Skip to main content

आणखी एक कला

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 07/04/2009 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक कला *** हरवायची कला नाही कठिण शिकायला. इतक्या वस्तू बनल्या आहेत घेऊनच आस हरवायची - ती आपत्ती नको वाटायला. * रोज काही हरवू द्या - होऊ दे गडबड शोधायला - हरवा छल्ला चावीचा, जाऊदे वाया एक तास. हरवायची कला नाही कठिण शिकायला. * सरावाने भराभरा, भारंभार लागा हरवायला नावांस, ठिकाणांस, सफर करायच्या त्या स्वप्नांस हरवू देत.
Taxonomy upgrade extras

रंगांची गोष्ट!

लेखक उमेश कोठीकर यांनी मंगळवार, 07/04/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट..... सगळे रंग..कॅनव्हासवर सुखाने रहात होते.. हिरवा,निळा,भगवा वगैरे..! आपापल्या जागी सुखी होते... कॅनव्हास पण समाधानी.... पांढरी रंगाई पण सुखाने नांदत होती... हिरवा हळूहळू पसरत होता...उगीचच निळा.. तसा नविन.. हसत होता... भगवा..एकटाच! तळपत होता.. सगळे आपापल्या जागी ...मजेत पण....कली आला..! गर्जला... "सगळे सुखी? चांगले..? पांढरा पण..? दाखवलेच पाहिजे..कॅनव्हासला!" हळूच म्हणाला रंगांना,"हिरवे मियाँ; पसरा खूप अजून, देतील नाहीतर हाकलून..!" "अहो निळेबाबा, तुम्ही नविन ना? घ्या ना जागा हक्काची! राखीव.!.मागेच रहाल" "काय भगवे राजे? कसले हो? मोठे व्हा!
Taxonomy upgrade extras

(सहा) हजार चौरासी की मां!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 06/04/2009 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
तसा नेहमीचाच रविवार. सकाळी उशिरा उठल्यानंतर चहा कुणी करायचा यावरून भांड्याला भांडं (चहाच्या नव्हे!) लागलेलं. नंतर नाश्‍त्याला काट मारून थेट पावभाजीच्या जेवणाचाच बेत. पाव किती आणायचे, कुणी आणायचे, मीच का आणायचे, यावरून पुन्हा एक `लडिवाळ' संवाद! शेवटी घरचा कर्ता (आणि आठवडाभर नाकर्ता) पुरुष म्हणून जबाबदारी अस्मादिकांवरच! वर "फुकटचं गिळायला मिळतंय, हे नशीब समजा!' हा कृपाप्रसाद!! झक्‌ मारत पाव आणायला नि बाकी कचरापट्टी जमवायला बाजारात रवानगी. मग `जातोच आहेस, तर माझ्या बॅंकेतून पैसेही काढ' ही एक प्रेमाची गळ. मुंडी हलवून संमती देण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही!

(मी एकदा चहा केला)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 06/04/2009 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा काल अचानक डोक्यात आले चहा बनवून पाहू वाटले चहा बनवायला लागतेच काय? चहा, साखर अन थोडीशी साय भरकन जाऊन खरेदी केली आधणासाठी छोटी पातेली घेतली आधी काकूला फोन केला चहाचा चमचा (किती मोठा) विचारून घेतला हाय!
Taxonomy upgrade extras

फुलोरा..(माझ्या चाली सकट)

लेखक प्राजु यांनी सोमवार, 06/04/2009 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ुलोरा... केशराचा गंध ओला शोधते खुणांखुणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. चांदव्याला जाग आली की निशेला लाज आली का उषेच्या उंबर्‍याशी, रे उभी ओठंगुनी ती?? चांदणे मी शिंपले रे माझिया कणांकणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. दाट झाली सावली ती, तारकांच्या सांजवाती अमृताचे थेंब ओठी, चंदनी गंधीत राती पाकळ्यांचे चिंब गाणे वेळूच्या बनांबनांतून आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. - प्राजु इथे ऐका कृपया न हसता..!

स्त्री

लेखक उमेश कोठीकर यांनी सोमवार, 06/04/2009 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री रचना स्त्री सृष्टी स्त्री प्रेम स्त्री वृष्टी स्त्री प्रिया स्त्री माता स्त्री कष्ट स्त्री दाता स्त्री बळ स्त्री शक्ती स्त्री मीरा स्त्री भक्ती स्त्री माया स्त्री उब स्त्री पूजा स्त्री शुभ स्त्री दीप स्त्री ज्योती स्त्री लज्जा स्त्री मोती स्त्री यज्ञ स्त्री याग स्त्री फूल स्त्री आग स्त्री कन्या स्त्री भार्या स्त्री विदुषी स्त्री आर्या स्त्री जीवन! धारित्री स्त्री अमृत सावित्री स्त्री लक्ष्मी भाग्यद्वार! स्त्री थोर फार फार स्त्री श्रेष्ठ? ग्रंथ मौन स्त्री स्थान? सर्व गौण स्त्री दासी? स्त्री भिक्षा? स्त्री भोग्य? उपेक्षा? स्त्री दु:ख अमाप स्त्री जन्म अभिशाप!
Taxonomy upgrade extras

समीक्षा: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 06/04/2009 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
या चित्रपटाच्या जशा जाहिराती बघून उत्कंठा व अपेक्षा वाढत होती, त्याच प्रमाणे चित्रपट अपेक्षा पूर्ण सुद्धा करतो असे माझे मत आहे. सगळ्यात आधी हे नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट कोणत्याही जातीच्या, भाषेच्या, प्रांताच्या आणि धर्माच्या विरोधात मुळीच नाही. तर, तो आहे कुणाही च्यक्तीत असु शकणार्‍या न्यूनगंडाच्या भावनेच्या विरोधात. मग ती भावना कोणत्या ही कारणाने का आली असेना! महेश मांजरेकरने अतिशय छान कथा लिहिली आहे. तसेच त्याचा अभिनय आणि संवादफेकही अतिशय छान, प्रभावी आणि प्रेरक! शिवाजी महाराजांचे आडनांव भोसले , म्हणून तेच आडनांव मुद्दाम या सिनेमात वापरले आहे.