इंटेंसिव्ह केअर युनिट हे शब्दच फार अवघड आणि बोजड वाटतात नाही ? हे शब्द नुसते उच्चारले तरी सामान्य माणसाची छाती धडधडते,श्वास कोंडल्यासारखा वाटतो,उर धपापतो आणि उदगार निघतात,'अरे,बापरे,सिरियस कां ?'तर अश्या ह्या आय.सी.यू.मध्ये मी तीनवेळा जाऊन १०-१५ दिवस माझ्या धडधड्त्या हर्दयासहीत घालविले आहेत आणि तरीही त्यावर कांही लिहीण्याइतपत मी आज बरी आहे.