्वंदीचे फळ ही कथा वाचनात आली.. त्या कथेची एकंदरीत कन्सेप्ट, व तिथले प्रतिसादांवरून कळले की द हॅपनिंग मधे असंच काहीसं आहे.. तेव्हापासून तो पाहायचाच होता.. परवा रात्री पाहीला.. काहीतरी होतं, सगळे नाहीसे होतात.. म्हणजे स्वत:ला मारून घेतात.. असं काहीतरी होतं या पिक्चरमधे आणि तो नाईट श्यामलनचा पिक्चर आहे, याव्यतिरिक्त काहीएक माहीत नसताना लावला.... SPOILER : (ज्यांनी पाहीला नाहीये हा मुव्ही, त्यांनी रहस्यभेद न होण्यासाठी पुढे नाही वाचलं तर खरं म्हणजे बरं पडेल..

(अशक्य केवळ)

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 24/03/2009 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
सहज शक्य असा हा फ्री-हिट आणि त्यातही फुलटॉस भल्या-भल्यांनी सोडला. असा चेंडू भल्या-भल्यांनी सोडणे हे फारसे रुचले नाही. अगदी षट्कार नाही; पण एक-दोन धावांचा फटका तरी मारावा म्हटलं... तुझाच उरला विचार केवळ 'विसर' आता अशक्य केवळ कसे करावे तुजला राजी, बोलतेस तू तशीही फटकळ अशात व्हावी फितूर गात्रे (निभाव आता अशक्य केवळ) 'पिऊन' येता पुन्हा घराशी दिसते मजला का हे उखळ? बारची ही तुंबली उधारी हिशेब उरले तुझेच केवळ

(...उदरात ढकल काही!)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 23/03/2009 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
राघव यांची अतिशय सुंदर कविता ...उदयात शोध काही! वाचल्यावर अतिशय आनंद झाला आणि शोधाशोध करणारे आपण एकटेच नाही ह्या जाणिवेने बरे वाटले!

<बाकी ते फुगणेच खरे>

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 23/03/2009 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: विशाल कुलकर्णी यांची "बाकी ते रुसणेच खरे" कविता. ह. घ्या. तुझे ते खाणे भरमसाठ आठविता गं जीव घाबरे घास मावेना तोंडात चरण्या दिवस ना पुरे तु मावेना कवेत आता बघ आरशात एकदा सखे बांधा तुझा आता बघवेना खाण्याचे भान तुला नुरे वजनाचे भान काही तुला चालता भुकंपाचे हादरे पुन्हा डोकावणे स्वयंपाकघरात बकासुराची बहिण का गं तु गडे मणभर भात ताटात वरणाचे वाहते झरे उपाशासारखे जेवण ओरबाडणे तुझे बाकी ते फुगणेच खरे आपला (विडंबक)मराठमोळा

कृष्णमय--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 23/03/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
गोरी राधा हरी सावळा अव्दैताचा रम्य सोहळा सगुण होउनी सखा श्रीहरी सहज छेडतो मुग्ध बासरी राधा तोचि तोच बासरी मनात तोचि तोच अधरी स्वरातूंन तो तोच सुरांतून हरी खेळतो कणाकणातून गोप्-गोपिका तोच र्निमितो वेड लावुनी रास खेळतो होउन यमुना धुंद वाहतो हरी सावळा हरी रहतो त्रिगुणात्मक तो तोच गुणातीत विश्वात्मक तो तोच कणातीत तोच लिहीतसे माझे हे गीत श्रीहरी चरणी नित्य समर्पित
Taxonomy upgrade extras

वयाप्रमाणे बदलत जाणारी मतं

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 23/03/2009 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
बारा वर्षांपूर्वी कॊलेजमधून बाहेर पडलो होतो त्यावेळी काही विशिष्ट बाबतीत माझी ( आता असं वाटतं की) टोकाची मतं होती. त्याबद्दल मी शक्य तेवढा वाद घालत असे.हल्ली असं लक्षात यायला लागलंय की मी आता तितका हट्टी उरलो नाहीये. जगाला वाटेल ते जगाने करावं, आपण कोण सांगणारे? असं हल्ली वाटतं... १. लग्नसमारंभातली उधळपट्टी : मुलगे आणि मुली आपल्या आई-बापांचे पैसे लग्नाच्या चैनीत हक्काने का उधळतात, हा मला पडलेला प्रश्न असे..वरवर आनंदी दिसलो तरी मी तेव्हा कोणतेही लग्नसमारंभ मनापासून अजिबात एन्जॉय करू शकत नसे.... असल्या उधळपट्टीच्या लग्नात उपस्थित राहणं नको असंही वाटत असे.

माझे महान प्रयोग - १

लेखक दशानन यांनी सोमवार, 23/03/2009 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मागील आठवडा असाच झोपून घालवला, खुप कंटाळा येतो नाही असं बेड वर पडून राहणे, पण ह्या रविवारची सकाळ जरा वेगळीच होती मस्त पैकी अंगात तरतरी जाणवत होती व शक्ती आली आहे असे वाटत होते, त्यामुळे विचार केला चला आज जरा बाहेर पडू, थोडा वेळ बागेत फिरलो, हिरवळीचा आनंद घेतला. रविवार होता त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता, , युवक-युवती मस्त पैकी सकाळाच्या कोवळ्या उन्हात गप्पा मारत होते, दोनचार आजोबा टाईप व्यक्तीमहत्वे त्यांच्या कडे चोरून चोरुन पाहत गप्पा मारत होते...