पहावं ते नवलंच..
मी एका कंस्ट्रक्शन कंपनीत काम करतो, आणि थोडक्यात सांगायचे तर सध्या माझे कामाचे स्वरूप नवीन प्रोजेक्ट्स मिळवण्याकरता त्यांचे एस्टीमेट आणि प्रपोजल तयार करणे असे आहे. तर, असाच एक संभाव्य प्रोजेक्ट म्हणजे ऍटलांटा एरियात होणाऱ्या एका प्राथमिक शाळेचे रिनोवेशन. इमारतीची सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सोमवारी या शाळेत गेलो होतो. शाळेभोवती चक्कर मारत असताना शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असणारा, आणि बाहेरच्या दिशेने उघडणारा, एक दरवाजा दिसला (खालचा फोटो बघा) आणि हसतच सुटलो .... फोटो बघा तुम्हीसुद्धा हसत सुटाल... दरवाज्या बाहेर खाली उतरण्यासाठी ना जीना ना अजून काही व्यवस्था...
मिसळपाव