Skip to main content

(फोन मेसेज)

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 17/04/2009 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
धनंजयशेठना आलेला फोन मेसेज वाचून आम्हाला मागच्या झुम्म्याला आलेला फोन मेसेज आठवला

फोन मेसेज
! *****!
अरे हलो -
फोन नाहीस उचलत...
म्हणजे झोपला आहेस.
अजून?

उशीर झाला तरी
पाणी गरम कर.
नाहीतर खाशील तशीच
नेहमीसारखी
अंघोळीची गोळी
वास मारेल म्हणून...
! *****!


वादळवारा

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 17/04/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो अंदाजे तासी ६०-७० च्या ही पेक्षा वेगाने वारा वाहत होता, स्थळ : फार्म हाऊस, मानेसर, गुडगांव.

"लक बाय चान्स"

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 17/04/2009 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
हा चित्रपट येऊन काही महिने उलटले तरी पहाण्याचा योग कालपर्यंत आला नव्हता. अनेक चित्रपट पाहिले जातात पण थोडेसेच लिहिण्यासारखे असतात. "लक बाय चान्स" हा त्यापैकी एक. डिस्क्लेमर : पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये. हा चित्रपट एका होतकरू , चित्रपट-नायक बनू पहाणार्‍या तरुणाच्या - "स्ट्रगल"च्या दिवसांची कहाणी रेखाटतो.

रशियातली शिवजयंती

लेखक चिन्या१९८५ यांनी शुक्रवार, 17/04/2009 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार यावर्षीही तिथीप्रमाणे शिवजयंती सारातोव्ह्,रशियातील आमच्या होस्टेलमधे करण्याची ५ वर्षांची प्रथा आम्ही चालु ठेवली.१३मार्च२००९ रोजी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात शिवरायांची आरती,त्यांचा संक्षिप्त जीवनक्रम,काही कविता,फत्तेखानाची पुरंदरवरची फजिती आणि शाहिस्तेखानावर हल्ला ही कथाकथने,एक भाषण्,'राजा शिवछत्रपती'चे 'इंद्रजीमी जंबपर' व 'हिंदवी राज्य हे आले' ही गाणी झाली.

पाव (ब्रेड)

लेखक दिपाली पाटिल यांनी शुक्रवार, 17/04/2009 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ७ कप मैदा ७ ग्रॅम यिस्ट १ मोठा चमचा साखर ३.५ कप कोमट पाणी ७ लहान चमचे वितळवलेले बटर चवी नुसार मिठ १ कप दुध किंवा १ अंडं कृती: १) एका वाडग्या त पाणी घेऊन त्यात साखर + यिस्ट एकत्र करून घ्यावे. या मिश्रणा ला ५-१० मिनटं ठेवा. नंतर मिठ पण मिसळुन घ्यावे. २) एका ताटा त किंवा मोठ्या भांड्या त मैदा घेऊन त्यात वरील मिश्रण टाकून एकत्र करावे व नीट मळून घ्यावे. ३) या मिश्रणा त वितळवलेले बटर टाकुन नीट मळून घ्यावे. नीट पंच करावे.

पौर्णिमा

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 17/04/2009 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजुताई नि राघवदादांच्या पौर्णिमा पाहून/वाचून मला मागच्या एका कोजागिरी पौर्णिमेला लिहिलेली कविता/गझल आठवली. शिळी, उष्टी असेलही कदाचित; पण आठवण झाली नि सहज शोधून मिळाली म्हणून मग येथे चिकटवायचे ठरवले.

<फोन बिल>

लेखक दशानन यांनी गुरुवार, 16/04/2009 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
फोन बिल !*****! अरे हलो - फोन करत नाहीस ... म्हणजे बिल भरले नाही आहेस. अजून? उशीर झाला नाही खिसा हलका कर. नाहीतर राहशील तसाच नेहमीसारखा - अवलंबून माझ्या फोनवर का सोडा मिळतय फुकट म्हणून... !*****!
प्रेरणा
Taxonomy upgrade extras

जयंती स्मरण - श्री श्री चार्ली चाप्लिन

लेखक टायबेरीअस यांनी गुरुवार, 16/04/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
१६ एप्रिल . चार्ली चाप्लिन यांची जयंती. पु. लं. चे दैवत याहून काही अधिक लिहिणे आहे काय? परंतु यानिमित्ताने चार्ली च्या कलाकृतींचा रसास्वाद मिपा वर व्हावा ही इच्छा!

अचानक पुणे-३० कट्टा

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 16/04/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या काही दिवसांपासून पुण्यनगरीत मुक्काम आहे. पुण्यात आलो तसे मिपाकर मित्रांचे फोन यायला सुरूवात झाली. "काय मग? कधी भेटताय?" "पुण्यात आलास, कळवत पण नाही. बघून घेऊ आम्ही पण." "या वेळी भेटायचंच बरं का, मागच्या वेळी टांग दिलीस." एक ना दोन. मलापण भेटायचंच होतं मिपावरच्या काही महान, थोर इ.इ. व्यक्तिमत्वांना. काल थोडा वेळ मिळाला म्हणून जरा फोनाफोनी केली दुपारी. परा, दाढे डॉक्टर आणि श्रावण मोडक एवढे मासे गळाला लागले. म्हणलं, आधी पराला भेटू. तिथून डॉक्टरकडे जाऊ आणि मग मिष्टर मोडकांना भेटू. थोडका आणि आटोपशीर कार्यक्रम ठरवून निघालो. पुण्याच्या जगप्रसिद्ध 'पुणे-३०' परिसरात पोचलो.