कोरोना आणि चीन - निकोलस वेड यांचा लेख
कोरोना विषाणू चीन मधून मुद्दाम पसरवला गेला का यावर चर्चा सुरु आहे. मुद्दाम नाही पण अपघाताने तरी तो प्रयोगशाळेतून आला असावा याकडे निर्देश करणारा निकोलस वेड यांनी लिहिलेला मोठा लेख बुलेटिन नावाच्या १९४५ पासून अस्तित्वात असलेल्या मासिकात प्रसिद्ध झाला. शेखर गुप्तांनीही या लेखाची दखल घेतली आहे.
-------------------------
निकोलस वेड यांचा बुलेटिन मधील लेख
-------------------------
३० मिनिटे किमान लागतील वाचायला. शक्य होईल त्यांनी जरूर वाचावा.
चहा घेणार?
आज जागतिक चहा दिनानिमित्त हे स्फुरले. गोड मानून घ्या. आवडले/न आवडले तरी कळवा.
जुना विषय काढण्यासाठी, विचारले मी चहा घेणार?
तोच विषय टाळण्यासाठी, विचारते ती चहा घेणार?
नको वाटले छप्पर आणि नको वाटले काही काही,
खरे छान वाटले जेव्हा म्हणालास तू, चहा घेणार?
फिके पडावे अत्तर ऐसा गंध हे पेय धारण करते,
उकळीन ह्याला आले घालूनी, तू थोडा चहा घेणार?
कारण नसता भेटीसाठी, कशास उगाचच भेटायाचे ,
तरी कुठूनसा येईन मी बघ, विचार फक्त चहा घेणार?
चर्चांसाठी, वादासाठी किंवा आणखी कशाहीसाठी,
निमित्तमात्र एक बुलावा, ऐक ना रे चहा घेणार?
कावळ्याची फिर्याद
सद्दपरीस्थीतीत एकमेकाची भेट तर होऊ शकत नाही म्हणून अधुन मधून एकमेकाची मोबाईल, टेलिफोन विचारपुस करणे हा अलिखित नियमच झालाय.
आजच गावाकडं मावशीला फोन लावला, सर्वसाधारण इकडची तीकडची विचारपुस झाल्यावर विषय करोनाच्या महामारी कडे वळाला. बोलता बोलता मावशी म्हणाली आज आपल्या गावात २१ दशक्रिया विधी आहेत, आमक्या तमक्याचा नंबर आकरावा आहे, दुपारी अडीच ची वेळ मीळाली. हल्ली विधी करण्यासाठी माणसं पण मीळत नाहीत. विषयाला गंभीर वळण लागतय पाहून विषय बदलला, म्हटंल काळजी घ्या वगैरे वगैरे बोलून फोन ठेवला.
दुपारचा दिड वाजत होता, सौभाग्यवती म्हणाल्या स्वयंपाक झालाय जेवून घ्या.
# तुम्ही(च) म्हणालात
पेर्णा
मित्रों......
तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही.
व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही.
ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले
प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले.
लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती
लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती
लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर,
लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर.
पण तुमच्यासारखं असं कुणी माझ्यावरती रुसतं का?
इतकी माया करुनही नशीब ममतावरच हसतं का?
तेव्हापासून रागावून मी एकही करार केला नाही
वाटलं होतं इथेच बन
भ्रम
विस्मरणाच्या जाळीत
गुंतलेल्या जीवनात
भ्रम झुळूक होतात...
कधी निसट्तात
कधी मुळ उपटतात
भ्रम पावले चोरतात....
मनीचे गुंजन गातात
दु:खाला चिमटीत पकडतात
भ्रम रूप दाखवतात....
काळ्या ढगांत
उन्हाचे अस्तित्व
भ्रम सर्वांग जाळतात...
आठवणींना वर्तमानात
गडद रंगवतात
भ्रम खोल दरीत राहतात....
मनाच्या,कल्पनेच्या,अस्तित्वच्या....असंख्य जागी...
नाईट मेअर (गूढकथा)
नाईट मेअर (गूढकथा)
त्या अरण्यात मी कसा पोहोचलो? हा प्रश्न गौण असला तरी, मी आता प्रचंड जखमी झालोय. अंगावर जागोजागी जखमा झाल्या आहेत. त्यातून सारखे रक्त गळत आहे. आणि मी असाच काही वेळ या अवस्थेत राहिलो तर, मृत्यू मला कधीही गाठेल आणि मी गतप्राण होऊन जाईल, ही वस्तुस्थिती मात्र मला नाकारता येणार नव्हती. मी नुसता धावत आहे. किती वेळ झाला, मला माहित नाही. पण मी सलग धावत आहे. तेही प्रचंड वेगाने. अंगात जेवढे त्राण आहेत, तेवढ्या वेगाने. तो मागचा लांडग्यांचा कळप, मला कधी गाठेल याचा नेम उरला नव्हता. ते मोठ्या धुडाचे दहा- पंधरा लांडगे, कधीही माझा फडशा पाडू शकत होते.
श्री अमृतानुभव अध्याय चौथा- ज्ञानाज्ञानभेदकथन
आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें ।
नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवीं ॥ ४-१ ॥
जागृती , जागेपणा म्हणजे काय ? झोप नसणे म्हणजेच जागेपणा . निद्रेचा अभाव हीच जागृती ! कित्त्ती सोप्पं आहे हे समजायला . तसेच अज्ञानाचा अभाव हेच ज्ञान ! Absence of delusions is the enlightenment. आता आपण आरशात पहातो तेव्हा आपल्याला आपल्या मुखाचे प्रतिबिंब दिसत असते , मुख दिसत नसते , पण तरीही आपल्याला आपले मुख दिसल्याचा आनंद होत असतो. तसेच ज्ञानाने आपल्याला आपले स्वरुप कळते हे म्हणणे आहे. म्हणजे मुळात आपले स्वरुप इतके शुध्द आहे कि तिथे ज्ञान अज्ञान ही भानगडच नाही.
सध्या मी काय पाहतोय ? भाग ६
अगदी बालपणा पासुन अय्यप्पां चे कार्यक्रम मी पाहत आलो आहे... त्यांची पुजा-अर्चना, उभ्या मांडणीने केलेल्या दिव्यांची आरास आणि समई आणि त्याच्या भवती असलेली फुलांची आरास फारच सुंदर दिसते. पुरुष मंडळी संपूर्ण काळ्या कपड्यात त्यांच्या ठराविक काळात राहतात.
ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)
मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी.
तांत्रिक बाबी -
०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est)
१) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे.
मिसळपाव