स्त्री
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्त्री रचना
स्त्री सृष्टी
स्त्री प्रेम
स्त्री वृष्टी
स्त्री प्रिया
स्त्री माता
स्त्री कष्ट
स्त्री दाता
स्त्री बळ
स्त्री शक्ती
स्त्री मीरा
स्त्री भक्ती
स्त्री माया
स्त्री उब
स्त्री पूजा
स्त्री शुभ
स्त्री दीप
स्त्री ज्योती
स्त्री लज्जा
स्त्री मोती
स्त्री यज्ञ
स्त्री याग
स्त्री फूल
स्त्री आग
स्त्री कन्या
स्त्री भार्या
स्त्री विदुषी
स्त्री आर्या
स्त्री जीवन!
धारित्री
स्त्री अमृत
सावित्री
स्त्री लक्ष्मी
भाग्यद्वार!
स्त्री थोर
फार फार
स्त्री श्रेष्ठ?
ग्रंथ मौन
स्त्री स्थान?
सर्व गौण
स्त्री दासी?
स्त्री भिक्षा?
स्त्री भोग्य?
उपेक्षा?
स्त्री दु:ख
अमाप
स्त्री जन्म
अभिशाप!
वाचने
2844
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
शेवटच्या ओळी सुन्न करतात! खूप खूप सुन्दर कविता!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
तुझ्या या कवितेपुढे मी नतमस्तक..!
काय नाहीये या कवितेत.. !!! सुरेख.!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कमीत कमी शब्दांत आशयघन कविता करण्याची हातोटी आहे तुम्हाला. येऊ द्यात अजून.
एक प्रश्न -
वरील कवितेच्या शेवटी कविता असे लिहिलेले आहे. त्याचा संदर्भ नाही समजला.
राघव
ते चुकून आले होते;काढले.
छान कविता
स्त्रीत्व समजवणारी. :)
शेवटची दोन कडवी भारी.
अजून येउद्या.
-- लिखाळ.
In reply to शेवटची दोन by लिखाळ
शेवटची दोन कडवी भारी.
सहमत आहे. सुंदर कविता!!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
या कडव्यांत अंतर्गत काही रचना जाणवली, आणि ती आवडली. उदाहरणार्थ :
स्त्री बळ स्त्री शक्ती स्त्री मीरा स्त्री भक्ती * स्त्री दीप स्त्री ज्योती स्त्री लज्जा स्त्री मोतीशेवटची दोन कडवी हादरा देणारी आहेत. पुढील बदल चालतील का?
स्त्री दासी? स्त्री भिक्षा? स्त्री भोग्य? ही उपेक्षा. * स्त्री दु:खा नाही माप स्त्री जन्म अभिशाप!काही कडव्यांमधली अंतर्गत रचना समजली नाही.
स्त्री यज्ञ स्त्री याग स्त्री फूल स्त्री आग * स्त्री कन्या स्त्री भार्या स्त्री विदुषी स्त्री आर्या * स्त्री प्रिया स्त्री माता स्त्री कष्ट स्त्री दाता(माझा जन्मदाता बाप आणि माझी जन्मदात्री आई, असे काही ऐकल्यासारखे वाटते.)
छान आहे कविता. चांगली जमली आहे.
अश्विनि.
धनंजय! आभार. छान सांगितलेत.
....
सुन्न!