((बेत आहे..!))
उपटसुंभाचे 'बेत' वाचून आम्हालाही पूर्वीचे बेत आठवले, काही आमचे आणि काही दुसर्यांचे...;)
आज थोडीशी टकीला चाखण्याचा बेत आहे.
आज थोडे टुन्न होउन लुढकण्याचा बेत आहे.
भेटणे मजला पुन्हा ती टाळते नाक्यावरी का
मज कळेना योग हा की कटवण्याचा बेत आहे.
अंगणी माझ्या कशाला बायकांनी फेर धरला
खेळ चैत्री चालले की चोपण्याचा बेत आहे!
टाकली पोटात जेव्हा मी जराशी जास्त फेणी
कोण वदले, आज टकुरे सडकण्याचा बेत आहे?
रातचा गाठून कविला समज आपण नीट देऊ
का असा पाडीत गजला राहण्याचा बेत आहे?
मिसळपाव
